Nashik ZP : नाशिकमध्ये जिल्हा परिषदेचे आता ७४ गट

ZP Election : तब्बल साडेतीन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला जिल्हा परिषदेच्या गट व पंचायत समितीच्या गणरचनेचा प्रारूप आराखडा सोमवारी (ता.१४) अखेर प्रसिद्ध करण्यात आला.
Nashik ZP
Nashik ZPAgrowon
Published on
Updated on

Nashik News : तब्बल साडेतीन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला जिल्हा परिषदेच्या गट व पंचायत समितीच्या गणरचनेचा प्रारूप आराखडा सोमवारी (ता.१४) अखेर प्रसिद्ध करण्यात आला. नव्या आराखड्यानुसार जिल्हा परिषद गटांची संख्या आता ७४ झाली असून, गणांची संख्या १४८ वर पोहोचली आहे.

विशेषतः मालेगाव, चांदवड आणि सुरगाणा या तालुक्यांत प्रत्येकी १ गट वाढला आहे, तर निफाड तालुक्यात २ गट कमी करण्यात आले आहेत. साडेतीन वर्षांनंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक होत असल्याने इच्छुकांचे लक्ष आता गट आरक्षणाकडे लागले आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतरच निवडणुकीची खरी रणधुमाळी सुरू होणार आहे.

Nashik ZP
Nashik ZP : जि.प.समोर १२२ कोटी निधी खर्चाचे आव्हान

गट व गणरचनेवरील हरकती २१ जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करता येणार आहेत.त्या अनुषंगाने अंतिम आराखडा १८ ऑगस्टपूर्वी प्रसिद्ध होणार आहे.जलज शर्मा जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार तालुकास्तरीय समित्यांकडून प्राप्त झालेल्या आराखड्यांची तपासणी करून प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्यात आली.

गटांचे क्रमांक,लोकसंख्या,नकाशाची दिशा यासारख्या तांत्रिक बाबींची बारकाईने पाहणी करण्यात आली होती. प्रारूप आराखड्याच्या प्रती तहसील कार्यालये,पंचायत समित्या,जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Nashik ZP
Nashik ZP : जि.प.चा निधी खर्चाचा टक्का घसरला

बदल, प्रभाग पुनर्रचना

२०१७ च्या निवडणुकीतील रचनेनुसार जिल्ह्यातील तालुक्यांत गट व गणांची रचना कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, चांदवड, मालेगाव आणि सुरगाणा या तालुक्यांमध्ये प्रत्येकी १ गट वाढवण्यात आला आहे.निफाड तालुक्यातील २ गट वगळण्यात आले असून त्यानुसार पुढील फेरबदल झाले आहेत.

पिंपळगाव गटातील अंतरवेल, मुखेड ही गावे पालखेड गटात, बेहेड,नारायण टेंभी, उंबरेखड ही गावे कसबे सुकेणे गटात, पालखेड गटातील कुंदेवाडी गाव उगाव गटात तर सुकेणे गटातील नारायणगाव चांदोरी गटात समाविष्ट करण्यात आले आहे.

प्रभागरचनेचा कालबद्ध कार्यक्रम

२१ जुलै : हरकती व सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याची अंतिम तारीख

२८ जुलै : जिल्हाधिकाऱ्यांकडून विभागीय आयुक्तांना प्रस्ताव सादर

११ ऑगस्ट : हरकतीवर सुनावणी घेऊन निर्णय

१८ ऑगस्ट : निवडणूक आयोग किंवा अधिकृत अधिकारी अंतिम प्रभाग रचना मंजुरीसाठी सादर करतील

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com