Team Agrowon
ऊस पिक हे साधारण १२ ते १४ महिने घेत असल्याने बरेच शेतकरी ऊस पिकात आंतरपीक घेण्याचे नियोजन करतात.
कोल्हापूर येथील शेतकरी श्री शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या एक एकर शेतामध्ये ऊस लागण केलेली आहे
सोबतच आंतरपीक म्हणून त्यांनी फ्लावर करण्याचे नियोजन केले साधारण ७००० फ्लावरची रोपे त्यांनी लावलेली आहेत
फ्लावरची वाढ चांगल्या पद्धतीने होऊन येत्या एक महिन्यांमध्ये फ्लावर काढणीस येईल.
काढणी वेळेस एका फ्लावर चे वजन एक ते सव्वा किलो पर्यंत अपेक्षित आहे सात रुपये किलो दर गृहीत धरल्यास साधारण ४० ते ४२ हजार रुपयांचे उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे
उसाच्या मशागतीचा संपूर्ण खर्च यातून निघून जाईल व उसातून येणारे उत्पन्न निव्वळ नफा असेल असे श्री शिंदे यांनी सांगितले.