Pomegranate : हस्त बहराच्या डाळिंब बागेचे व्यवस्थापन

सध्या हस्त बहराच्या (सप्टेंबर ते ऑक्टोबर पीक नियमन) डाळिंब बागेमध्ये एकतर विश्रांतीचा कालावधी सुरू असेल किंवा बेमोसमी पावसामुळे उशिरा सेटिंग झालेल्या बागेची शेवटची फळतोडणी झालेली असेल.
Pomegranate
PomegranateAgrowon
Published on
Updated on

डॉ. ज्योत्स्ना शर्मा, डॉ. आशिस माईती, डॉ. एन. व्ही. सिंह, डॉ. मल्लिकार्जुन, डॉ. सोमनाथ पोखरे

---------------

सध्या हस्त बहराच्या (Pomegranate Hast Blossom) (सप्टेंबर ते ऑक्टोबर पीक नियमन) डाळिंब बागेमध्ये (Pomegranate Orchard) एकतर विश्रांतीचा कालावधी सुरू असेल किंवा बेमोसमी पावसामुळे (Rain) उशिरा सेटिंग झालेल्या बागेची शेवटची फळतोडणी (Fruit Harvesting) झालेली असेल. किंवा काही ठिकाणी तोडणीनंतर छाटणीही झालेली असेल. जिथे फळे तोडणी संपलेली असेल, तिथे त्वरित पेन्सिल आकाराच्या फांद्या शेंड्याकडून ६० सेंमी पर्यंत कट करून खरड छाटणी करावी. तुटलेल्या गुंतलेल्या आणि रोगग्रस्त फांद्या काढाव्यात. सरळ आणि झाडाच्या मधोमध वाढलेले वॉटरशूट काढावेत, त्यामुळे सूर्यप्रकाश आत येईल. ज्यांच्या बागेत फळे तोडणी व छाटणी मे महिन्यात झालेली असल्यास नव्याने छाटणीची गरज नाही. छाटणी उन्हे असलेल्या दिवसात करावी. छाटणी केलेल्या झाडांवर त्याच दिवशी १ टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. (Pomegranate Crop Management)

Pomegranate
शेतकरी पीक नियोजन : डाळिंब

अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापन :

-शेणखत १५ ते २० किलो किंवा शेणखत १० ते १५ किलो अधिक २ किलो गांडूळ खत अधिक २ किलो निंबोळी पेंड प्रति झाड किंवा

७.५ किलो कुजलेले कोंबडी खत अधिक २ किलो निंबोळी पेंड प्रति झाड द्यावे.

- २५५ ते २८० ग्रॅम नत्र (४९० ते ६१० ग्रॅम युरिया प्रति झाड), ६३ ग्रॅम स्फुरद (सिंगल सुपर फॉस्फेट ३९५ ग्रॅम प्रति झाड) आणि २०० ग्रॅम पालाश (३३५ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश) ४८८ ग्रॅम कॅल्शिअम (२.८८ किलो जिप्सम) आणि ८० ग्रॅम मॅग्नेशिअम (८०० ग्रॅम मॅग्नेशिअम सल्फेट) प्रति झाड द्यावे व हलके पाणी द्यावे.

-जैविक फॉर्म्यूलेशन उदा. ॲझोस्पिरिलम स्पेसिज, अॅस्परजिलस नायजर, ट्रायकोडर्मा व्हिरिडी आणि पेनिसिलिअम पिनोफायलम यांची आपल्या शेतात वाढ करण्यासाठी ती चांगल्या कुजलेल्या शेणखतात १ : २५ या प्रमाणात मिसळावीत. यामुळे जमिनीतून पसरणाऱ्या रोगांच्या प्रादुर्भावाला अटकाव होतो. तसेच झाडाची प्रतिकारक्षमता वाढवते.

या मिश्रणाचे सावलीत वेगवेगळ्या ठिकाणी बेड तयार करावे. त्यामध्ये १५ दिवस ६० ते ७० टक्के ओलावा ठेऊन, दर २ दिवसांनी उलथा-पालथ करत राहावे. ही फॉर्म्युलेशन्स शेतात वापरण्यापूर्वी त्यात अर्बास्कूलर मायकोरायझा बुरशी (एएमएफ) रायझोफॅगस इरेगुल्यारिस किंवा ग्लोमस इंट्राडॉलिसिस हे जैविक फॉर्म्युलेशन १० ते १५ ग्रॅम प्रति झाड प्रमाणे मिसळावे. हे एकत्रित मिश्रण १० ते २० ग्रॅम प्रति झाड या प्रमाणे द्यावे.

