Orange Kalam Selection : संत्रा कलमांची निवड कशी करावी?

Orange Fruit Crop : संत्रा कलमांची लागवड पावसाळा सुरू होताना करणे उत्तम असते. एक पाऊस पडून गेल्यानंतर आणि पुढे ढगाळ हवामानाचा काळ सुरू झाल्यानंतर संत्रा कलमांची लागवड करावी.
Orange Kalam Selection
Orange Kalam SelectionAgrowon
Published on
Updated on

Orange Crop : संत्रा कलमांची (Orange Kalam) लागवड पावसाळा सुरू होताना करणे उत्तम असते. एक पाऊस पडून गेल्यानंतर आणि पुढे ढगाळ हवामानाचा काळ सुरू झाल्यानंतर संत्रा कलमांची लागवड करावी.

पावसाळा संपताना किंवा संपून गेल्यानंतर लागवड करणे टाळावे. त्या दृष्टीने मध्य जुलैपर्यंतचा काळ लागवडीसाठी चांगला असतो. संत्रा कलमांची निवड कशी करावी याविषय़ीची माहिती पाहुया. 

- योग्य खुंट व योग्य प्रकारचा डोळा यांच्या खात्रीसाठी कलमे कृषी विद्यापीठ, शासकीय परवानाधारक रोपवाटिकेतूनच घ्याव्यात.

- कलमे निरोगी, जास्त उत्पादन व दर्जेदार फळे देणाऱ्या मातृ वृक्षाचे डोळे वापरूनच तयार केलेली असावीत.

- संत्र्याच्या कलमा किकरपानी, वेलिया किंवा पानसोट असलेल्या मातृ वृक्षापासून तयार केलेली नसावीत.

Orange Kalam Selection
Orange Cultivation : संत्रा लागवडीसाठी कलमांची निवड

- कलमांची निवड करताना संत्र्याचा डोळा कोणत्या खुंटावर बांधलेला आहे हे पाहावे. कारण खुंटाचा, झाडाची शारीरिक वाढ, फळधारणाशक्ती, फळांचे गुणधर्म आणि झाडाचे आयुष्य यावर परिणाम पडत असतो.

- कलमे रोगप्रतिकारक्षम खुंटावर तयार केलेली असावीत.

- हलक्या व मध्यम जमिनीसाठी जंबेरी तर भारी जमिनीसाठी रंगपूर लिंबू या खुंटावरील कलमांची निवड करावी.

Orange Kalam Selection
Cotton Cultivation : कापूस सघन लागवड पद्धतीत वाणाची निवड कशी करावी?

- जबेरी किंवा रंगपूर लिंबू या खुंटावर २५ ते ३० सेंमी उंचीवर बांधलेल्या कलमा निवडाव्यात. कमी उंचीवर बांधणी केलेल्या कलमा मातीच्या आणि पाण्याच्या संपर्कात येऊन बुरशीजन्य रोगास बळी पडतात.

- कलमांचे फाटे परिपक्व झालेले असणे आवश्यक आहे. फाट्यावर पांढऱ्या बारीक रेषा असल्या तर फाटे परिपक्व झाले असे समजावे.

- साधारण ४५ ते ६० सेंमीपर्यंत सरळ वाढलेल्या कलमा चांगल्या असतात. अति उंच कलमा लागवडीसाठी वापरू नयेत. त्या कलमा वेलीया प्रकारच्या असण्याची शक्यता असते.

- कलमांवर पाने पोखरणारी किंवा पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव नसावा. तसेच कलम रोगमुक्त असावे.

- जुन्या झालेल्या खुंटावरील कलमे लागवडीस योग्य नसतात. साधारणतः एक वर्षे वयाची कलम लागवडीसाठी निवडावी.

- कलमांना भरपूर मुळे (जाळवा) असावीत. कलमांच्या खोडावर इतर फूट नसावी.

- डोळ्यांचा सांधा चांगला भरलेला, जखम व व्रणरहित असावा.

---------------

 माहिती आणि संशोधन - पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com