Flower Exhibition :`एम्प्रेस गार्डन`मध्ये बुधवारपासून पुष्पप्रदर्शन

पुष्पप्रदर्शन बुधवारी (ता. २५) दुपारी एक ते रात्री आठपर्यंत आणि २६ ते २९ जानेवारीपर्यंत सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
Flower Exhibition
Flower ExhibitionAgrowon
Published on
Updated on

घोरपडी : एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन (Empress Botanical Gardens) येथे २५ ते २९ जानेवारी दरम्यान पुष्प प्रदर्शन भरणार आहे. प्रदर्शनाचे उद्‍घाटन बुधवारी (ता. २५)  दुपारी १२.३० वाजता खासदार श्रीनिवास पाटील (MP Srinivas Patil) यांच्या हस्ते होणार आहे.

ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया (Agri Horticulture Society) या संस्थेच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे मानद सचिव सुरेश पिंगळे आणि विश्वस्त अनुपमा बर्वे यांनी दिली.

पुष्पप्रदर्शन बुधवारी (ता. २५)  दुपारी एक ते रात्री आठपर्यंत आणि २६ ते २९ जानेवारीपर्यंत सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

यंदाच्या वर्षीदेखील शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व हस्ताक्षर स्पर्धा रविवारी (ता.२२) आयोजित करण्यात आल्या आहेत.

Flower Exhibition
Rose Flower Exhibition : अकोल्यात दोन दिवस गुलाब फुलांचे प्रदर्शन

प्रदर्शनात विविध फुले, भाजीपाला, बोन्साय अशा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. प्रदर्शनात कर्नाटक, आंध्र प्रदेश, सिक्कीममधून विक्रेते येणार आहेत.

यामध्ये नर्सरी, शेतीची अवजारे, खते, कुंड्या, बागकामाचे साहित्य, खाद्यपदार्थ असे विविध स्टॉल असणार आहेत. यावर्षी जपानी पद्धतीने साकारलेल्या विविध पुष्परचना तसेच बोन्सायचे विविध प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com