Kharif Season 2023 : खरीप हंगामासाठी फळे, भाजीपाला पिकाच्या या वाणाची निवड करा

Vegetable Crop Variety : संत्रा नविन बाग लागवडीसाठी नागपूर संत्रा, किन्नो तर मोसंबी नविन बाग लागवडीसाठी न्यूसेलर, सातगुडी व फुले मोसंबी इत्यादी जातींची निवड करावी.
Kharif Season 2023
Kharif Season 2023Agrowon
Published on
Updated on

Fruit Crop Variety : हवामान अंदाजानुसार मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात हळूहळू १ ते २ अंश सेल्सिअसने वाढून त्यानंतर पुढील तीन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

दिनांक ४ जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उसमानाबाद, परभणी जिल्हयात तर दिनांक ५ जून रोजी लातूर, उसमानाबाद, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे हवामान आधारीत कृषी सल्ल्याची शिफारस केली आहे.

संत्रा नविन बाग लागवडीसाठी नागपूर संत्रा, किन्नो तर मोसंबी नविन बाग लागवडीसाठी न्यूसेलर, सातगुडी व फुले मोसंबी इत्यादी जातींची निवड करावी.

नविन लागवड केलेल्या संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी.

नविन लागवड केलेल्या बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे.

नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. डाळिंब नविन बाग लागवडीसाठी भगवा, फुले भगवा सुपर, गणेश, फुले आरक्ता, इत्यादी जातींची निवड करावी.

Kharif Season 2023
Kharif Season 2023 : खरीप हंगामासाठी कृषी यंत्रणा लागली कामाला

चिकू नविन बाग लागवडीसाठी कालीपत्ती, क्रिकेट बॉल इत्यादी जातींची निवड करावी.

मका या चारापिकाच्या लागवडीसाठी आफ्रिकन टॉल, मांजरी, कंपोझीट, विजय, गंगासफेद, डेक्कन हायब्रीड या वाणांची निवड करावी.

भाजीपाला आणि फुलपिकांच्या लागवडीसाठी रोपे तयार करण्यासाठी गादी वाफे तयार करून घ्यावेत. मिरची पिकाच्या लागवडीसाठी परभणी तेजस, पूसा ज्वाला, अग्नीरेखा, फुले ज्योती, जी-4, जी-3 इत्यादी जातींची निवड करावी.

टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी देवगिरी, परभणी यशश्री, ए.टी.एच-1, पुसारूबी, धनश्री, भाग्यश्री, आर्कारक्षक इत्यादी जातींची निवड करावी. भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी.

Kharif Season 2023
Kharif Season : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कृषी निविष्ठा द्या

गुलाब पिकाच्या लागवडीसाठी ग्लॅडीयटर, सुपर स्टार, डबल डिलाईट, रेड मास्टर पीस इत्यादी जातींची निवड करावी.

फुल पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसासाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्‍या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

तुती ची रोपवाटीका तयार करण्यासाठी जुन महिन्यात एक एकर क्षेत्रासाठी २ गुंठे क्षेत्रावर गादी वाफे करावेत.

५०X३X१.५ फुट (लांबी-रुंदी-उंची) आकाराचे ३ गादी वाफे करावेत. ६ ते ८ महिने वयाचे तुती बेणे रोपे तयार करण्यासाठी निवडावे.

पेन्सिल च्या जाडीइतके ३ ते 4 डोळे असलेले बेणे निवडून धारदार सिकेटरच्या साहाय्याने डोळ्याच्या लगत खालील बाजूस स्लॅटींग कट व 3 डोळ्याच्या वरच्या डोळया लगत फ्लॅट कट घेऊन बेणे तयार करावे.

बेणे तयार करताना बेण्याची साल फाटणार नाही याची काळजी घ्यावी. रोगट बेण्याची छाटणी साठी निवड करू नये. ५X३X२ किंवा ६X३X२ फुट पट्टा पध्दत लागवडीसाठी एकरी ६ हजार बेणे लागवड करावी.

दोन भाग शेणखत व एक भाग माती या प्रमाणे जमीनीपासून १.५ फुट उंचीच्या गादी वाफ्यावर २२ सेंमी लांबीचे तुती बेणे दोन ओळीत १५ सेंमी व दोन बेण्यात १० संमी अंतर ठेवून लागवड करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com