Poultry Feed : वयानुसार कोंबड्यांना खाद्य कस द्यायच?

कुक्कुटपालन व्यवसाय करताना कोंबड्यांच्या वयानुसार त्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक असतो.
Poultry Feed
Poultry FeedAgrowon
Published on
Updated on

कुक्कुटपालन (Poultry) व्यवसाय करताना कोंबड्यांच्या वयानुसार त्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक असतो.

एक दिवसाची पिल्ल विकत आणल्यापासून ती ६ आठवडे वयाची होईपर्यंतच व्यवस्थापन, शरीरवाढीसाठी सहा आठवड्यापासून २० आठवड्यापर्यंतच व्यवस्थापन आणि त्यापुढील लेअर म्हणजे अंड्यावरील कोंबड्यांच व्यवस्थापन (Poultry Management) या वयोगटानूसार कोंबड्यांच्या आहारात बदल करावेत.

Poultry Feed
Poultry Feed : कोंबड्यांना बुरशीयुक्त खाद्य देताय?

कोंबड्या १७ ते १८ आठवडे वयाच्या झाल्यानंतर त्यापुढ एक वर्षापर्यंत अंड्यासाठी व्यवस्थापन गरजेच आहे.

व्यवस्थापन बदलामध्ये वयानुसार कोंबड्यांच्या खाद्याची गरज बदलत असते. कोंबड्यांना संतुलित खाद्य, स्वच्छ निर्जंतुक पाणी आणि वेळो-वेळी रोगप्रतिबंधात्मक लसीकरण या सर्व गोष्टींच योग्य व्यवस्थापन केल्यास कुक्कुटपालन व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो.

पहिल्या आठवड्यानंतर आणि त्यानंतर १० ते १२ आठवड्यांनी कोंबड्यांची चोच कापून घ्यावी.

Poultry Feed
Feed Blocks : जनावरांसाठी खाद्य ठोकळे बनविण्यासाठी यंत्र

सुरुवातीचे ८ आठवडे कोंबड्यांना चिक मॅश आहार द्यावा. या खाद्यात प्रथिनांच प्रमाण सर्वात जास्त म्हणजे २२ % असतं. ८ आठवड्यापासून २० आठवडे वयाच्या कोंबड्यांना ग्रोवर फीड द्यावं. या खाद्यात प्रथिनांच प्रमाण १६ टक्के असत.

कोंबडीन अंडी द्यायला सुरुवात केल्यावर, म्हणजे कोंबडी २० आठवडे वयाची झाल्यावर ७२ आठवड्यापर्यंत तिला लेअर फीड देण्यास सुरुवात करावी. यातील प्रथिनांचं प्रमाण १७ टक्क्यापर्यंत असतं.

एक दिवसांची पिल्ले विकत घेताना त्यांना मॅरेक्स लस दिलेली असावी. पिल्ले ५ ते ७ दिवसांची झाल्यावर लासोटा एफ १ ची लस डोळ्यातून किंवा नाकातून द्यावी.

लासोटाचा बुस्टर डोस ५ व्या आठवड्यात द्यावा. गंबोरो रोगाविरुद्ध लस दुसऱ्या आठवड्यात म्हणजे ७ ते १४ दिवसांची पिल्ले झाल्यावर डोळ्यातून द्यावी.

कोंबड्याचे रोगप्रतिबंधात्मक लसीकरण केल्यानंतर कोंबड्यांना पुढील तीन दिवस व्हिटॅमिनचे मिश्रण पाण्यातून किंवा खाद्यातून द्याव. अस केल्यान कोंबड्यांवरील लसीकरणाचा ताण कमी होण्यास मदत होईल. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com