अतिवृष्टीमध्ये कापूस, तुरीचे व्यवस्थापन कसे कराल?

अतिपावसामुळे तूर, कापूस पिकामध्ये पाणी साचून पाने पिवळी पडून पिकाची वाढ खुंटलेली दिसून येत आहे.
Cotton
CottonAgrowon
Published on
Updated on

अतिपावसामुळे तूर, कापूस पिकामध्ये पाणी साचून पाने पिवळी पडून पिकाची वाढ खुंटलेली दिसून येत आहे. अशा परिस्थितीत शेतातील अतिरीक्त पाण्याचा निचरा करुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राने सुचविलेल्या उपाययोजना कराव्यात.

Cotton
कापूस पेरणीसाठी या गोष्टी महत्त्वाच्या

कापूस

- कापूस पिकामध्ये पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी शेतात एक ओळ सोडून लहान चर काढावेत.

- अकस्मिक मर किंवा मूळकुज दिसू लागल्यास कॉपरऑक्सिक्लोराईड २५ ग्रॅम अधिक युरिया २०० ग्रॅम अधिक पांढरा पोटॅश १०० ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन हे द्रावण झाडांच्या मुळा जवळ प्रति झाड १०० मिलि द्यावे. तसेच पीक ३० ते ४० दिवसांचे झाले असल्यास दोन टक्के युरीयाची फवारणी करावी. यासाठी २०० ग्रॅम युरिया प्रती दहा लिटर पाणी असे प्रमाण वापरावे.

- पिकाची वाढ पूर्ववत होऊन पात्या लागण होण्यासाठी पीक ४० ते ४५ दिवसाचे झाल्यावर नत्राचा पहिला हप्ता द्यावा. त्यासाठी कोरडवाहू कपाशी करिता ३१ किलो तर बागायती कपाशी करिता ५१ किलो निमकोटेड युरिया प्रति एकरी द्यावा.

Cotton
Cotton : दोन एकरांतील कापूस ‘मिलीपीड’ने केला उध्वस्त

- खत पाण्याचा निचरा झाल्यावरच द्यावे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागवड केलेला कापूस सध्या पाते अवस्थेत असल्यास आणि अशा परिस्थितीत जर पातेगळ होत असेल तर त्याच्या नियंत्रणासाठी एन ए ए या संजीवकाची ४० मिली प्रति १८० लिटर पाणी याप्रमाणे प्रति एकरी किंवा २.५ मिली प्रतिदहा लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. यामुळे पातेगळ थांबण्यास मदत होते.

- कपाशीवर रस शोषक किडी विशेषतः मावा व तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास पाच टक्के निंबोळी अर्क किंवा व्हर्टिसीलियम लेकॅनी ४० ग्रॅम किंवा अॅसीटामिप्रीड (२० टक्के) ६० ग्रॅम किंवा डायमीथोएट (३० टक्के) २६० मिली प्रति एकर या प्रमाणे फवारावे.

Cotton
तूर लागवड करताना कोणती काळजी घ्यावी?

तूर

तूर हे पीक अति पावसाला संवेदनशील आहे म्हणूनच तुरीच्या शेतातील साचून राहिलेले पाणी ताबडतोब शेताबाहेर काढणे अत्यंत गरजेचे आहे. तूर पिकात फाईटोप्थेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मरग्रस्त झाडे काढून टाकावीत. त्याठिकाणी चारही बाजूने एक मीटर अंतरावर कार्बेन्डाझिम २५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी.

जिथे कुठे मर रोगाची सुरुवात होत असल्यास कॉपर ऑक्सिक्लोराइड २५ ग्रॅम अधिक युरिया २०० ग्रॅम अधिक पांढरा पोटॅश १०० ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन झाडांच्या मुळांना प्रति झाड १०० मिली द्यावे.

हुमणी या किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास मेटारायझियम ४ किलो प्रति एकर याप्रमाणे जमिनीतून द्यावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com