सर्कोस्पोरा लीफ ब्लाइट (Leaf Blight) आणि दाण्यांचा जांभळा रंग
गरम आणि आर्द्र हवामानात रोगाचा प्रसार वाढतो. प्रादुर्भावामुळे बियाणे कुजते तसेच रोपे सडतात.
रोगग्रस्त बियाणावर गुलाबी, जांभळट डाग दिसतात. रोगट बियाण्याच्या आवरणावर भेगा पडतात.
पानावरील सर्कोस्पोराचे ठिपके ः
पानांवर तपकिरी रंगाचे बेडकाच्या डोळ्याच्या आकाराचे, गडद वलये असलेली ठिपके पडतात. कालांतराने ठिपक्यांचा आतील भाग गळून पानाला छिद्रे पडतात.
शेंगांवर गडद लाल-तपकिरी रंगाचे पाणथळ ठिपके दिसतात. खोड व शेंगांवर ठिपके दिसतात.
तांबेरा
सतत पाऊस आणि ढगाळ वातावरणात प्रसार होतो.
पानांवर फिकट लालसर ते गर्द लालसर रंगाचे चट्टे पडतात. पानांच्या मागील बाजूस लालसर, तपकिरी रंगाचे पुरळ दिसून येतात. अशा पुरळांवर लालसर रंगाची पावडर जमा झालेली दिसून येते.
वाढ मंदावते, पाने गळतात.
मानकुजव्या (कॉलर रॉट)
जमिनीलगत खोड व मुख्य मुळे काळपट होऊन सडल्यासारखी दिसतात.
रोगट भागावर व भोवताली कापसाच्या तंतूंसारखी बुरशीची वाढ होते.
मूळकुज/खोडकुज (चारकोल रॉट)
जमिनीत पाण्याचा अभाव, अधिक तापमान (३० अंश सेल्सिअस पेक्षा जास्त) रोग प्रसारास अनुकूल.
पॅचेसमध्ये खुजे किंवा कोमजलेली झाडे प्रारंभिक लक्षण.
खोडावर, मुळावर भुरकट काळपट डाग दिसतात. संपूर्ण झाड राखाडी रंगाचे होते.
जिवाणू करपा
पान,शेंगांवर त्रिकोणी, चौकोनी आकाराचे तपकिरी करड्या रंगाचे ठिपके दिसतात.
ठिपक्या भोवती पिवळसर वलय दिसते. ठिपक्यांचे प्रमाण जास्त असल्यास पाने गळून पडतात.
सोयाबीन मोझॅक
मावा ही कीड रोगकारक विषाणू वाहक आहे. झाडाचा रस व बियाण्यातून रोगाचा प्रसार होतो.
झाडांची वाढ खुंटते. पाने लहान, आखूड, जाडसर व सुरकुततात.
पिवळा मोझॅक
पांढरी माशी ही रोगकारक विषाणूची वाहक आहे.
पाने, शिरा पिवळ्या पडतात. पानाचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो.
शेंड्याकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात.
सोयाबीन मोझॅक, पिवळा मोझॅक,
विषाणूजन्य रोगांचे नियंत्रण
रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.
पीक तणमुक्त ठेवावे.
पिवळे चिकट सापळे प्रत्येकी २५ प्रति हेक्टर शेतात वापरावेत.
शिफारशीपेक्षा जास्त नत्राचा वापर टाळावा.
रोगवाहक पांढरी माशी, मावा किडीचे नियंत्रणासाठी थायामेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) २ मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी.
रोग नियंत्रणाचे उपाय (प्रमाण प्रति लिटर पाणी)
१) सर्कोस्पोरा पानावरील ठिपके,
लीफ ब्लाइट आणि दाण्यांचा जांभळा रंग
पिकोक्झीस्ट्रोबिन (२२.५२ टक्के एससी) ०.८ मिलि किंवा
पायरॅक्लोस्ट्रोबिन (२० टक्के डब्ल्यूजी) १ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल (१० टक्के) + सल्फर (६५ टक्के डब्ल्यूजी) संयुक्त बुरशीनाशक २.५ ग्रॅम किंवा
फ्ल्युक्झपायरॉक्झाड (१६.७ टक्के + पायरॅक्लोस्ट्रोबिन (३३.३ टक्के एससी) संयुक्त बुरशीनाशक ०.६ मिलि किंवा
पायरॅक्लोस्ट्रोबिन (१३.३ टक्के) + इपोक्झीकोनॅझोल (५ टक्के एसई) संयुक्त बुरशीनाशक १.५ मिलि
तांबेरा
हेक्झाकोनॅझोल (५ टक्के ईसी) १ मिलि किंवा
प्रॉपीकोनॅझोल (२५ टक्के ईसी) १ मिलि किंवा
क्रेसोक्झीम मिथाईल (४४.३ टक्के एससी) १ मिलि किंवा
पिकोक्झीस्ट्रोबिन (२२.५२ टक्के एससी) ०.८ मिलि
शेंगावरील करपा
टेब्युकोनॅझोल (२५.९ टक्के ईसी) १ मिलि किंवा
टेब्युकोनॅझोल (१० टक्के) + सल्फर (६५ टक्के डब्ल्यूजी) संयुक्त बुरशीनाशक २.५ ग्रॅम
जिवाणू रोग
स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट ४ ग्रॅम अधिक कॉपर ऑक्सीक्लोराइड (५० टक्के डब्ल्यूपी) २ ग्रॅम
डॉ.आनंद दौंडे ७५८८०८२००८
(वनस्पती रोगशास्त्र विभाग,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.