Anil Jadhao
देशात गेल्या दोन वर्षांपासून हळदीच्या क्षेत्रात वाढ होताना दिसत आहे. २०२०-२१ मध्ये देशात २ लाख ९२ हजार ८७६ हेक्टरवर हळदीची लागवड झाली होती.
दोन वर्षांपूर्वी हळदीला चांगले दर मिळाले. यामुळे हळद लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे २०२१-२२ मध्ये ३ लाख ४९ हजार ६४२ लाख हेक्टरवर हळदीचे क्षेत्र होते.
यंदा देशात ३ लाख ५६ हजार हेक्टरवर हळदीचे क्षेत्र आहे. दरवर्षी देशात हळदीचे क्षेत्र २० ते २५ टक्क्यांनी वाढते.
वास्तविक पाहता हळदीला मागणी असली, तरी उत्पादन अधिक झाल्याने गेल्या वर्षी हळदीच्या दरात फारशी तेजी दिसून आली नाही.
गतवर्षीपेक्षा यंदा ६ हजार ३५८ हेक्टरने हळदीचे क्षेत्र वाढले आहे, असा दावा हळद संशोधन केंद्राने व्यक्त केला.
गेल्या तीन वर्षांपासून देशात हळदीचे उत्पादन वाढत आहे. गतवर्षी देशात १३ लाख ३० हजार ९२ टन इतक्या हळदीचे उत्पादन झाले. २०२०-२१ या वर्षात ११ लाख २३ हजार ८५७ टन हळदीचे उत्पादन मिळाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.