Zinc Nutrient : पीक, मानवी आरोग्यासाठी झिंक महत्त्वाचे...

Importance of Zinc : झिंक कमतरतेमुळे पाने करपतात, पानगळ होते. फुले कमी प्रमाणात येतात. फळांचा आकार लहान राहतो, फळे अपरिपक्व राहतात. झिंक कमतरतेमुळे मानवामध्ये फ्लू, सर्दी आणि संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता अधिक असते. हे लक्षात घेऊन पिकांना पुरेशा प्रमाणात झिंक पुरवठा आवश्यक आहे.
Zinc Nutrient
Zinc NutrientAgrowon
Published on
Updated on

डॉ. एम. एस. पोवार

Benefits of Zinc : मानव आणि पशुपक्ष्यांच्या वाढीसाठी वेगवेगळे खनिज पदार्थ तसेच जीवनसत्त्वाची गरज असते. वनस्पतीच्या उत्पादनावर मानव तसेच पशुपक्ष्यांचे जीवन आहे. माती आणि पिकांमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता वाढत आहे.

आपल्या देशातील जमिनीत झिंक, बोरॉन आणि लोह या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता मोठ्या प्रमाणात दिसून येते. वनस्पती, प्राणी आणि मानवी विकासासाठी झिंक एक सूक्ष्म अन्नद्रव्य आवश्यक असते.

झिंक अन्नद्रव्यांची गरज कमी असते, पण ते महत्त्वाच्या क्रिया पार पाडते. जैविक क्रियासाठी उदा. जैविक संरचनात्मक अखंडता राखणे, प्रथिने उत्पादन आणि जनुकीय अभिक्रियेसाठी आवश्यक असते. झिंक हे पीकवाढीच्या कार्यासाठी महत्त्वाचे असते.

एकूण प्रथिनांपैकी जवळपास १० टक्के प्रथिने झिंकयुक्त असतात. झिंक उपलब्धता पुरेशी नसल्यास शारीरिक आणि विकासात्मक प्रक्रिया वेगाने बिघडतात. यामुळे रोगप्रतिकार प्रणाली कमकुवत होते. योग्य प्रकारे मेंदूचे कार्य होत नाही. मानव आणि पशुपक्ष्यांमध्ये आरोग्यविषयक गुंतागुंत निर्माण होते.

अन्न आणि कृषी संघटनेच्या अहवालानुसार झिंक हे जमिनीतील सर्वात कमी असलेले सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. जवळपास ५० टक्के जमिनीमध्ये झिंक कमतरता असल्यामुळे विकसनशील देशात जेथे तृणधान्य लागवड मोठ्या प्रमाणात आहे, तेथे झिंक कमतरतेमुळे पीक उत्पादन आणि मानवामध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.

Zinc Nutrient
Animal Care : जनावरांच्या प्रजोत्पादनावर जस्त, कॅल्शिअमचा परिणाम

झिंक कमतरतेमुळे अतिसार, टायफॉईड, मलेरिया, गोवर आणि न्यूमोनियामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. मोठ्या लोकांच्यामध्ये देखील आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत.कोरोना साथीच्या काळात मानवामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी झिंक महत्त्वाचे ठरले आहे.

झिंक कमतरतेमुळे फ्लू, सर्दी आणि संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता अधिक असते. प्रौढांच्या शरीरात २ ते ३ ग्रॅम झिंक असते. हे प्रमाण राखण्यासाठी १५ मिलिग्रॅमपर्यंत झिंक आहारात असणे आवश्यक आहे.

मानवाची झिंक अन्नद्रव्यांची गरज भागवण्यासाठी पिकांना झिंक पुरेशा प्रमाणात देणे आवश्यक आहे. झिंक पुरेशा प्रमाणात दिल्यामुळे पिकांची वाढ उत्तम होऊन उत्पादन आणि गुणवत्ता चांगली होते.

Zinc Nutrient
Soybean Disease : सोयाबीनवरील हिरवा मोझॅक, कळी करपा रोगाचे व्यवस्थापन

कमतरतेची कारणे

हलक्या, सेंद्रिय पदार्थ कमी असलेली जमीन.

चुनखडी व अल्कधर्मी जमीन

क्षारपड जमीन, पाणथळ जमीनतृणधान्ये, ऊस लागवड असलेल्या जमिनी.

जास्त स्फुरदयुक्त जमीन.

पिकामधील कार्य

ऑक्झिन्स निर्मितीमध्ये झिंक हे महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे. इंडॉल ॲसिटिक ॲसिडच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे. यामुळे पिकाची शेंड्याची वाढ जोमदार होण्यात मदत मिळते.

प्रथिनांच्या निर्मितीसाठी गरजेच्या एन्झाइम्सची निर्मिती. पिकामध्ये शर्करेच्या वापरासाठी गरजेचे.

पिकामध्ये स्टार्च निर्मिती आणि मुळांच्या वाढीसाठी आवश्यक.

बियाणे, खोडाच्या पक्वतेवर परिणाम करते.

हरित लवक आणि कर्बोदकांच्या निर्मितीत सहभाग.

पेशीमधील योग्य प्रमाणातील झिंकमुळे पीक कमी तापमानात तग धरते.

कमतरतेची लक्षणे

पानात हरितद्रव्यांचा अभाव दिसतो. जुन्या पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो. पानांवर तांबूस, तपकिरी ठिपके दिसतात. प्रामुख्याने भातामध्ये हा परिणाम दिसतो.

वनस्पतीची पाने लहान अरुंद व निमुळती होतात.

शेंड्याची वाढ मर्यादित होऊन पर्णगुच्छात रूपांतर होते.

पाने ठिकठिकाणी करपतात, पानगळ होते. फुले कमी प्रमाणात येतात.

फळांचा आकार लहान राहतो, फळे अपरिपक्व राहतात.

जास्त कमतरतेमुळे वनस्पतीची वाढ थांबते.

झिंक फोर्टिफाइड खते

झिंकेटेड एनपीके कॉम्प्लेक्स (१०:२६:२६)

झिंकेटेड एनपीके कॉम्प्लेक्स (१२:३२:१६)

झिंकेटेड डीएपी (१८:४६:०)

झिंकेटेड युरिया अमोनिअम फॉस्फेट (२८:२८:०)

झिंकेटेड एनपीके कॉम्प्लेक्स (१४:३५:१४)

झिंकेटेड अमोनिअम फॉस्फेट सल्फेट

झिंकेटेड एसएसपी (ग्रॅन्युलर)

डॉ. एम. एस. पोवार, ७०२८०१४५४६

(वरिष्ठ विपणन व्यवस्थापक,इफ्को, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com