Agriculture Department : कृषी महोत्सवात शासनाचे स्टॉल उरले शोभेपुरते

कर्मचारी वेळेपूर्वीच गायब; भेट देणाऱ्यांना मिळेना योजनांची माहिती
रिक्‍त पदांमुळे अमरावती कृषी विभाग  झाला खिळखिळा  Amravati Agriculture Department due to vacancies It was a mess
रिक्‍त पदांमुळे अमरावती कृषी विभाग  झाला खिळखिळा  Amravati Agriculture Department due to vacancies It was a mess

नाशिक ः कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन डोंगरे वसतिगृह मैदान येथे ६ ते १० डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत त्याची वेळ देण्यात आली आहे. येथे शासनाच्या कृषीसह विविध विभागाचे स्टॉल आहेत; मात्र सायंकाळी सातनंतर येथे काही स्टॉल ओस पडतात, माहिती देण्यासाठी येथे कुणीच नसते. त्यामुळे या महोत्सवात शासनाचे स्टॉल शोभेपुरते उरल्याचे दिसून आले.

रिक्‍त पदांमुळे अमरावती कृषी विभाग  झाला खिळखिळा  Amravati Agriculture Department due to vacancies It was a mess
Mehrghar Scheme : मेळघाटातील माहेरघरांची दुरवस्था कोट्यवधींचा खर्च करून शासनाचे दुर्लक्ष

राज्य शासनाच्या कृषीसह इतर संलग्न विभाग, खासगी कंपन्या, शेतकरी उत्पादक कंपन्या, निविष्ठा उत्पादक, प्रक्रिया उद्योजक, नर्सरी व यंत्र सामुग्री यांचे स्टॉल मांडण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकरी व संबंधित घटक भेटी देत आहेत; मात्र अनेक स्टॉलवर फक्त फलक लावलेले असतात. येथे माहिती देण्यासाठी कोणीही उपलब्ध नसते. शासनाच्या काही स्टॉलमध्ये शेतकरी व बाहेरील विक्रेते येऊन उत्पादनांची विक्री करत असल्याचे दिसून आले. एकीकडे शेतकऱ्यांना नवीन संकल्पना, तंत्रज्ञान व योजनांची माहिती व्हावी यासाठी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते; मात्र शासनाच्या प्रयत्नांना कर्मचारी व अधिकारी हरताळ फासत असल्याची स्थिती आहे.

गुरुवारी (ता. ८) सायंकाळी ७ नंतर जिल्हा रेशीम कार्यालय, महाराष्ट्र राज्य पणन मंडळ, भूमी अभिलेख, जिल्हा परिषद-जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, कृषी विभागाचा शेतकरी सेवा कक्ष, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, कृषी विज्ञान केंद्र-मालेगाव, भूजल सर्वेक्षण अणि विकास यंत्रणा यांचे स्टॉल त्यांच्या प्रतिनिधीविनाच होते. शेतकरी भेट देत होते, मात्र त्यांना माहिती देण्यासाठी कुणीही उपलब्ध नसल्याची स्थिती होती.

मत्स्यव्यवसाय, वन, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प, कृषी संशोधन केंद्र-निफाडचे या स्टॉलवर प्रतिनिधी पूर्णवेळ उपस्थित होते. कृषी विभागाच्या स्टॉलवर शेतकऱ्यांनी पिकवलेला गुणवत्तापूर्ण शेतीमालाची मांडणी करण्यात आली होती; मात्र यासंबंधी काही प्रश्न उपस्थित केल्यास समाधानकारक उत्तर कृषी सहायक व पर्यवेक्षक यांच्याकडून मिळत नव्हते. त्यामुळे अशा महोत्सवाचा शेतकऱ्यांना खरंच फायदा होईल का, अशी चर्चा या वेळी रंगली होती.

रिक्‍त पदांमुळे अमरावती कृषी विभाग  झाला खिळखिळा  Amravati Agriculture Department due to vacancies It was a mess
पन्नास टक्के सवलत योजनेला उरले दोन महिने : पडळकर

शेतकऱ्यांची पूर्णवेळ उपस्थिती :

शेतकऱ्यांच्या दालनात शेतकरी ते ग्राहक थेट शेतीमाल विक्री, सेंद्रिय शेतीमाल विक्री तसेच शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, बचत गट यांच्यामार्फत उत्पादित धान्य, भाजीपाला, फळे, प्रक्रियायुक्त पदार्थ विक्री सुरू होती. येथे मात्र गर्दी होती.

विभागांचा सहभाग नावापुरता

शेतकऱ्यांना योजनांची माहिती मिळण्यासाठी शासनाच्या विविध योजना व सेवा यांची माहिती देण्यासाठी स्टॉल मांडण्यात आले आहे. मात्र येथे शासकीय विभागांचा सहभाग नावापुरता उरला आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांचे क्षेत्रीय प्रतिनिधी महोत्सवाच्या आयोजनात सक्रिय होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com