Dairy Product
Dairy ProductAgrowon

दुग्धजन्य पदार्थ टिकविण्यासाठी आधुनिक तंत्र

उत्तम पॅकेजिंगचा वापर करून पदार्थ आहे त्या परिस्थितीत जास्तीत जास्त टिकविण्यास मदत होते. बाजारात ब्रॅण्ड तयार करण्यासाठी पॅकेजिंग महत्त्वाचे आहे.

डॉ. अनिता चप्पलवार, डॉ. सचिदानंद साखरे

दुधामध्ये स्निग्धांश प्रथिने (Butterfat Proteins In Milk), मेद, जीवनसत्त्वे आणि पाणी यांचे प्रमाण मुबलक असल्याने सूक्ष्मजीवांची (Micro Organism) वाढ होते, पर्यायाने दूध (Milk) लवकर नासते. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थ टिकविण्यासाठी मर्यादा येतात. पदार्थ टिकविण्यासाठी आणि ग्राहकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवण्यासाठी ‘पॅकेजिंग’ (Dairy Packaging) हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. अपूर्ण पॅकेजिंग असलेले किंवा पॅकिंग नसलेले पदार्थ हे त्यांच्या गुणधर्मात अनेक बदल दर्शवितात. त्यामुळे याचा परिणाम वितरणावर होतो. उत्तम पॅकेजिंगचा वापर करून पदार्थ आहे त्या परिस्थितीत जास्तीत जास्त टिकविण्यास मदत होते. बाजारात ब्रॅण्ड तयार करण्यासाठी पॅकेजिंग महत्त्वाचे आहे. पॅकेजिंगसाठी ग्रीस प्रूफ पेपर, पार्चमेंट पेपर (Parchment Paper) (बटर पेपर), प्लॅस्टिक कोटेड पेपर, पेपर बोर्ड आदी प्रकारांचा वापर करतात. विविध दुग्धपदार्थांसाठी वेगवेगळ्या पॅकेजिंगचा वापर केला जातो.

Dairy Product
Dairy : बनास दूध डेअरीकडून १६५० कोटींचा भाव फरक

१) खवा :

- पीएफए कायद्यानुसार खवा टिकविण्यासाठी कुठलाही पदार्थ वापरण्यास बंदी आहे.

-ॲल्युमिनिअम फॉइल आणि एलडीपीई पॉलिथिनमध्ये खवा पॅक करून तो १३ ते १५ अंश सेल्सिअस तापमानास ठेवल्यास १४ दिवसांपर्यंत चांगल्या स्थितीत टिकतो.

- लॅमिनेट्सचा वापर खवा पॅकिंगसाठी करतात.

२) बर्फी, पेढा ः

- बर्फी गरम अवस्थेत निर्जंतुक केलेल्या पॉलिस्टर टबमध्ये (२५० ग्रॅम) भरून मल्टिलेअर नायलॉन पाउचमध्ये हवाबंद पॅक केल्यास ३० अंश सेल्सिअस तापमानास ५२ दिवसांपर्यंत टिकते. यामध्ये हवाबंद पॅकिंग न करता ३० अंश सेल्सिअसपर्यंत तापमानास साठवल्यास बर्फी १५ दिवसांपर्यंत चांगल्या स्थितीत राहते.

- निर्जंतुक केलेल्या श्रिंक फिल्ममध्ये तीन आठवड्यांपर्यंत पेढे टिकतात.

- कार्डबोर्डमध्ये ५ अंश सेल्सिअस तापमानास पेढे ३० दिवसांपर्यंत टिकवता येतात.

Dairy Product
Dairy Sector: डेअरी क्षेत्रामुळे ग्रामीण अर्थकारणास चालना: नरेंद्र मोदी

३) रसगुल्ला, गुलाबजाम :

-दोन्ही पदार्थ बाजारात टीन कॅन्समध्ये मिळतात; परंतु हे कॅन्स आतून लॅकर्ड असायला हवेत. यामुळे दुग्धजन्य पदार्थ व कॅनचा थेट संपर्क न होता पदार्थ खराब होणार नाही.

- गुलाबजाम, रसगुल्ला टीन कॅन्समध्ये साधारण तापमानाला १८० दिवसांपर्यंत टिकतात.

- पॉलिस्टरीन कपमध्ये पॅक केलेले गुलाबजाम ५ अंश तापमानास ३० दिवसांपर्यंत राहू शकतात.

- गुलाबजाम साखरेच्या पाकात सर्वसाधारण तापमानास ५ ते ७ दिवस टिकतात.

४) पनीर :

- पनीर एक दिवस किंवा त्यापेक्षाही कमी टिकते.

- पनीरचे छोटे तुकडे करून ते टीन कॅनमध्ये पॅक करून टीन कॅनला १५ मिनिटांसाठी ऑटोक्लेव्हिंग केले, तर २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमानास सदर टीन कॅन्समध्ये पनीर ५ दिवसांपर्यंत टिकते.

५) दही :

- दह्यासाठी पॉलिस्टरीन कप वापरतात. पॉलिप्रोपॅलीन, पीव्हीसी यांचाही वापर केला जातो. पॉलिस्टरीन किंवा पॉलिप्रोपॅलिनच्या कपात दही पॅक करून ५ अंश सेल्सिअस तापमानामध्ये फ्रिजमध्ये ठेवल्यास दही सात दिवसांपर्यंत टिकू शकते.

६) बासुंदी :

- अ‍ॅल्युमिनियम फॉइलमध्ये ५ अंश सेल्सिअस तापमानामध्ये बासुंदी ३० दिवसांपर्यंत टिकते.

पॉलिप्रोपॅलीन कपमध्ये पॅक केलेली बासुंदी ७ अंश सेल्सिअस तापमानास २५ दिवसांपर्यंत टिकते.

७) श्रीखंड ः

श्रीखंडासाठी पॉलिस्टरीन आणि पॉलिप्रोपॅलिन पॅक करून १० अंश सेल्सिअस तापमानाला ठेवलेले श्रीखंड १८० दिवसांपर्यंत टिकवता येते.

८) लस्सी ः

- एलडीपीई (६०-८० मायक्रॉन) पाउचमध्ये पॅकिंग करून ५ अंश सेल्सिअस तापमानास ठेवलेली लस्सी ७ दिवसांपर्यंत टिकते.

दुग्धजन्य पदार्थांसाठी पॅकेजिंग

दुग्धपदार्थ --- पॅकेजिंगचा प्रकार

१) सुगंधी दूध, लस्सी ---एलडीपीई, एचडीपीई टीन कॅन, काचेच्या बाटल्या.

२) तूप, आटलेले दूध, दही, श्रीखंड ---पॉलिप्रोपॅलिन, पॉलिस्टरीन इ.

३) पेढा, बर्फी, कलाकंद, चीज, चोकोबार--- कार्डबोर्ड बॉक्स, वॅक्स कोडेट पेपर इ.

४) गुलाबजाम, रसगुल्ला, तूप, पनीर ---टीन कॅन, लॅमिनेटेड पाऊच, एचडीपीई इत्यादी

---------------------------------------------------

संपर्क ः डॉ. अनिता चप्पलवार, ९५२०२४०५०९

(पशुजन्य पदार्थ प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com