Crop Management : या पद्धतीने करा सोयाबीन, तूर पिकातील कीड, रोग नियंत्रण

ढगाळ आणि आर्द्रतायुक्त वातावरणामुळे भात आणि सोयाबीन पिकामध्ये विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
Soybean, Tur
Soybean, TurAgrowon
Published on
Updated on

हवामान अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रात कमाल आणि किमान तापमान सरासरी इतके राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे काढणी केलेल्या खरीप पिकांची (Kharip Crop) सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भात पीक (Paddy Crop) सध्या फुलोरा अवस्थेत आहे तर सोयाबीन पिकामध्ये (Soybean) सध्या शेंगा भरण्याची अवस्था सुरू आहे. ढगाळ आणि आर्द्रतायुक्त वातावरणामुळे भात आणि सोयाबीन पिकामध्ये विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. याशिवाय भात, सोयाबीन, तूर आणि ऊस पिकातील इतर व्यवस्थापनाविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सुचविलेल्या पुढील उपाययोजना कराव्यात . 

Soybean, Tur
Soybean Verity : पाण्याचा ताण सहन करणारी सोयाबीन जात विकसित

भात 

भात पीक सध्या फुलोरा अवस्थेत आहे. भात पिकात झिंक ची कमतरता आढळून आल्यास अशा ठिकाणी ०.२ % झिंक सल्फेट प्रति लिटर पाण्यातून द्यावे. ज्या ठिकाणी लागवड केलेली रोपे फुलोरा अवस्थेत आहे तिथे १० सेंमी पाण्याची पातळी ठेवावी. ढगाळ व दमट हवामानामुळे भात पिकावर कडा करपा, पर्ण करपा, तपकिरी ठिपके रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.  नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्‍लोराईड २५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. द्रावणात स्टिकर ०.१ % मिसळून फवारणी करावी. भात पिकात पाने गुंडाळणाऱ्या अळीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर म्हणजेच दोन प्रादुर्भावग्रस्त पाने प्रती चूड अढळून आल्यास शिफारशीनूसार फवारणी करावी. पाने गुंडाळणारी अळी,  खोडकिड आणि तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अॅसिफेट (७५ टक्के एस पी) ६०० ग्रॅम प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. 

Soybean, Tur
Paddy Advisory : भात सल्ला

सोयाबीन 

सोयाबीन पिकामध्ये सध्या शेंगा भरण्याची अवस्था सुरू आहे. विविध प्रकारच्या किडींच्या नियंत्रणासाठी पिकामध्ये ८ ते १० पक्षीथांबे उभारावेत. पाने खाणाऱ्या स्पोडोप्टेरा अळीच्या नियंत्रणासाठी हेक्टरी ५ स्पोडोल्यूर चा वापर करून फेरोमन सापळे लावावेत. नियंत्रणासाठी अंडी समूहांचा तसेच समूहाने आढळणाऱ्या अळ्यांचा वेळीच नायनाट केल्यास रासायनिक कीडनाशकांचा वापर टाळता येतो. रासायनिक कीडनाशकांचा वापर करणे अनिवार्य झाल्यास क्लोरपायरीफॉस (२० %) २० मिली किंवा सायपरमेथ्रीन (२५ %) ४ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. आर्द्रता युक्त वातावरणामुळे तांबेरा या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी प्रोपीकोनॅझोल किंवा हेक्झाकोनॅझोल १० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे. 

Soybean, Tur
Soybean Harvesting : सोयाबीन काढणीची मजुरी महागली

तूर 

तूर पिकामध्ये सध्या फांद्या फुटण्याची अवस्था आहे. किडींच्या प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन एकरी ५ या प्रमाणात कामगंध सापळे लावावेत. शेतात पाणी साचू न देता अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. आवश्यकतेनुसार कोळपणी किंवा खुरपणी करावी. त्यामुळे जमिनीतील ओलावा व अन्नद्रव्याची पिकांची परस्परांशी स्पर्धा होणार नाही.

ऊस ऊस पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. उसामध्ये हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी मेटारायझियम अॅनिसोप्ली  परोपजीवी बुरशी २० किलो प्रती हेक्टरी जमिनीत मिसळावे किंवा २.५ ते ३ किलो हेक्टरी फवारणीसाठी वापरावे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com