Pomegranate
Pomegranate Agrowon

Pomegranate : शेतकरी पीक नियोजन : डाळिंब

मी साधारण २०१७-१८ रोजी २ एकर क्षेत्रावर डाळिंबाची ८ बाय १२ फूट अंतरावर लागवड केली. त्यात भगवा वाणाची सुमारे ८०० झाडे आहेत. डाळिंब बागेमध्ये दरवर्षी प्रामुख्याने मृग बहार धरला जातो. त्यातून एकरी ९ ते १० टन उत्पादन मिळते.
Published on

शेतकरी ः अक्षय कृष्णा गव्हाणे

गाव : कारंबा, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर

एकूण क्षेत्र ः ७ एकर

डाळिंब क्षेत्र ः २ एकर

-----------------------

कारंबा (ता. उत्तर सोलापूर) येथे माझी सात एकर शेती आहे. त्यात दोन एकरवर डाळिंब (Pomegranate) तर उर्वरित क्षेत्रावर हंगामी भाजीपाला पिकांची लागवड (Vegetable Crop Cultivation) केली जाते. सोलापूर बाजारपेठ जवळ असल्याने टोमॅटो (Tomato), कांदा (Onion), हिरवी मिरची (Green Chili) यासह अन्य भाजीपाल्याची लागवड केली जाते.

मी साधारण २०१७-१८ रोजी २ एकर क्षेत्रावर डाळिंबाची ८ बाय १२ फूट अंतरावर लागवड केली. त्यात भगवा वाणाची सुमारे ८०० झाडे आहेत. डाळिंब बागेमध्ये दरवर्षी प्रामुख्याने मृग बहार धरला जातो. त्यातून एकरी ९ ते १० टन उत्पादन मिळते.

Pomegranate
Pomegranate : हस्त बहराच्या डाळिंब बागेचे व्यवस्थापन

मृग बहराचे नियोजन ः

- बहर धरण्याच्या आधी जानेवारी ते मे या विश्रांतीच्या काळात बोर्डो आणि कीटकनाशकाची फवारणी करून घेतली.

- पाऊस पडण्याअगोदर २० मे रोजी पानगळ करून घेतली. त्या आधी दोन दिवस सलग ८ ते १० तास पाणी देऊन जमीन ओली करून घेतली.

- साधारण ५ ते ६ एप्रिल दरम्यान छाटणी करून घेतली.

- त्यानंतर शेणखत २० किलो, कंपोस्ट ५ किलो, निंबोळी पेंड १ किलो, सिंगल सुपर फॉस्फेट १ किलो आणि डीएपी २५० ग्रॅम, सिंगल सुपर फॉस्फेट २५० ग्रॅम प्रतिझाड प्रमाणे मात्रा दिली.

Pomegranate
Pomegranate : डाळिंब, सीताफळ बागेमध्ये संवर्धित शेतीचे प्रयोग

मागील १० दिवसांतील कामकाज ः

- सध्या डाळिंब बाग सेटिंग अवस्थेत असून, प्रतिझाड १०० ते १५० फळे लागली आहेत.

- मागील १५ दिवसांपासून वातावरणात बदल होत आहे. बदलत्या वातावरणामुळे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी शक्यता असते. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून रासायनिक कीटकनाशके आणि बुरशीनाशकांच्या आलटून-पालटून फवारण्या घेतल्या.

- बागेस नियमित एक दिवसाआड २ ते ३ तास ठिबकद्वारे सिंचन केले जाते. मात्र, सध्या पाऊस पडत असल्याने सिंचन थांबविले आहे.

- बागेमध्ये तणांचा प्रादुर्भाव वाढला होता. नियंत्रणासाठी १ खुरपणी केली आहे.

- सूत्रकृमींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ठिबकद्वारे रासायनिक कीटकनाशके दिली.

- फळांची फुगवण चांगली होऊन ती निरोगी राहण्यासाठी ठिबकद्वारे दोन दिवसाआड एनपीके खते ४ किलो आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये १५ दिवसांतून एकदा एकरी ३ किलो प्रमाणे दिली.

पुढील २० दिवसांतील नियोजन ः

- फळांची गुणवत्ता राखण्यासाठी एनपीके खतांच्या मात्रेत सातत्य ठेवले जाईल.

- सध्या सतत पाऊस पडत असल्याने भुरी आणि ‘तेल्या’चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून रासायनिक फवारणी केली जाईल.

- येत्या काळात पावसाचे प्रमाण आणि जमिनीतील वाफसा यांचा अंदाज घेऊन सिंचनाचे नियोजन केले जाईल.

- फळगळ टाळण्यासाठी आवश्यकतेनुसार फवारणी केली जाईल.

---------------

-अक्षय गव्हाणे, ९२८४९२९०६३

(शब्दांकन ः सुदर्शन सुतार)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com