Grapes Crop : द्राक्षाला बदलत्या वातावरणा धोका

Anil Jadhao 

राज्यात द्राक्षाचा हंगाम सुरु झाला. यंदा हंगामाच्या दरम्यान कमी पावसाची शक्यता असल्याने अनेक शेतकऱ्यांनी हा हंगाम धरला.

आतापर्यंत द्राक्ष पिकाला पोषक हवामान होते. त्यामुळे मणी लागण, मण्यांची वाढ चांगल्या प्रकारे झाली आहे.

मात्र मागील तीन ते चार दिवसांपासून राज्यात ढगाळ हवामान होते. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

राज्यााच्या काही भागात आजपासून पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याची धास्ती द्राक्ष उत्पादकांना आहे.

नाशिक जिल्ह्यातील शेतकरी काटेकोर नियोजनातून भरघोस द्राक्ष उत्पादन घेण्यात आघीडवर आहेत. चालू हंगामातही शेतकऱ्यांनी नियोजन करून पीक फुलवले आहे. 

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना यंदा चांगल्या उत्पादनाची आशा आहे. मात्र शेतकऱ्यांची आशा वातावरण तसेच बाजारात मिळणाऱ्या दरावर अवलंबून आहे.

cta image
क्लिक करा