Fighter Betta Fish : फायटर (बेट्टा) माशाचे प्रजनन तंत्रज्ञान

वैविध्यपूर्ण आणि रंगीबेरंगी आकारामुळे आणि तुलनेने कमी देखभालीमुळे बेट्टा स्प्लेन्डन्स ही जगातील सर्वांत लोकप्रिय मत्स्यालयातील माशाची प्रजाती आहे. या शोभिवंत माशाला फिशपाँडसाठी चांगली मागणी आहे. हा मासा आक्रमक स्वभावाचा असल्याने फिश पॉन्डमध्ये एकटा ठेवावा लागतो.
Fighter Betta
Fighter BettaAgrowon
Published on
Updated on

श्रीतेज यादव, जयंता टिपले

दिवसेंदिवस वाढत चालेल्या मत्स्यालयाच्या (Aquarium) छंदामुळे शोभिवंत माशांची मागणी वाढत आहे. जवळपास एक हजारपेक्षा अधिक शोभिवंत माशांच्या जाती (Fish Breed) जगभरात विकल्या जातात.

भारतात ९० टक्के शोभिवंत माशांची निर्यात (Fish Export) कोलकाता, ८ टक्के निर्यात मुंबई आणि २ टक्के निर्यात चेन्नईतून होते. मुंबईतून सर्वांत जास्त प्रकारच्या शोभिवंत माशांचे बीजोत्पादन होते. कोलकत्ता येथे सर्वांत जास्त शोभिवंत माशांचे संगोपन केले जाते.

फायटर माशाची ओळख

सामान्य नाव ः

सीएमएसए फायटिंग मासा

शास्त्रीय नाव ः

Fighter Betta
Fish Farming : गोड्या पाण्यातील व्यवसायासाठी ४३ लाखांच्या मत्स्यबीजाचा वापर

बेट्टा स्प्लेंडेन्स

आग्नेय आशिया खंडातील मेकाँग नदीच्या खोरे व तसेच कंबोडिया, लाओस, म्यानमार, मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड आणि व्हिएतनाम या ठिकाणी हा मासा आढळतो.

वैविध्यपूर्ण आणि रंगीबेरंगी आकारामुळे आणि तुलनेने कमी देखभालीमुळे बेट्टा स्प्लेन्डन्स हे जगातील सर्वांत लोकप्रिय मत्स्यालयातील माशाची प्रजाती आहे.

मासा आक्रमक स्वभावाचा असल्याने फिश पॉन्डमध्ये एकटा ठेवावा लागतो.

मासा ४ ते ६.५ सेंमीपर्यंत वाढतो. माशाचे आयुष्य ३ ते ४.५ वर्षांचे आहे.हा मासा बाजारात १०० ते ५०० रुपये प्रति नग या दराने विकला जातो.

नर, मादीमधील फरक

फायटर (बेट्टा) माशाचे लिंग ओळखणे साधारणपणे सोपे असते. परंतु काही वेळा काही कारणांमुळे नर आणि मादी काहीसे समान दिसतात.

नर सामान्यतः मादींपेक्षा अधिक जास्त रंग प्रदर्शित करतात, परंतु मादी देखील रंगीबेरंगी असू शकतात.

नराचे शरीर जास्त लांबलचक असते जे बाजूने किंचित चपटे होत जाते. नराच्या पाठीवर आणि पोटाच्या मागचे पंख जास्त लांब व पोटावरील पंख जाड असतात.

मादीच्या पंखांच्या लांबीच्या तीन किंवा चार पटीने जास्त मोठे असतात. यांच्यामध्ये गिल प्लेट कव्हरच्या खाली एक पडदा असतो, ज्याला ऑप्युलर मेम्ब्रेन म्हणतात. हा पडदा दाढीसारखा दिसतो. जेव्हा मासे त्याच्या गिल प्लेट्स भडकवतो तेव्हा ते प्रदर्शित होते. नर माशामध्ये ऑप्युलर मेम्ब्रेन खूप मोठी असते.

जेव्हा मादी प्रजननासाठी तयार असते, तेव्हा त्यांच्या शरीरावर उभ्या पट्ट्या दिसतात.

Fighter Betta
Fish Farming : बायोफ्लॉक : आधुनिक मत्स्यपालनाचे तंत्र

प्रजनन वर्तणूक

जेव्हा नर मासा प्रजननासाठी तयार होतो, तेव्हा तो बुडबुड्याचे घरटे तयार करतो. हे बुडबुडे घरटे टाकीच्या अगदी वर तरंगत असते. ते लहान बुडबुड्यांसारखे दिसते.

एकदा घरटे तयार झाले की, नर बहुतेक वेळा घरट्याखाली राहतात. कारण ते मादीच्या सोबतीची वाट पाहतात.

ब्रूडस्टॉकची तयारी

प्रजननासाठी तयार असलेल्या माशांच्या व्यवस्थापनामध्ये ब्रूड स्टॉकच्या सभोवतालच्या पर्यावरणीय घटकांमध्ये फेरफार करणे समाविष्ट आहे. जेणेकरून जास्तीत जास्त जगणे, जननग्रंथीचा विकास वाढवणे आणि प्रजननक्षमता वाढवणे आवश्यक असते.

उत्पादन केलेल्या अंड्यांची संख्या, गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि परिपक्वता, अंडी फुटण्याच्या वेळेवर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील याचा वापर केला जातो.