-दिलेल्या खतांचा पुरेपूर वापर होण्यासाठी जमिनीत पुरेसा ओलावा असावा. मुरमाड जमिनीत ३ ते ४ दिवसांच्या अंतराने १५ ते २० लिटर आणि पोयटा प्रकारच्या जमिनीत आठवड्याच्या अंतराने १० ते १५ लिटर पाणी द्यावे.

-मातीचा प्रकार आणि झालेला पाऊस यानुसार पाऊस बंद झाल्यावर २ ते ५ दिवस पाणी देऊ नये.

Pomegranate
खतांच्या अति वापरामुळे डाळिंब बागा धोक्यात

कीड व्यवस्थापन :

-जिथे शेवटची फळ तोडणीला उशीर झालेला आहे किंवा थोडा अवधी राहिलेला असेल तर तिथे कीडनाशकांची फवारणी टाळावी.

अ) विश्रांती काळात खोड किडा, खोड पोखरणारी अळी, वाळवी, कोळी, पाने खाणारी अळी आणि रस शोषणारे कीटक (मिलीबग, खवले कीड, फूलकिडे इ. यांचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणात आढळतो. त्यांच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी

१) पानांवर प्रादुर्भाव कमी असल्यास ॲझाडिरॅक्टिन (१० हजार पीपीएम) / कडुनिंब तेल ३ मिलि.

२) मध्यम किंवा अधिक प्रादुर्भाव असेल, तर १५-२० दिवसांच्या अंतराने पुढीलपैकी २ ते ३ फवारणीचे नियोजन करावे.

लॅम्बडा सायलोथ्रिन (५ टक्के ईसी) ०.५ ते ०.७५ मिलि किंवा इंडोक्साकार्ब (१४.५ टक्के एससी) ०.७५ मिलि किंवा सायॲण्ट्रानीलिप्रोल (१०.२६ टक्के ओडी) ०.७५ मिलि किंवा थायामेथोक्झाम (२५ टक्के डब्ल्यूजी) ०.५ ग्रॅम अधिक स्टिकर- स्प्रेडर ०.३ मिलि.

ब) शॉट होल बोरर प्रादुर्भाव दिसून येत असेल, ड्रेचिंग प्रति लिटर पाणी

शॉ होल बोरर झाड पोखरत जाताना होणाऱ्या जखमेवर एक प्रकारची बुरशी वाढते. या बुरशीवर ही कीड उदरनिर्वाह करत असते. त्यामुळे पुढील प्रमाणे कीटकनाशक आणि बुरशीनाशक दोन्हीची ड्रेंचिंग करावी. किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असेल, तर ड्रेचिंग प्रति लिटर पाणी

-पहिली ड्रेंचिंग : इमामेक्टिन बेंझोएट (५ टक्के एसजी) २ ग्रॅम अधिक प्रोपिकोनॅझोल (२५ टक्के ईसी) २ मिलि.

खोडावर लेप लावणे : पाणी १० लिटर अधिक गेरू किंवा लाल माती ४ किलो अधिक इमामेक्टिन बेंझोएट (५ टक्के एसजी) २० मिलि अधिक कॉपर ऑक्सिक्लोराइड २५ ग्रॅम मिसळून ही पेस्ट तयार करून जमिनीपासून २ ते २.५ फुटांपर्यंत खुंटावर लावावी.

-दुसरे ड्रेंचिंग : थायामेथोक्झाम (२५ टक्के डब्ल्यूजी) २ ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम २ ग्रॅम.

Pomegranate
Pomegranate : निर्यातक्षम डाळिंब उत्पादनात जाधव बंधूंचा हातखंडा

क) बागेत स्टेम बोररचा प्रादुर्भाव आढळल्यास : खालील टप्प्याप्रमाणे उपाययोजना कराव्यात.

-कोवळ्या रोपांच्या कॅनॉपीमध्ये स्टेम बोररचे प्रौढ बीटल आहेत का, ते पाहात. कांबी आढळल्यास कोणत्याही एक स्पर्शजन्य कीटकनाशक १ मिलि प्रति पाणी या मिश्रणात बुडवून नियंत्रण करावे.

प्रौढ बीटलचा प्रादुर्भाव आढळल्यास, १ टक्का नीम तेल किंवा कडूनिंबयुक्त कीटकनाशक ॲझाडिरॅक्टीन (१० हजार पीपीएम) ३ मिलि अधिक प्रति ०.३० मिलि स्प्रेडर स्टिकर प्रति लिटर या प्रमाणे खोडावर फवारणी करावी.

