Sugarcane Cultivation
Sugarcane CultivationAgrowon

Sugarcane Cultivation : पूर्वहंगामी ऊस लागवडीचे नियोजन

पूर्वहंगामी ऊस लागवड ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी. भारी जमिनीत ४.५ ते ५ फुटावर आणि मध्यम भारी जमिनीत ४ ते ४.५ फुटावर सऱ्या पाडाव्यात. एक डोळा पद्धतीने डोळा वरच्या बाजूस ठेवून १ फूट अंतरावर आणि दोन डोळ्यांची टिपरी वापरावयाची असल्यास दोन टिपऱ्यांमधील अंतर अर्धा फूट ठेवून डोळे बाजूला येतील अशा पद्धतीने लागवड करावी.
Published on

ऊस लागवडीसाठी (Sugarcane Cultivation) पाण्याचा उत्तम निचरा होणारी, ६० ते १२० सेंमी खोलीची मध्यम ते भारी जमीन असावी. जमिनीचा सामू ६.५ ते ८.०० पर्यंत असावा. सेंद्रिय कर्बाचे (Organic Carbon) किमान प्रमाण ०.६५ टक्क्यांपेक्षा अधिक असावे. पाण्याचे एकसारखे वितरण होण्यासाठी जमिनीला ०.१ ते ०.३ टक्का उतार असावा.

Sugarcane Cultivation
Sugarcane Season : काटामारी विरोधात कारवाईची नवी कार्यपद्धत लागू

जमिनीची घनता १.४ पेक्षा कमी आणि जमिनीतील हवेचे प्रमाण ५० टक्के असावे. पाणीपातळी १.५ ते २ मीटरपेक्षा खोल असावी. भारी जमिनीतील १.५ ते २ फूट खोलीवरील जमिनीचा कठीण थर फोडण्यासाठी दर ३ वर्षांतून एकदा १ ते १.५ मीटर अंतरावर उताराच्या दिशेने सब सॉयलरने नांगरट करावी. मुख्य चरापर्यंत नांगराची तासे काढावीत. उसाच्या रिजरच्या साहाय्याने भारी जमिनीत १५० सेंमी अंतरावर (पाच फुटांवर) उतार पाहून सऱ्या पाडाव्यात.

सेंद्रिय खतासाठी शेणखत, हिरवळीचे खत, गांडूळ खत, प्रेसमड कंपोस्ट, पोल्ट्रीखत, लेंडीखत, पेंडी वापरणे आणि शेतात बकरी बसविणे या पर्यायातून सेंद्रिय खताचा वापर करावा. सेंद्रिय घटकांमुळे सूक्ष्म जिवाणू, गांडुळे, विकरे व सेंद्रिय आम्ले यांचे जमिनीतील प्रमाण वाढल्याने उसाची चांगली वाढ होते. या तंत्राने जमीन सुपीक, सधन आणि जिवाणू समृद्ध होते. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते. त्याचप्रमाणे सेंद्रिय अन्नद्रव्य पिकास उपलब्ध झाल्याने ऊस आणि कांड्यांची संख्या, लांबी, जाडी, वजन वाढल्याने उत्पादनात भरीव वाढ होते.

Sugarcane Cultivation
Sugarcane Season : वजन काट्याबाबत अजूनही काही त्रुटी

सुधारित जाती

 पूर्वहंगामी लागवड करण्यासाठी फुले २६५, को ८६०३२ या मध्यम पक्वतेच्या आणि फुले १०००१, को ९४०१२, व्हीएसआय ०८००५ आणि कोल्हापूर विभागासाठी को ९२००५ या सुधारित व अधिक ऊस आणि साखर उतारा देणाऱ्या जातींची निवड करावी. लागवडीसाठी बेणेमळ्यात वाढविलेले ९ ते १० महिने वयाचे निरोगी, रसरशीत, लांब कांड्याचे आणि फुगीर डोळ्याचे शुद्ध बेणे वापरावे. आनुवंशिकदृष्ट्या शुद्ध बेणे वापरल्यास उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते. खात्रीशीर रोपवाटिकेतूनच रोपे घ्यावीत.

काणी रोग तसेच कांडीवरील खवले कीड, पिठ्या ढेकूण नियंत्रणासाठी १०० लिटर पाण्यात १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम आणि ३०० मिलि डायमिथोएट मिसळून या द्रावणात १० मिनिटे बेणे बुडवावे. या प्रक्रियेनंतर अ‍ॅसिटोबॅक्टर १० किलो आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक १.२५ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात टिपरी ३० मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी. जिवाणू संवर्धकाच्या प्रक्रियेमुळे ५० टक्के नत्र व २५ टक्के स्फुरद खतांची बचत होते, उत्पादनात वाढ होते. (ॲग्रेस्को शिफारस)

सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञान

 या तंत्रज्ञानामध्ये एक डोळ्याची टिपरी चुन्याची निवळीमध्ये (०.३ टक्का) रात्रभर बुडवून ठेवाव्यात म्हणजे रोपवाटिकेत रोपांची उगवण चांगली होते.

 गादीवाफ्यात गोणपाटावर २ इंच पोयटा मातीचा थर देऊन त्यावर प्रक्रिया केलेल्या टिपऱ्या एकसारख्या पसरून नंतर पुन्हा शेणखत, पोयटा मातीने झाकावे. तुषार सिंचनाने पाणी देऊन पाचटाने झाकावे.

 उष्णतामान कमी असल्यास पॉलिथिन ताडपत्रीने झाकावे. चार दिवसांनी पाचट आणि ताडपत्री बाजूला करावी. त्यातून बेण्यास जोरदार धुमारे उगवलेले दिसतात. त्याची निगा राखून ३ ते ४ आठवड्यांमध्ये लागवड करावी.

लागवड

 लागवड ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी. रिजरच्या साह्याने भारी जमिनीत ४.५ ते ५ फुटांवर आणि मध्यम भारी जमिनीत ४ ते ४.५ फुटांवर सऱ्या पाडाव्यात. सरीची लांबी उतारानुसार २० ते ४० मीटर ठेवावी.

एक डोळा पद्धतीने डोळा

वरच्या बाजूस ठेवून १ फूट अंतरावर आणि दोन डोळ्यांची टिपरी वापरावयाची असल्यास दोन टिपऱ्यांमधील अंतर अर्धा फूट ठेवून डोळे बाजूला येतील अशा पद्धतीने लागवड करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com