Orange Plantation : आधुनिक पद्धतीने करा संत्रा लागवड

Orange Cultivation : विशिष्ट अशी आंबट गोड चवीबरोबर प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या क्षमतेमुळे संत्र्याची मागणी वाढत आहे. सलाम किसान समुहाकडून शेतकऱ्यांसाठी संत्रा पीक उत्पादन तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. त्याविषयीची माहिती पाहुया.
Salam Kisan
Salam KisanAgrowon

Orange Farming : विशिष्ट अशी आंबट गोड चवीबरोबर प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या क्षमतेमुळे संत्र्याची मागणी वाढत आहे. सलाम किसान समुहाकडून शेतकऱ्यांसाठी संत्रा पीक उत्पादन तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. त्याविषयीची माहिती पाहुया.

जमिनीची मशागत

अगोदर जमीन नांगरून तयार करावी. जमीन २ ते ३ वेळा वखराच्या कुळव्याच्या पाळ्या मारून घ्याव्या जेणे करून जमीन भुसभुशीत होईल. सिंगल सुपर फॉस्फेट - १ बॅग (५० किलो), जय संजीवनी - ५ किलो त्यानंतर वरील घटक शिंपडुन पुन्हा एकदा वखराची पाळी मारून घ्यावी. (वरील सर्व घटकांचे प्रमाण प्रति एकर प्रमाणे दिले आहे.)

रोपांची निवड

नागपूर संत्रा, केशरी, किन्नु, मंडारीन, सातसुमा, टेंजरीन, पोमेलो किंवा बाजारात उपलब्ध असलेले कोणत्याही जातीची रोपे तुम्ही निवडू शकता. संत्रा लागवडीसाठी लागणारी रोपांचे किंवा बियाण्याचे प्रमाण त्याच्या अंतरावर अवलंबून असते.

लागवडीसाठी खड्डे तयार करणे

बरेच शेतकरी उन्हाळ्यामध्ये खड्डे खोदुन ठेवतात व त्यामध्ये शेणखत - ३ किलो प्रति खड्डा टाकावे. खड्ड्यांची खोली १ - १.५ फूट ठेवावी व दोन झाडांमधील अंतर ११ मीटर × १५ मीटर, १५ मीटर × १८ मीटर किंवा १८ मीटर × १८ मीटर हे अंतर हलकी व भारी जमिनीनुसार अंतर ठेवावे यामुळे अंतर मशागत करणे सोपे जाते. खड्डे तयार केल्यानंतर हाय पावर - १०० ग्रॅम, शक्ती गोल्ड - १०० ग्रॅम, १०:२६:२६ - १०० ग्रॅम, निंबोळी पेंड - १०० ग्रॅम हे घटक प्रती खड्ड्यात टाकावेत.

रोप प्रक्रिया

ह्मुमिक जेल – १०० ग्रॅम आणि व्ही-सी.ओ.सी. – ५० ग्रॅम १०० लीटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात रोपे बुडवून जून - जुलै महिन्यात रोपांची लागवड करावी.

पहिल्या वर्षाचे नियोजन

पहिली आळवणी (ड्रिंचिंग) - लागवडीनंतर १० ते १५ दिवसांनी पहिली आळवणी (ड्रेंचिंग) करावी. ह्युमिक जेल – १०० ग्रॅम, व्ही-सी.ओ.सी. – ५० ग्रॅम, व्ही-गार्ड (१९:१९:१९) – २०० ग्रॅम १५ लिटर पंपातून लागवडीनंतर १० ते १५ दिवसांनी पहिली आळवणी (ड्रिंचिंग) करावी.

एकरी ह्युमिक जेल – १ किलो, व्ही-सी.ओ.सी. – ५०० ग्रॅम, व्ही-गार्ड (१९:१९:१९) – २ किलो ठिबक सिंचनाद्वारे सोडावेत.

२. दुसरी आळवणी - दुसरी आळवणी एप्रिल ते मे महिन्यात करावी. व्ही-डेल्टा सुपर - १०० ग्रॅम २०० लिटर पाण्यात मिसळून प्रती एकर ठिबक सिंचनाद्वारे सोडावेत. लक्षात ठेवा अगोदर झाडाभोवती चांगल्याप्रकारे आळे (रिंगण) करून घ्यावे व नंतर पाणी दिल्यावर वरील आळवणी करून घ्यावी.

पहिली फवारणी

पहिली फवारणी लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसात करावी. फवारणीसाठी हयूमिक जेल – २५ ग्रॅम, चॅलेजर – ५ मिली, व्ही-ठोको - २५ ग्रॅम, व्ही-प्राईड - १० ग्रॅम १५ लिटरच्या पंपातून करावी. द्रावणात पॉवर सेव्हर हे स्टिकर १० मिली या प्रमाणात मिसळूनच फवारणी करावी. गरज भासल्यास पिकाच्या स्थितीनुसार पहिली फवारणी पुन्हा करावी.

