Orchard Plantation : कशी असावी फळबागेची आखणी ? रोपांसाठी खड्डा कसा भराल?

Fruit Crop Cultivation : फळबागेची लागवड कराताना फळबागेची आखणी जर व्यवस्थित असेल तर झाडांचा चांगला विस्तार होतो. याशिवाय रोपांची चांगली वाढ होण्यासाठी योग्य आकाराचे खड्डे खोदून ते व्यवस्थित भरले गेले पाहिजेत.
Fruit Farming
Orchard Plantation Agrowon
Published on
Updated on

Fruit Crop : महाराष्ट्राच हवामान सगळ्याच फळपिकासाठी अनुकूल आणि पोषक आहे. त्यामुळे सफरचंद वगळल तर बहुतेक सर्व फळपिकांची महाराष्ट्रात लागवड करता येते. पण फळबागेची लागवड कराताना फळबागेची आखणी जर व्यवस्थित असेल तर झाडांचा चांगला विस्तार होतो. याशिवाय रोपांची चांगली वाढ होण्यासाठी योग्य आकाराचे खड्डे खोदून ते व्यवस्थित भरले गेले पाहिजेत.

फळबागेची आखणी

फळबाग लागवडीसाठी जागेची आणि फळपिकांची निवड झाल्यानंतर लागवडीसाठी आखणी करण गरजेच आहे. जमिनीची आखणी करण्यापूर्वी लागवड पद्धत ठरवावी. फळपिके लागवडीच्या चौरस, आयताकृती, त्रिकोणी, षट्‌कोनी, आणि कंटूर म्हजेच उतारावरची लागवड अशा पद्धती आहेत. चौरस पद्धत ही सर्वात सोपी आणि आखणीला अडचण नसणारी आणि उभ्या-आडव्या मशागतीसाठी योग्य पद्धत आहे.

Fruit Farming
Orchard Plantation : हवामानानुसार फळपिकांची निवड कशी कराल?

आंबा, पेरू, चिकू, संत्रा, मोसंबी यासारख्या फळझाडांची लागवड या पद्धतीने केली जाते. या पद्धतीमध्ये झाडांच्या रांगा काटकोन करून असतात. दोन झाडांतील आणि दोन रोपांतील अंतर सारखच येत असल्यामुळे झाडे सर्व दिशांनी पाहिल्यास सारख्या अंतरावर दिसतात. या पद्धतीने लागवड करण खूप सोप होत.  

आपल्या जमिनीचा पोत आणि फळझाडांचा प्रकार कोणता आहे त्यानूसार खड्ड्यांचा आकार ठरवावा. खड्डे शक्यतो उन्हाळ्यात खोदावेत. हलक्या जमिनीत आणि जास्त विस्तार होणाऱ्या झाडासाठी मोठ्या आकाराचे खड्डे घ्यावेत. तर दीर्घायुषी झाडे असतील तर १ मीटर बाय १ मिटर बाय १ मीटर आकाराचा खड्डा घ्यावा. मध्यम आकाराच्या झाडांना ७५ बाय ७५  बाय ७५ सेंटीमीटर आणि लहान झाडांना ६० बाय ६० बाय ६० सेंटीमीटर आकाराचे खड्डे घ्यावेत. जमीन डोंगर उताराची असेल तर समपातळी रेषा काढून त्याप्रमाणे लागवड करावी.  

फळबागेसाठी खड्डा कसा भरायचा?

खड्डा खोदताना वरच्या आणि खालच्या थरातील माती वेगवेगळी टाकावी. खड्डे तीन आठवडे तापू द्यावेत, जेणेकरून कडक उन्हामुळे खड्ड्यांचे निर्जंतुकीकरण होईल. मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात खड्डे पुन्हा भरावेत. खड्डे मातीने भरताना खड्ड्याच्या तळाला वाळलेला पालापाचोळा १५ सेंटीमटीर पर्यंत भरावा.

मातीमध्ये २० ते २५ किलो चांगले कुजलेले शेणखत, २ ते ३ किलो गांडूळखत, २ ते ३ किलो निंबोळी पेंड, २५ ग्रॅम टायकोडर्मा, १५ ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जिवाणू, २५ ग्रॅम ॲझोटोबॅकटर हे मिश्रण मिसळून घ्यावे. खड्डा जमिनीच्या वर ५ ते ७ सेंमी उंच भरून ठेवावा. म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला लागवड करता येईल. अशा प्रकारे नवीन फळबागेची लागवड करताना काळजी घेतली तर भविष्यात भरघोस उत्पादन देणारी फळबाग तयार होईल. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com