Team Agrowon
किडींच्या पतंगांना एका विशिष्ट प्रकारच्या प्रकाशाचे आकर्षण असते.
प्रकाश बघितल्यावर किडीचे पतंग त्याकडे आकर्षिले जातात, हीच गोष्ट लक्षात घेऊन सौर प्रकाश सापळा विकसित करण्यात आला आहे.
सापळा पूर्णतः सूर्यप्रकाशावर चालतो. यासाठी संयंत्रातील बॅटरी ही सोलर फोटोव्होल्टाइन पॅनेलद्वारे चार्जिंग केली जाते, त्यामुळे विजेची बचत होते.
सापळ्याद्वारे यशस्वीरीत्या किडींवर नियंत्रण ठेवता येते.
2. सौर प्रकाश सापळ्याच्या वापरामुळे कीटकनाशकाच्या फवारणीत ७० ते ८० टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते.
सापळा वर्षानुवर्षे सतत चालतो, त्यामुळे दरवर्षी होणारा कीडनाशकांचा खर्च कमी होतो.