फलटणची ‘नारी’

१९५६ मध्ये अमेरिकेतीलच युनिव्हर्सिटी ऑफ अरिझोना विद्यापीठातून एम.एस. (ॲग्रिकल्चर) होऊन वडिलोपार्जित जमीन व घर फलटणमध्ये असल्याने मुंबईपेक्षा तिथेच पत्नीसह स्थायिक होण्याचा निर्णय वडिलांच्या मनाविरुद्ध घेतला. त्यांनी १९६८ मध्ये ‘नारी’ संस्था स्थापन केली.
फलटणची ‘नारी’
फलटणची ‘नारी’Agrowon

डॉ. चंदा निंबकर

बनबिहारी निंबकर (Banbihari Nimbkar) यांनी रटगर्स युनिव्हर्सिटी या अमेरिकेतील सुप्रसिद्ध विद्यापीठातून १९५२ मध्ये बी. एस. (ॲग्रिकल्चर) ही पदवी मिळवली. त्यानंतर १९५६ मध्ये अमेरिकेतीलच युनिव्हर्सिटी ऑफ अरिझोना विद्यापीठातून (University Of Arizona) एम.एस. (ॲग्रिकल्चर) होऊन वडिलोपार्जित जमीन व घर फलटणमध्ये असल्याने मुंबईपेक्षा तिथेच पत्नीसह स्थायिक होण्याचा निर्णय वडिलांच्या मनाविरुद्ध घेतला. त्यांनी १९६८ मध्ये ‘नारी’ संस्था (Nari Sanstha) स्थापन केली.

एका माणसाने चालू केलेल्या संस्था अनेक असतात, तशीच ही ‘नारी’ संस्था बनबिहारी निंबकर यांनी १९६८ मध्ये स्थापन केली. तिने आता ५४ व्या वर्षात पदार्पण केले आहे. बनबिहारी निंबकर २०२१ मध्ये वयाच्या नव्वदाव्या वर्षी निवर्तले. त्याआधीची साधारण सात-आठ वर्षे त्यांनी आपले संशोधन क्षेत्रातील काम थांबवले होते. म्हणजे सलग ४०-४५ वर्षे त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी एका ध्यासाने प्रेरित होऊन ‘नारी’ संस्थेत काम केले.

फलटणची ‘नारी’
Indian Agriculture : गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पदासाठी फुटले भाव

‘नारी’ने पिके, अपारंपरिक ऊर्जा व पशुसंवर्धन या क्षेत्रांमध्ये उच्च दर्जाचे शास्त्रीय पण त्याच वेळी शेतकरी आणि पशुपालकांना उपयुक्त असे काम उभे केले. तेसुद्धा फलटणसारख्या ग्रामीण भागात अनंत अडचणींना तोंड देऊन. हे शक्य झाले याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे यात गुंतलेल्या सर्वांची पगाराला कमी महत्त्व देऊन आपल्याला हवे ते व उपयोगी काम स्वतंत्रपणे करण्याच्या संधीला जास्त महत्त्व देण्याची ध्येयवादी वृत्ती आणि निंबकर कुटुंबीयांना शेती वगैरे उत्पन्नाचे इतर स्रोत उपलब्ध असणे हे होय.

संस्था उभारणीसाठी निंबकर यांचा विशिष्ट दृष्टिकोन, बुद्धीची झेप व दांडगा वाचन व्यासंग, त्याचप्रमाणे पैशाचा उपयोग ऐषाराम, मौजमजा, इस्टेट जमवणे यात करण्यात स्वारस्य नसणे आणि त्याऐवजी नवनवीन संशोधन करणे व ते शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाण्याचीच एक प्रकारची मस्ती असणे ही बनबिहारी निंबकरांची वृत्तीही ‘नारी’ संस्थेच्या अफाट व अफलातून कामाला कारणीभूत होती.

बनबिहारी निंबकर हा फलटणमध्ये मारवाड पेठेत राहणाऱ्या रामचंद्र केशव निंबकर ऊर्फ काका दहिगावकर या नावाजलेल्या वैद्यांचा नातू. अमेरिकन आई आणि भारतीय वडिलांचा एकुलता एक मुलगा. १७ जुलै १९३१ला या मुलाचा जन्म झाला. वडिलांच्या बंगाली मित्राने नाव सुचवलं ‘बनविहारी’ पण त्या मित्राच्या बंगाली धाटणीच्या उच्चारांमुळे ते झालं ‘बॉनोबिहारी’ अथवा ‘बॉन’. बॉनला डॉक्टर व्हायचे होते, पण वडिलांनी त्याला शेतीचे शिक्षण घेण्याची व भारतात येऊन भारतातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी काम करण्याची प्रेरणा दिली...

(सविस्तर लेख वाचा दिवाळी अंकात.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com