Pheromone Trap : कामगंध सापळ्यात पतंग कसे अडकतात?

kamgandh Sapala : कामगंध सापळा कसा काम करतो हे बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही नीट माहिती नाहीए. त्यामुळे तो शेतात नीट लावला जात नाही. त्यामुळे या सापळ्याचा म्हणावा तसा फायदा होत नाही. हा कामगंध सापळा कसा काम करतो आणि तो शेतात योग्य प्रकारे कसा लावायचा याची माहिती पाहुया.
Pheromone Trap
Pheromone TrapAgrowon
Published on
Updated on

Pest Control : अपल्या शेतातील पिकावर ताव मारत फिरणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळ्याचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. कारण कामगंध सापळ्यामुळे किडीच  कमी खर्चात आणि नैसर्गीक पद्धतीनं नियंत्रण होतं. पण हा कामगंध सापळा कसा काम करतो हे बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही नीट माहिती नाहीए. त्यामुळे तो शेतात नीट लावला जात नाही. त्यामुळे या सापळ्याचा म्हणावा तसा फायदा होत नाही. हा कामगंध सापळा कसा काम करतो आणि तो शेतात योग्य प्रकारे कसा लावायचा याची माहिती पाहुया.

किड एका वेळेला चारशे ते पाचशे अंडी घालते. म्हणूणच कीडीची संख्या झपाट्याने वाढते. अशा या किडीला आळा कसा घालायचा. यावर  एकच प्रभावी उपाय  आहे तो म्हणजे नर आणि मादी किटकाच होणार मिलन थांबवायचं. यातूनच कामगंध सापळ्याचा जन्म झाला. 

हा कामगंध सापळा कसा काम करतो. तर  किडीच्या  अंडी, अळी आणि कोष अशा मुख्य तीन अवस्था असतात. कोष फोडून कोषातून जेंव्हा पतंग बाहेर पडतात. तेंव्हा ते मादीच्या शोधात असतात. हे नर पतंग एवढ्या मोठ्या सृष्टीत मादीला कसं बर शोधत असतील. तर त्याचीही व्यवस्था निसर्गाने करुन ठेवलीय. मादी पतंग आपल्या शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा गंध सोडत असते. हाच तो कामगंध यालाच इंग्रजीमध्ये फेरोमन असं म्हणतात. या गंधाला शोधतच नर पतंग मादी पतंगाकडे येतो. आणि मग काय अपल्या पिकावर किडीचा अटॅक होतो. आता हेच जर आपण रोखल तर म्हणजे नराला मादीला भेटण्यापासून थांबवल तर पुढील पिढी तयार होणार नाही. मादीला आपण कामगंध सोडण्यापासून रोखू शकत नाही. पण या नराला जर गंडवलं तर...तुम्ही म्हणाल ते कसं तर मादी सोडते अगदी तशेच कामगंध बनवले तर.. संशोधनातून असा गंध असलेले ल्यूर कृत्रिम पद्धतीन तयार केले जातात. कामगंध सापळ्यात हे ल्यूर बसवले जातात. कामगंध सापळ्याचे दोन भाग असतात. एक म्हणजे कामगंध आणि दुसऱा म्हणजे सांगडा. यामध्ये कामगंध पतंगाला आपल्याकडे आकर्षीत करतो तर सांगडा पतंगाला पकडतो. आणि किडीच मिलन रोखल जात.

Pheromone Trap
Solar Light Insect Trap : सौर प्रकाश कीटक सापळ्याने कीड नियंत्रण कसं होतं?

हे गंध असलेले लिंग प्रलोभन म्हणजेच ल्यूर जे आपल्याला कोणत्याही कृषी सेवा केंद्रात मिळू शकतात. यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक किडीच्या पतंगासाठी वेगवेगळे ल्यूर वापरले जातात. त्यामुळे कपाशी, सोयाबीन, मका, तूर, वांगी, भेंडी या पिकांमध्ये पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी वेगवेगळे ल्युर वापरावे लागतात. 

Pheromone Trap
Solar Light Insect Traps : सौर प्रकाश किटक सापळे फायदेशीर...

या सपळ्याचा वापर  तीन प्रकारे करता येतो.

एक म्हणजे कामगंध सापळे वापरून किडींच सर्वेक्षण करता येत.दुसर म्हणजे जास्त सापळे लावून मोठ्या प्रमाणात किडीचे पतंग सापळ्यात पकडून त्यांचा नाश करणे. आणि कीटकांच्या मिलनात अडथळा निर्माण करून त्यांच्या पुनरुत्पादनाला अटकाव घालण.  ही झाली सापळ्याचा वापर करण्याचे प्रकार आता पाहुया सापळा वापरण्याची योग्य पद्धत आणि प्रमाण याबद्दल.

सापळ्याच्या प्लॅस्टिक पिशवीचे टोक जमिनीकडे येईल, अशा प्रकारे मजबूत काठीच्या एका टोकाला सापळा बांधावा. ती काठी पिकाच्या उंचीच्या एक ते दोन फूट इतकी उंच असावी. दोन सापळ्यामधील अंतर ५० मीटर ठेवाव. 

सापळ्याच्या वरच्या बाजूला एक छप्पर असत. त्याच्या आतील बाजूला एका खाचेमध्ये लिंग प्रलोभन म्हणजेच ल्युर लावले जाते.   हे  ल्युर पॅकेटमधून काढल्यानंतर साधारणपणे २०-२५ दिवसांपर्यंत त्याचा गंध टिकतो.

कामगंध सापळा पीकवाढीच्या सुरुवातीपासून किंवा फुलोरा अवस्थेपासून पाने खाणाऱ्या अळीच्या सर्वेक्षणासाठी ५ आणि मोठ्याप्रमाणात नर पतंग आकर्षित करण्यासाठी २० कामगंध सापळे प्रति हेक्टरी शेतात लावावेत.

सापळ्यात अडकलेले नर पतंग नष्ट करावेत. अशा प्रकारे कामगंध सापळ्यांचा वापर करून पतंगवर्गीय किडींचा नाश करून पिकांचे होणारे नुकसान टाळता येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com