

Fruit Crop Management : कमी पाण्यातही फळबाग तग धरुन रहावी यासाठी मडका सिंचन आणि सलाईन बाटल्यांचा वापर उत्तम पर्याय आहे. मडका सिंचन कमी खर्चाचे असल्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याला सहजपणे परवडते.
फळ झाडांसाठी मडका सिंचनाचा वापर करताना कमी वयाच्या लहान फळझाडासाठी ५-६ लिटर क्षमतेचे, तर मोठ्या झाडांसाठी १५ लिटर क्षमतेचे मडके निवडावे. त्याच्या तळाशी लहानसे छिद्र पाडून, त्यात सुती कापडाची वात बसवून घ्यावी.
मडक्याचे तोंड जमिनीवर राहील असे झाडाच्या बुंध्याजवळ पुरावे. ते पाण्याने भरून मडक्याच्या तोंडावर झाकण ठेवावे. मडक्याच्या सच्छिद्र रचनेमुळे ते पाझरते. त्यातील पाणी हळूहळू पसरून जमिनीत ओलावा तयार होतो. त्यामुळे झाडांच्या मुळांना सतत व संथपणे पाणी उपलब्ध होऊ शकते. मडके रिकामे झाल्यानंतर पुन्हा भरावे.
सलाइन बाटल्यांचा वापर
ठिबक सिंचनासारखे थोडेथोडे पाणी कार्यक्षमतेने वापरण्यासाठी आणि अगदी थेट झाडाच्या मुळांजवळ देण्यासाठी सलाइनच्या बाटल्या वापरता येतात. पाणी पडण्याचा वेग सलाइनमधील बटनाद्वारे कमी जास्त करता येतो. पाणी भरलेली बाटली झाडाच्या फांदीला बांधून, तिची नळी मुळाजवळ जमिनीवरील थरात ठेवावी.
काळजी
वेळोवेळी पाणी मुळांजवळ पडते किंवा नाही याची तपासणी करावी.
कचरायुक्त, गढूळ पाणी सलाइन बाटलीमध्ये वापरू नये.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.