हिमाचलमध्ये ५० हजार एकर क्षेत्रात नैसर्गिक शेती !

राज्यातील नैसर्गिक शेती उत्पादनांसाठी दोन समर्पित बाजारपेठ उभारण्यात येणार आहे. तर नैसर्गिक शेती उत्पादनांच्या विक्रीसाठी १० स्वतंत्र बाजारपेठा उपलब्ध करून देण्यात येणारेत. या १० बाजारपेठा दिल्लीतील नैसर्गिक शेती उत्पादनांच्या बाजारपेठेशी जोडलेल्या असतील.
Natural Farming In HImachal
Natural Farming In HImachal
Published on
Updated on

हिमाचल प्रदेशात २०२२-२०२३ अखेरीस ५० हजार एकर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली (Natural Farming) आणण्यात येणारंय. मुख्यमंत्री जयराम ठाकूर (Jai Ram Thakur) यांनी राज्याच्या अर्थसंकल्प (Budget 2022) सादर करताना या संकल्पाची माहिती दिलीय. 

राज्यातील किमान ५० हजार एकर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली (Natural Farming)आणण्यात येणार आहे. ३६१५ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून हिमाचल प्रदेश सरकार हे उद्दिष्ट साध्य करणार आहे. हे उद्दिष्ट प्रत्यक्षात आल्यावर या परिसरातील इतर अनेक शेतकरीही नैसर्गिक शेती (Natural Farming) करायला प्रेरित होतील, असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केलाय. 

केंद्र सरकारच्या निकषांचे पालन करत राज्यातील १०० गावे ही नैसर्गिक शेती करणारी गावे म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. या गावांतील ५० हजार शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतकरी (Natural Farmer) म्हणून घोषित करण्यात येणारे .तसे प्रमाणपत्रही त्यांना देण्यात येणार आहेत. 

हिमाचल प्रदेशातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत नैसर्गिक शेतीची (Natural Farming) माहिती पोहचवण्यासाठी एक संकेतस्थळ सुरु करण्यात येणार आहे. या संकेतस्थळावर शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीबद्दलची अद्ययावत माहिती मिळू शकेल. 

राज्यातील नैसर्गिक शेती उत्पादनांसाठी दोन समर्पित बाजारपेठ उभारण्यात येणार आहे. तर नैसर्गिक शेती उत्पादनांच्या विक्रीसाठी १० स्वतंत्र बाजारपेठा उपलब्ध करून देण्यात येणारेत. या १० बाजारपेठा  दिल्लीतील नैसर्गिक शेती उत्पादनांच्या बाजारपेठेशी जोडलेल्या असतील. 

शेती आणि संलग्न क्षेत्राच्या (Agriculture and Allied Sector) विकासासाठी राज्य सरकारने नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद (Ramesh Chand) यांच्या नेतृत्वाखाली एक तज्ञांचा गट स्थापन केला आहे. या गटाच्या कामकाजाबाबतची घटना व कृती आराखडाही तयार करण्यात आल्याचे ठाकूर यांनी नमूद केलाय.

व्हिडीओ पहा- 

राज्याच्या गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात कृषी (Agriculture) आणि फलोत्पादन (Horticulture)विद्यापीठाच्या निधीत वाढ करण्यात आली होती. या दोन्ही विद्यापिठांच्या पदवी (Graduate) आणि पदव्युत्तर (Post Graduate) अभ्यासक्रमात नैसर्गिक शेतीचा समावेश करण्यात येणारेय. 

२०२२-२०२३ च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने नैसर्गिक शेतीसाठी १५०० कोटी रुपयांची तरतूद केली असून हिमाचल प्रदेश सरकारने यापूर्वीपासूनच सरकारी स्तरावरून नैसर्गिक शेतीचा पुरस्कार केला असल्याचंही ठाकूर यांनी नमूद केलंय.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com