-कीटकांमुळे पडलेली छिद्रे बायडिंग वायरने वर आणि खाली साफ करा. खराब छिद्रांमध्ये इमामेक्टिन बेंन्झोएट (५ टक्के एसजी) २ ग्रॅम प्रति लिटरने इंजेक्ट करून पूर्ण भरेपर्यंत छिद्रात सोडावे. नंतर ओल्या चिखल/मातीने छिद्र बंद करावे. या प्रक्रियेनंतर खाली पडलेली लाकडाची भुकटी काढून जागा साफ करावी. उपचारानंतर २४ तासांनंतर पुन्हा निरिक्षण करावे. जर ताजी लाकडाची भुकटी दिसल्यास वरील प्रमाणे प्रक्रिया पुन्हा करावी. किंवा पुढील उपाययोजनांची अंमलबजावणी करावी.

१) ड्रेंचिंग : इमामेक्टिन बेंझोएट (५ टक्के एसजी) २ ग्रॅम अधिक प्रोपिकोनॅझोल (२५ टक्के ईसी) २ मिलि. प्रति लिटर पाणी.

२) खोडावर फवारणी प्रति लिटर पाणी, थायामेथोक्झाम (२५ टक्के डब्ल्यूजी) १ ते २ ग्रॅम.

३) खोडावर पेस्ट लावणे : गेरू / लाल माती ४ किलो + इमामेक्टिन बेंझोएट (५ टक्के एसजी) २० मिलि अधिक कॉपर ऑक्सीक्लोराईड २५ ग्रॅम १० लिटर पाणी या प्रमाणे पेस्ट तयार करून खोडावर लावावी.

ड) मिलीबग किंवा खवले कीड : फवारणी प्रति लिटर पाणी

१) प्राथमिक अवस्थेत : कडुनिंब तेल १ टक्का (ॲझाडिरॅक्टिन १० हजार पीपीएम) ३ मिलि + करंज बियांचे (पोंगामिया) तेल ३ मिलि अधिक फिश ऑइल रेझिन सोप ०.५ मिलि.

२) उशिरा प्रादुर्भाव दिसून आल्यास, थायामेथोक्झाम (१२.६ टक्के) ०.७५ मिलि अधिक लॅम्बडा सायलोथ्रिन (९.५ टक्के झेडसी) ०.२५ मिलि त्यात स्प्रेडर स्टिकर मिसळावे. किंवा

बुप्रोफेजीन (२५ टक्के एससी) १ ते १.५ मिलि अधिक फिश ऑइल रेझिन सोप ०.५ मिलि.

इ) कोळी किडीचा प्रादुर्भाव : फवारणी प्रति लिटर पाणी

१) प्राथमिक अवस्थेत : कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास कडुनिंब तेल १ टक्का (ॲझाडिरॅक्टिन १० हजार पीपीएम) ३ मिलि.

२) उशिरा प्रादुर्भाव दिसून आल्यास, फेनझाक्वीन (१० टक्के ईसी) १.५ मिलि किंवा फेनप्रॉक्सिमेट (५ टक्के ईसी) ०.४ मिलि किंवा स्पायरोमेसिफेन (२४० एससी) ०.४ ते ०.५ मिलि अधिक स्टिकर- स्प्रेडर ०.५ मिलि.

ड) रोग व सूत्रकृमींचे व्यवस्थापन :

विश्रांती काळातील वातावरणानुसार आणि तेथील समस्येच्या प्रमाणानुसार १० ते १५ दिवसांच्या अंतराने, फवारणी प्रति लिटर पाणी

बोर्डो मिश्रण १ टक्का किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० टक्के डब्ल्यूपी) ३ ग्रॅम किंवा कॉपर हायड्रॉक्साइड (५३.८ टक्के डब्ल्यूपी) २ ग्रॅम.

या व्यतिरिक्त २-ब्रोमो,२-नायट्रोप्रोपेन-१,३ डायोल (ब्रोनोपॉल ९५%) ०.५ ग्रॅम प्रति लिटर फवारावे.

अशा स्थितीत बुरशीजन्य ठिपके दिसून आल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी

मॅन्कोझेब (७५ टक्के डब्ल्यूपी) २ ग्रॅम अधिक स्टिकर- स्प्रेडर ०.२५ मिलि.

--------------------------------

संपर्क ः ०२१७-२३५४३३०/ २३५००७४ (राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com