Turmeric Cultivation : शेतकरी नियोजन पीक : हळद

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड शिवारात अनूप भगवानराव मोरे यांची १० एकर जमीन आहे. त्यात अडीच एकरांमध्ये हळद लागवड आहे. संपूर्ण हळद लागवडीमध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे.
Turmeric Crop Management
Turmeric Crop ManagementAgrowon

शेतकरी ः अनूप भगवानराव मोरे

गाव ः मुदखेड, ता. मुदखेड, जि. नांदेड

एकूण शेती ः १० एकर

हळद लागवड ः अडीच एकर

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड शिवारात अनूप भगवानराव मोरे bयांची १० एकर जमीन आहे. त्यात अडीच एकरांमध्ये हळद लागवड आहे. संपूर्ण हळद लागवडीमध्ये (Turmeric Cultivation) ठिबक सिंचन पद्धतीचा (Drip Irrigation System) अवलंब केला आहे.

Turmeric Crop Management
Turmeric : हळदीचा बदलता रंग

माती परीक्षणानुसार अन्नद्रव्यांची कमतरता लक्षात घेऊन रासायनिक खतांचे नियोजन केले जाते. हळदी पिकास गरजेपेक्षा कमी जास्त प्रमाणात नत्र दिल्यास उत्पादनात घट येण्याची शक्यता असल्याचे अनूपराव सांगतात.

Turmeric Crop Management
Turmeric process : फिरता हळद प्रक्रियेचा जुगाड बनला कुटुंबाचा आधार !

लागवड नियोजन ः

- लागवडीपूर्वी ट्रॅक्टरच्या साह्याने जमिनीची खोल नांगरट वखरणी केली. शेतातील काडीकचरा गोळा करून शेत स्वच्छ केले. त्यानंतर शेत उन्हामध्ये तापू दिले.

- मे महिन्यात चांगले कुजलेले शेणखत एकरी २ ट्रॉलीप्रमाणे शेतात मिसळून घेतले. डीएपी ५० किलो, एमओपी ५० किलो, अमोनिअम सल्फेट ५० किलो व इतर दुय्यम अन्नद्रव्यांची प्रति एकर प्रमाणे बेसल डोस दिले.

- लागवडीसाठी ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे साडेचार फुटांचे वाफे तयार केले. दररोज २ तास ठिबकद्वारे सिंचन करून हळद लागवडीपूर्वी १५ दिवस वाफे भिजवून घेतले.

- बेणे लागवडीपूर्वी शिफारशीप्रमाणे बेणे प्रक्रिया केली.

- मजुरांच्या मदतीने २० जूनला हळद लागवडीस सुरुवात केली. दोन ओळींत दीड फूट बेणे लागवड केली.

- लागवडीसाठी एकरी आठ क्विंटल बेणे लागले.

- लागवडीनंतर दोन दिवसांनी मातीची हलकी भर दिली.

- संपूर्ण लागवडीमध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. वाफसा आणि पिकाची पाण्याची गरज पाहून सिंचन केले जाते.

- लागवडीनंतर आतापर्यंत बेडला दोन वेळा माती भर दिली आहे. जेणेकरून पावसामुळे कंद उघडे पडणार नाहीत.

- पावसाळ्यात शेतात साचलेले पाणी वेळोवेळी बाहेर काढले. यामुळे कंद सडण्याचा धोका कमी झाला.

- नियोजनानुसार सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि १९ः१९ः१९ या विद्राव्य खतांचा वापर केला.

- आवश्यकतेनुसार मजुरांच्या मदतीने तणनियंत्रण केले.

आगामी नियोजन ः

- सध्या हळद पीक १२० दिवसांचे झाले असून, पीक शाकीय वाढीच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत हळदीला फुटवे येतात.

- शाकीय वाढीच्या अवस्थेत पिकामध्ये खत आणि सिंचन व्यवस्थापनावर विशेष भर दिला जातो. १०:२६:२६ हे खत ५० किलो, एमओपी ५० किलो, अमोनिअय सल्फेट ५० किलो याप्रमाणे रासायनिक खतांचा दुसरा हप्ता दिला जाईल. तसेच निंबोळी पेंड ५० किलो देणार आहे.

- येत्या काळात जमिनीतील ओलावा आणि पावसाचा अंदाज घेऊन सिंचन केले जाईल. शेतामध्ये पावसाचे अतिरिक्त पाणी साचणार नाही याची काळजी घेतली जाईल.

- ठिबकद्वारे विद्राव्य खते आणि कीडनाशकांच्या मात्रा दिल्या जातील.

- कीड- रोगांच्या प्रादुर्भावासाठी पिकाचे वेळोवेळी निरीक्षण केले जाईल. प्रादुर्भाव आढळल्यास शिफारशीत घटकांची फवारणी केली जाईल.

- गरजेनुसार मजुरांच्या मदतीने खुरपणी केली जाईल.

- अनूप मोरे, ९७६३२ २४६००

(शब्दांकन : कृष्णा जोमेगावकर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com