खत व्यवस्थापन

खताची पहिली मात्रा - खताची पहिली मात्रा लागवडीनंतर ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात द्यावी. त्यासाठी डी.ए.पी. – १५० ग्रॅम, हाय पॉवर – १०० ग्रॅम, शक्ती गोल्ड – १०० ग्रॅम, पोटॅश – १०० ग्रॅम, निंबोळी पेंड – १०० ग्रॅम हे घटक प्रती झाडाला द्यावे. हे घटक खत प्रति झाड वर्षातून दोनदा द्यावेत.

खताची दुसरी मात्रा - खताची दुसरी मात्रा मे महिन्यात द्यावी. अगोदर जमीन ४ ते ५ वेळा नांगरून किंवा नीट खोदून घ्यावी. नंतर एकरी सिंगल सुपर फॉस्फेट - १ बॅग (५० किलो), जय संजीवनी - ५ किलो खताची मात्रा देऊन पुन्हा एक पाळी मारून घ्यावी. या खताची मात्रा दिल्यानंतर झाडांना ठिबकद्वारे चांगले पाणी द्यावे.

झाडाची छाटणी करणे

झाडाचा विस्तार एकसारखा होण्यासाठी तसेच खुंट मजबूत होण्यासाठी आणि झाडाच्या खोडाची व्यवस्थित वाढ होण्यासाठी लागवडी नंतर कलमाला भक्कम आधार देण्यासाठी छाटणी केली जाते. खुंटावर फुट वाढू देऊ नये यासाठी बोर्डोपेस्टचा वापर करावा. खुंटाच्या खोडावरील सुप्त डोळ्यांची फुट थांबविण्यासाठी ५% तीव्रतेची बोर्डोपेस्ट लावावी. पावसाळयापूर्वी आणि हिवाळ्यात अळी दोनदा बोर्डो पेस्ट लावावी. कॉपर सल्फेट - २ किलो, झिंक सल्फेट - २ किलो, चुना - २ किलो ६० लिचर पाण्यात मिसळून बोर्डोपेस्ट तयार करावी.

Salam Kisan
Paddy Plantation : आधुनिक पद्धतीने भातलागवडीला पसंती

तिसऱ्या वर्षाचे नियोजन

खताची पहिली मात्रा - खताची पहिली मात्रा जून ते जुलै महिन्यात द्यावी. त्याअगोदर झाडाभोवती आळे (रिंगण) तयार करून घ्यावे. शेणखत - १० किलो, डी.ए.पी – २०० ग्रॅम, हाय पॉवर – १५० ग्रॅम, शक्ती गोल्ड – १५० ग्रॅम, निंबोळी पेंड – १५० ग्रॅम हे घटक प्रति झाड रिंगण पद्धतीने द्यावेत.

खताची दुसरी मात्रा

खताची दुसरी मात्रा ऑक्टोम्बर ते नोव्हेंबर महिन्यात द्यावी. अगोदर जमीन ४ ते ५ वेळा नांगरून किंवा नीट खोदून घ्यावी व नंतर खालील खताची मात्रा देऊन पुन्हा एक पाळी मारून घ्यावी. १०:२६:२६ - १५० ग्रॅम, हाय पॉवर – १०० ग्रॅम, शक्ती गोल्ड – १०० ग्रॅम, पोटॅश – १०० ग्रॅम, निंबोळी पेंड – १०० ग्रॅम प्रती झाड द्यावे. या सर्व घटकांचे मात्रा रिंगण पद्धतीने द्यावी.

पहिली आळवणी - पहिली खताची मात्रा दिल्यावर ३० ते ४० दिवसांनी पहिली आळवणी करावी. यासाठी ह्युमिक जेल – १०० ग्रॅम, व्ही-सी.ओ.सी. – ५० ग्रॅम, व्ही-गार्ड (१९:१९:१९) – २०० ग्रॅम प्रति १५ लिटर पंपातून द्यावेत.

ह्युमिक जेल – १ किलो, व्ही-सी.ओ.सी. – ५०० ग्रॅम, व्ही-गार्ड (१९:१९:१९) – २ किलो हे घटक प्रति एकर प्रमाणे ठिबक सिंचनातून सोडावेत.

पहिली फवारणी

पहिली फवारणी पहिली आळवणी नंतर ६० ते ७० दिवसात करावी. त्यासाठी हयूमिक जेल – २५ ग्रॅम, चॅलेजर – ५ मिली, व्ही-साफ – २५ ग्रॅम हे घटकांची २०० लिटर पाण्यात मिसळून फवारावेत. फवारणीसोबत पॉवर सेव्हर (स्टिकर) - १० मिली प्रति पंप वापराने अनिवार्य आहे.गरज भासल्यास पिकाच्या स्थितीनुसार पहिली फवारणी पुन्हा करावी.

पिकावर जर अळीचा प्रादुर्भाव आढळला तर निम हंटर - १०० मिली २०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. प्रत्येक फवारणीसोबत पॉवर सेव्हर (स्टिकर) - ५ मिली प्रति पंप वापराने अनिवार्य आहे. गरज भासल्यास पिकाच्या स्थितीनुसार पहिली फवारणी पुन्हा करावी.

