Sinchan Bhavan Meeting : पाणी वापर संस्था सक्षमीकरणात ‘एफपीसीं’चा सहभाग

Water Use Update : जागतिक बँक, सह्याद्री फार्म्स व जलसंदा विभाग यांच्यामध्ये पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण या विषयावर नुकतीच सिंचन भवन येथे बैठक पार पडली.
Sinchan Bhavan Meeting
Sinchan Bhavan MeetingAgrowon

Nashik News : जागतिक बँक, सह्याद्री फार्म्स व जलसंदा विभाग यांच्यामध्ये पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण या विषयावर नुकतीच सिंचन भवन येथे बैठक पार पडली.

उत्तर महारष्ट्र प्रदेशचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ हे अध्यक्षस्थानी होते. बैठकीस जागतिक बँकेचे जे. मूर्ती (नवी दिल्ली), सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीचे कार्यकारी संचालक विलास शिंदे,

Sinchan Bhavan Meeting
Pre-Monsoon Regional Review Meeting : नैसर्गिक आपत्ती, पुरामुळे जीवित हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी

लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक महेंद्र आमले, सहायक मुख्य अभियंता संग्राम रावल, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत, उपअभियंता प्रशांत गोवर्धने व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

Sinchan Bhavan Meeting
Water Issue Meeting : दुष्काळाचे दुष्टचक्र भेदण्याचा संकल्प

बैठकीत प्रामुख्याने पाणी वापर संस्था सक्षम होण्यासाठी त्यांच्या लाभक्षेत्रातील कृषी उत्पादनास बाजारपेठेत योग्य भाव मिळवून देण्यासाठी उपाययोजना व त्यातून लाभधारकास आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊन त्यानुसार पाणी वापर संस्था सक्षम करण्याचे उदिष्ट असावे, असे ठरले.

या सर्व प्रक्रियेत सर्व घटकांचा सहभाग घेऊन पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून काटकरीने पाणी वापर, मोअर क्रॉप पर ड्रॉप, पाणी वापराच्या कार्यक्षमतेत सुधारणा यावर चर्चा करण्यात आली. उपलब्ध पाण्यानुसार मूल्यवर्धित पीक रचना ठरवून कृषी उत्पादन, प्रकल्पावर झालेल्या खर्चाचा परतावा मिळण्याबाबत चर्चा करण्यात आली. याबाबत इतरही शेतकरी उत्पादक कंपन्यांशी चर्चा करून सामंजस्य करार मसुद्यास अंतिम स्वरूप देण्याचे ठरविण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com