कापूस पेरणीसाठी या गोष्टी महत्त्वाच्या

पेरणीसाठी निवडा योग्य वाण
Cotton cultivation
Cotton cultivationAgrowon
Published on
Updated on

यंदा देशात आणि राज्यात कापसाची लागवड (Cotton Sowing) वाढण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात कापसाला विक्रमी भाव (Cotton Rate) मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना यंदाही कापसाकडून मोठी अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकरी कडधान्य आणि तेलबियांचे काही क्षेत्र कापसाकडे वळवण्याची शक्यता आहे.

कापसाचे जास्तीत जास्त उत्पादन मिळण्यासाठी आणि कपाशीची गुणवत्ता टिकवून ठेवण्याकरिता पेरणीचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. कापूस बियाणे (Cotton Seed) खरेदी करताना पक्क्या बिलासह नामांकित कंपन्यांचे बीटी कापूस बियाणे किंवा कृषी विद्यापीठांनी तयार केलेल्या सुधारित व सरळ वाणांचे बियाणे खरेदी करावे. शक्यतो कमी कालावधीच्या वाणांची निवड करावी (Short Durational variety). कोरडवाहू कापसाची पेरणी (Cotton Sowing) १५ ते ३० जून किंवा मॉन्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यावर लवकरात लवकर करावी.

Cotton cultivation
Cotton Sowing राज्यात 42 lakh हेक्टरवर पोचणार|Soybean Perni|Agrowon

जमिनीच्या मगदुरानुसार वाणांची निवड

कपाशीचे पीक बहुतांशी मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे उत्तम जलधारणक्षमता असणारी जमीन निवडावी. अति खोल व खोल जमिनीमध्ये कपाशीचे सलग पीक घ्यावे. जमिनीच्या मगदूरानूसार कापूस वाणाची निवड करावी. उथळ किंवा हलक्या जमिनीत बीटी कापसाची लागवड करु नये. मागीलवर्षी ज्या शेतात सोयाबीन, मूग, उडीद, तूर किंवा ज्वारी यासारखी पिके घेतली आहेत त्या शेतात पिक फेरपालट म्हणून कापसाची लागवड केल्यास अधिक फायदा होतो. भारी काळ्या कापसाच्या जमिनीकरिता रसशोषक किडीस सहनशील बीटी हायब्रीड १८० दिवसांपेक्षा कमी कालावधीच्या वाणाची निवड करावी. पेरणीकरिता दर्जेदार, बीज प्रक्रिया केलेल्या शक्यतो तंतूविरहित वाणाचा उपयोग कारावा. (Sellection Of Cotton Variety)

Cotton cultivation
Soybean Cotton Seed rate मध्ये मोठी वाढ | Seed Price Hike | Agrowon | ॲग्रोवन

संकरित बीटी बागायती कापसाची पेरणी सरी वरंबा पद्धतीने करावी. ठिबक सिंचनाचा अवलंब करावा. भारी जमिनीकरिता लागवडीचे अंतर (Sowing Distance) १२० बाय ६० किंवा १२० बाय ९० सेंमी. ठेवावे. बियाण्याचे प्रमाण २ ते २.५ किलो घेऊन नत्र, स्फुरद आणि पालाश ही खते १२० ६० ६० या प्रमाणात द्यावीत.

कोरडवाहू देशी कपाशी लागवडीकरिता देशी सुधारित जातींपैकी एकेए-५, एकेए-७, एकेए-८, एकेए-८४०१ या वाणांची निवड करावी. पेरणी सरत्याने किंवा टोकून करावी. देशी कपाशीसाठी अंतर ६० बाय १५ सेंमी किंवा ६० बाय ३० सेंमी ठेवावे. हेक्टरी बियाण्याचे प्रमाण (Seed Rate) १२-१५ किलो वापरावे. देशी कपाशी करिता ४०:२०:२० किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टरी द्यावा. कोरडवाहू अमेरिकन सुधारित कापूस लागवडीकरिता एकेएच ९-५ (सुवर्ण शुभ्रा), पीकेव्ही रजत, एकेएच-८८२८, हे वाण ६० बाय ३० सेंमी अंतरावर पेरावे. एकेएच-० ८१ या वाणाची ६० बाय १५ सेंमी अंतरावर पेरणी करावी.

