Kharif Season : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कृषी निविष्ठा द्या

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खते, बियाणे, कीटकनाशके उपलब्ध करून द्यावीत.
Nitin Deshmukh
Nitin DeshmukhAgrowon

Akola News खरीप हंगामासाठी (Kharif Season) शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खते, बियाणे, कीटकनाशके उपलब्ध करून द्यावीत. कृषी निविष्ठा (Agriculture Inputs) जादा दराने विक्री होणार नाही, यासाठी भरारी पथके नेमून खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करावे, अशा सूचना आमदार नितीन देशमुख यांनी केल्या. बाळापूर व पातूर तालुका कृषी विभागाच्या वतीने आयोजित खरीप हंगाम आढावा बैठकीत देशमुख बोलत होते.

या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्‍वर पुरी, तहसीलदार राहुल तायडे, तहसीलदार रवी काळे, तालुका कृषी अधिकारी नंदकिशोर माने, धनंजय शेटे, गटविकास अधिकारी श्री. रुद्रकार, बबलू देशमुख, जिल्हा परिषद सदस्या वर्षा वजिरे, बाळापूर पंचायत समिती गटनेते योगेश्वर वानखडे, सरपंच गजानन वजिरे, बाळू हिरेकर, ज्ञानेश्‍वर पाटील, प्रदीप बनारसे, शिवाजी जाधव, संजय अटक, दत्तात्रेय काळे, इंद्रायणी थोरात, पंचायत समिती कृषी अधिकारी अरुण मुंदडा, आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार आदी अधिकारी उपस्थित होते.

आमदार देशमुख यांनी सभेमध्ये सोयाबीन लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना सोयाबीनची उगवण क्षमता तपासणी, तसेच सोयाबीन पेरणीबाबत तांत्रिक तपशील हा अधिक सोप्या भाषेत त्यांच्यापर्यंत पोहोचवावा.

शासनाने सोयाबीन लागवडीबाबत जारी केलेला चतुःसूत्री कार्यक्रम अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा, असे सांगितले. शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप व पीकविमा, ठिबक सिंचन व तुषार सिंचन या संदर्भात शेतकऱ्यांना तत्काळ लाभ द्यावा.

Nitin Deshmukh
Kharif Season : खरिपासाठी ८ हजार १०० क्विंटल भातबियाण्यांची मागणी

तसेच बियाण्यांच्या उपलब्धतेसाठी कृषी सेवा केंद्रांमार्फत होणाऱ्या पेरणीचे नियोजन करून बियाण्यांचे वितरण व्हावे. प्रत्येक गावात कृषी सहायक हजर असले पाहिजे. खते बियाणे यांच्या वाजवी दरात उपलब्धतेबाबतही प्रशासनाने नियोजन करून दरावर नियंत्रण ठेवावे. कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणाकरिता उपाययोजना कराव्या.

Nitin Deshmukh
Kharif Season 2023 : हवामानाचा अंदाज घेऊन खरिपाचे नियोजन करावे

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्यक्षात लाभ मिळत आहे याबाबत खातरजमा करावी, असेही त्यांनी या वेळी सांगितले. नंदकिशोर माने यांनी बाळापूर तालुक्यामध्ये गेल्या खरीप, रब्बी हंगामात कृषी विभागाच्या वतीने राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली.

त्यानंतर घरचे सोयाबीन उगवण तपासणी व बीज प्रक्रियेबाबत प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. आमदार देशमुख व मान्यवरांच्या हस्ते घडीपत्रिकेचे विमोचन करण्यात आले. बाळापूर तालुक्यातील उत्कृष्ट शेतकरी म्हणून पारस येथील विजयसिंह पवार व नकाशी येथील सुनील चिंचोलकर यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com