माशांसाठी लागणारे जिवंत खाद्य लागते. जिवंत खाद्यामध्ये प्रामुख्याने डासांच्या अळ्या, ब्लडवर्म्स टूबीफेक्स वर्म्स, डॅफनिया दिले जाते. पाण्याचे तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस पर्यंत ठेवावे.

Fighter Betta
Fish Culture : उजनी जलाशयात ५० हजार मत्स्यबीज सोडले

टाकीमध्ये जिवंत झाडे लावावीत. काही पाण्यावर तरंगणीरे झाडे लावावीत, त्यामुळे नर माशाला घरटे करणे सोपे जाते.

टाकीमध्ये एक बदामाचे कुजलेल्या अवस्थेत असणारे पान टाकावे. बदामाचे पान टाकण्याअगोदर पाणी उकळून घ्यावे. त्यामध्ये बदामाचे कुजलेल्या अवस्थेत असलेले पान टाकावे. पाणी थंड झाल्यावर ते प्रजनन टाकीमध्ये टाकावे.

या पानामुळे सामू पातळी कमी होते. पाण्यातील माशांना प्रजननासाठी गडद वातावरण निर्माण करते. हा मासा नदीच्या किनारी कमी उंचीच्या साचलेल्या काळ्या पाण्यात राहतो. प्रजननास मदत होते. लहान मासे अन्न स्रोत म्हणून बदामाचे पान खातात. पानामुळे पिलांना खाण्यासाठी सूक्ष्मजीव तयार होतात.

प्रजनन टाकीची रचना

प्रजनन टाकी किमान १० ते १५ लिटर क्षमतेची असावी. टाकीमध्ये नर आणि मादीस फिरण्यास मोकळी जागा असावी. टाकीमध्ये पाण्याच्या पृष्ठभागावर जिवंत झाडे असावीत.जिवंत झाडे नसतील तर थर्माकॉलचा तुकडा ठेवावा. टाकीमधील पाण्याचा सामू ६.५ ते ८ दरम्यान असावा.

प्रजननाची तयारी

सर्व प्रथम प्रजनन टाकी योग्य पद्धतीने तयार करावी. टाकीमध्ये हीटर लावावा. तापमान २५ ते २७ अंश सेल्सिअस ठेवावे.

नर मासा टाकीमध्ये सोडावा. त्याला दिवसातून दोन ते तीन वेळा जिवंत खाद्य द्यावे. त्यानंतर नर मासा ५ ते १० दिवसांत बुडबुड्यांचे घरटे तयार करतो. तेव्हा टाकीमध्ये मादी मासा सोडावा. थोडा वेळ त्यांची वर्तणूक पाहावी.

कारण काही वेळा नर मासा खूप आक्रमक होतो आणि मादीला धोका होण्याची शक्यता असते. असे झाल्यास त्वरित मादीला वेगळे करावे, जर त्या दोघांची वर्तणूक चांगली असेल तर त्यांना थोडा वेळ निवांत सोडावे. अधून मधून त्याच्यावर लक्ष जरूर ठेवले पाहिजे. त्यापुढील दोन दिवसांत त्यांचे प्रजनन होते.

हा मासा एका वेळेस १०० ते ३०० अंडी देतो. त्यांची अंडी बुडबुड्यांत दिसतात. त्यानंतर मादीला त्या टाकीतून वेगळे करावे. नर माशाला अंड्यांच्या सोबत ठेवावे. कारण पुढील २ ते ३ दिवस नर मासा त्या अंड्यांची काळजी घेतो. या काळात त्याला दिवसातून २ वेळा साधे सुके खाद्य द्यावे.

पिलांची काळजी

अंडी दिल्यानंतर २४ ते ४८ तासांत त्यामधून पिले बाहेर येतात. त्यानंतर नर माशाला बाहेर काढावे. आपल्याला पिले चक्राकार फिरताना दिसतात. त्यांच्या पोटाला बलक पिशवी असते, ही पिशवी पुढील २ ते ३ दिवसांत संपते. तेव्हा त्यांना जिवंत

इन्फोसोरिया हे खाद्य द्यावे. इन्फोसोरिया पाहिले १५ दिवस द्यावे, त्यानंतर पुढचे १५ दिवस नुकतेच जन्मलेले अर्टिमिया द्यावे. जेव्हा पिले एका महिन्याची होतात, तेव्हा त्यांना जिवंत किडे (मायक्रोवोर्म) खाद्यामध्ये द्यावेत.

पिले ४५ दिवसांची होतात, तेव्हा त्यांना जिवंत किडे (टूबीफेक्स) हे बारीक कापून टाकावे.

पिले ६५ ते ७० दिवसांची होतात, तेव्हा त्यामधील नर मासे वेगळे करावेत. कारण लहानपणापासूनच हे आक्रमक स्वभावाचे असतात.

जेव्हा पिले ८० ते ९० दिवसांची होतात, तेव्हा ती प्रौढांसारखी दिसतात. या पिलांना बाजारात ३५ ते ६५ रुपये प्रति नग असा दर मिळतो.

- जयंता टिपले,

८७९३४७२९९४

(सहायक प्राध्यापक, जलीय प्राणी आरोग्य व्यवस्थापन विभाग, मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com