Orchard Plantation : हवामानानुसार फळपिकांची निवड कशी कराल?

Team Agrowon

महाराष्ट्रातील हवामान सर्व फळपिकांच्या लागवडीसाठी अत्यंत अनुकूल आणि पोषक आहे. त्यामुळे सफरचंद वगळल्यास बहुतेक सर्व फळपिकांची यशस्वी लागवड करता येते.

Orchard Plantation | Agrowon

राज्याचा विचार करता पश्‍चिम महाराष्ट्रात आंबा, केळी, चिकू, पपई, नारळ अशा प्रकारची फळझाडे घेता येतात.

Orchard Plantation | Agrowon

पूर्वेकडील उष्ण व कोरड्या हवामानात संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, पेरू, द्राक्षे, डाळिंब यांसारखी फळझाडे घ्यावीत.

Orchard Plantation | Agrowon

कोकणसारख्या अति पावसाच्या भागात आंबा, काजू, चिकू, नारळ, फणस यांसारखी फळझाडे घ्यावीत.

Orchard Plantation | Agrowon

अत्यंत कमी पावसाचे प्रमाण असलेल्या भागात बोर, सीताफळ, आवळा, चिंच अशी कोरडवाहू फळझाडे घेण्याची शिफारस करण्यात येते.

Orchard Plantation | Agrowon

हवामानानुसार फळझाडांची लागवड न केल्यास फळे न येणे, फळे लागली तरी फळांची प्रत खालावणे, उशिरा फळे लागणे, रोग व किडींचा प्रादुर्भाव इत्यादी समस्या उद्‍भवतात.

Orchard Plantation | Agrowon

लागवडीपूर्वी माती, पाणी परिक्षण, लागवडीसाठी उत्तम कलमांची उपलब्धता या सर्व बाबींचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचा आहे.

Orchard Plantation | Agrowon

फळबागेचे नियोजन करताना जमिनीचा प्रकार, फळझाडांची निवड, बारमाही पाण्याची व्यवस्था, स्थानिक हवामानात कोणत्या प्रकारची फळझाडे येऊ शकतील.

Orchard Plantation | Agrowon

Mango Canning : कॅनिंगसाठी आंबा मिळण झाल अवघड