अतिघन लागवडीकरिता एकेएच -०८१ या वाणाची ६० बाय १० सेंमी अंतरावर हेक्टरी १५ किलो बियाणे घेऊन लागवड करावी. देशी संकरित कापूस लागवडी करिता पीकेव्ही डीएच १ व पीकेव्ही सुवर्णा या वाणांची लागवड करावी, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे. कोरडवाहू बीटी वाण ९० बाय ४५ सेंमी अंतरावर पेरावे. ओलितासाठी हे अंतर १२० बाय ३० सेंमी ठेवावे. कोरडवाहूसाठी रासायनिक खताची मात्रा ६०:३०:३० किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टरी द्यावी. म्हणजेच ६५ किलो युरिया, १८७ किलो सिंगल सुपर फॉस्फेट, ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश आणि लागवडीनंतर ३० दिवसांनी ६५ किलो युरिया प्रति हेक्टरी द्यावा. माती परीक्षणानुसार (Soil Testing) रासायनिक खतांचे नेमके प्रमाण ठरवावे. बागायती बीटी कपाशी साठी १२०:६०:६० किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टरी द्यावे. म्हणजेच ८७ किलो युरिया, ३७५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १०० किलो म्युरेट ऑफ पोटॅश पेरणीसोबत व पेरणीनंतर ३० दिवसांनी ८७ किलो युरिया आणि ६० दिवसांनी ८७ किलो युरिया प्रति हेक्टरी द्यावा.

Cotton cultivation
देशात यंदा कापूस लागवड वाढणार

तणव्यवस्थापन गरजेचे

कपाशीमध्ये तण स्पर्धेचा कालावधी पेरणीनंतर ६० दिवसांपर्यंत असतो. यामुळे पेरणीपासून दोन महिन्यांपर्यंत पीक तणमुक्त ठेवावे. तण नियंत्रण व जमिनीत हवा खेळती राहण्यासाठी आंतरमशागत (Interculture Operation) करणे गरजेचे आहे. याकरिता पहिली निंदणी पीक तीन आठवड्यांचे असताना करावी व लगेच कोळपणी करावी. यानंतर ६ आठवड्यानंतर दुसरी निंदणी व कोळपणी करावी. पिकास दोन खुरपणी निंदणी व ३ ते ४ कोळपण्या कराव्यात.

Cotton cultivation
कापूस पिकातील तण व्यवस्थापन

सुरुवातीच्या काळात कापसासाठी पाण्याची गरज कमी असते, पाते लागण्यापासून बोंडे लागण्यापर्यंत कपाशीसाठी पाण्याची गरज सर्वाधिक असते, त्यानंतर पुन्हा पाण्याची गरज कमी होते. सुरुवातीच्या काळात पावसाचे प्रमाण जास्त झाल्यास झाडांची व मुळांची वाढ खुंटते. फुले लागणे व बोंडे भरण्याच्या काळात पाण्याची कमतरता असल्यास उत्पादनावर विपरित परिणाम होतो. या काळात पाण्याचा ताण पडल्यास संरक्षित पाण्याची सोय करावी.

पीक संरक्षण

उत्पादनक्षमता अधिक असलेल्या संकरित बीटी वाणांची लागवड हलक्या जमिनीमध्ये केल्यास उपलब्ध अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे कपाशीमध्ये पाने लाल होण्याची लक्षणे दिसून येतात. पीक फेरपालट, पिकामध्ये संतुलित अन्नद्रव्याचा वापर करुन लाल्या विकृतीवर नियंत्रण मिळवता येते. मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, मिलीबग या रसशोषक किडींसोबतच कपाशीमध्ये विविध बोंड अळ्यांचा (Boll Worms) प्रादुर्भाव दिसून येतो. प्रभावी किड नियंत्रणासाठी एकात्मिक किड नियंत्रणाचा अवलंब करावा. (Integrated Pest Management)

Cotton cultivation
पूर्वहंगामी कापूस पीक मोडण्यास सुरुवात; गुलाबी बोंड अळीचा कहर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com