झाडाची छाटणी करणे

झाडाचा विस्तार एकसारखा होण्यासाठी तसेच खुंट मजबूत होण्यासाठी आणि झाडाच्या खोडाची व्यवस्थित वाढ होण्यासाठी लागवडी नंतर कलमाला भक्कम आधार देण्यासाठी छाटणी केली जाते. खुंटावर फुट वाढू देऊ नये यासाठी बोर्डोपेस्टचा वापर करावा. खुंटाच्या खोडावरील सुप्त डोळ्यांची फुट थांबविण्यासाठी ५% तीव्रतेची बोर्डोपेस्ट लावावी. पावसाळयापूर्वी आणि हिवाळ्यात अळी दोनदा बोर्डो पेस्ट लावावी. कॉपर सल्फेट - २ किलो, झिंक सल्फेट - २ किलो, चुना - २ किलो ६० लिटर पाण्यात मिसळून बोर्डोपेस्ट तयार करावी.

( सलाम किसान हे एक सुपर अॅप आहे. वरील माहिती सलाम किसानकडून पुरवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन प्रत्यक्ष शेतात तांत्रिक माहितीचा अवलंब करावा.)

दुसऱ्या वर्षाचे नियोजन

खताची पहिली मात्रा

खताची पहिली मात्रा जून ते जुलै महिन्यात द्यावी. त्याअगोदर झाडाभोवती आळे (रिंगण) तयार करून घ्यावे. शेणखत - १० किलो, डी.ए.पी. – १०० ग्रॅम, हाय पॉवर – १०० ग्रॅम, शक्ती गोल्ड – १०० ग्रॅम, निंबोळी पेंड – १०० ग्रॅम अशी खतमात्रा प्रती झाडाला द्यावी.

पहिली आळवणी (ड्रिंचिंग)

पहिली खताची मात्रा दिल्यावर ८ ते १० दिवसांनी पहिली आळवणी करावी. ह्युमिक जेल – १०० ग्रॅम, व्ही-सी.ओ.सी. – ५० ग्रॅम, व्ही-गार्ड (१९:१९:१९) – २०० ग्रॅम या घटकांची १५ लिटर पंपातून आळवणी करावी.

ह्युमिक जेल – १ किलो, व्ही-सी.ओ.सी. – ५०० ग्रॅम, व्ही-गार्ड (१९:१९:१९) – २ किलो हे घटक एकरी हे घटक एकरी ठिबक सिंचनातून सोडावेत.

पहिली फवारणी

पहिली फवारणी पहिल्या आळवणी नंतर ६० ते ७० दिवसात करावी. हयूमिक जेल – २५ ग्रॅम, चॅलेजर – ५ मिली, व्ही-साफ – २५ ग्रॅम हे घटक २०० लिटर पाण्यात मिसळून फवारावेत. प्रत्येक फवारणीसोबत पॉवर सेव्हर (स्टिकर) - १० मिली प्रति पंप वापराने अनिवार्य आहे. गरज भासल्यास पिकाच्या स्थितीनुसार पहिली फवारणी पुन्हा करावी.

पिकावर जर अळीचा प्रादुर्भाव आढळला तर निम हंटर - १०० मिली २०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. प्रत्येक फवारणीसोबत पॉवर सेव्हर (स्टिकर) - ५ मिली प्रति पंप वापराने अनिवार्य आहे. गरज भासल्यास पिकाच्या स्थितीनुसार पहिली फवारणी पुन्हा करावी.

खताची दुसरी मात्रा

खताची दुसरी मात्रा ऑक्टोम्बर ते नोव्हेंबर महिन्यात द्यावी. अगोदर जमीन ४ ते ५ वेळा नांगरून किंवा नीट खोदून घ्यावी व नंतर खालील खताची मात्रा देऊन पुन्हा एक पाळी मारून घ्यावी. १०:२६:२६ - १५० ग्रॅम, हाय पॉवर – १०० ग्रॅम, शक्ती गोल्ड – १०० ग्रॅम, पोटॅश – १०० ग्रॅम, निंबोळी पेंड – १०० ग्रॅम ही खते प्रती झाड द्यावीत. या सर्व घटकांची मात्रा रिंगण पद्धतीने द्यावी.

झाडाची छाटणी करणे

झाडाचा विस्तार एकसारखा होण्यासाठी तसेच खुंट मजबूत होण्यासाठी आणि झाडाच्या खोडाची व्यवस्थित वाढ होण्यासाठी लागवडी नंतर कलमाला भक्कम आधार देण्यासाठी छाटणी केली जाते. खुंटावर फुट वाढू देऊ नये यासाठी बोर्डोपेस्टचा वापर करावा. खुंटाच्या खोडावरील सुप्त डोळ्यांची फुट थांबविण्यासाठी ५% तीव्रतेची बोर्डोपेस्ट लावावी. पावसाळयापूर्वी आणि हिवाळ्यात अळी दोनदा बोर्डो पेस्ट लावावी. कॉपर सल्फेट - २ किलो, झिंक सल्फेट - २ किलो, चुना - २ किलो ६० लिचर पाण्यात मिसळून बोर्डोपेस्ट तयार करावी.

Salam Kisan
Orange Cultivation : अपारंपरिक क्षेत्रात संत्रा लागवड वाढीला मर्यादा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com