Fort Conservation: गड-किल्ले स्वच्छता, संवर्धन उपक्रमात युवकांचा सहभाग

Cleanliness Campaign: अहिल्यानगरसह राज्यातील तरुणांच्या मदतीने लोकसहभागातून अहिल्यानगरचे (दक्षिण) खासदार नीलेश लंके यांनी राज्यातील गड-किल्ल्यांच्या स्वच्छता आणि संवर्धनासाठी सुरू केलेल्या उपक्रमाला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
Fort Conservation
Fort ConservationAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News: अहिल्यानगरसह राज्यातील तरुणांच्या मदतीने लोकसहभागातून अहिल्यानगरचे (दक्षिण) खासदार नीलेश लंके यांनी राज्यातील गड-किल्ल्यांच्या स्वच्छता आणि संवर्धनासाठी सुरू केलेल्या उपक्रमाला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नुकत्याच पुणे जिल्ह्यातील तिकोना किल्ल्यावर झालेल्या या उपक्रमात हजारो तरुण सहभागी झाले होते.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याच्या इतिहासाचे साक्षीदार, राज्यातील अतुलनीय ठेवा असलेल्या गडकिल्ल्यांच्या स्वच्छतेसह संवर्धनासाठी खासदार लंके यांनी पुढाकार घेतला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरातील वेगवेगळ्या भागातील युवकांच्या मदतीने, लोकसहभागातून पाच महिन्यांपासून हा उपक्रम सुरू आहे.

Fort Conservation
Fort Conservation : गड-किल्ले संवर्धनासाठी सरकार कटिबद्ध

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी (ता. जुन्नर) येथून सुरुवात झाल्यानंतर रायरेश्‍वर (ता. भोर), धर्मवीरगड (ता. श्रीगोंदा), रामशेज (जि. नाशिक) आणि नुकतीच तिकोना (जि. पुणे) येथे स्वच्छता केली. नीलेश लंके प्रतिष्ठानकडून किल्ल्यावर जाण्याची व्यवस्था केली जात असल्याने तरुणांचा यात सहभाग वाढत आहे.

Fort Conservation
Salher Fort Development : ‘साल्हेर’ला पर्यटनस्थळ विकासासाठी प्रयत्न

तिकोना किल्ल्यावर तीन हजारांपेक्षा अधिक तरुण सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक नेतेही यात सहभागी होत आहेत. तिकोनावर वृक्षारोपण करण्यात आले, असे नीलेश लंके प्रतिष्ठानचे राहुल झावरे यांनी सांगितले.

लोकसहभागातून गडसंवर्धनाचे काम केले जात आहे. तिकोना किल्ल्याच्या संवर्धनाचा १० कोटींचा प्रस्ताव प्रलंबित आहे. वन विभागाच्या हद्दीतील पायऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ४० लाखांच्या प्रस्तावासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. गड ही आपली प्रेरणास्थाने आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी सरकारपेक्षा आपणही पावले उचलायला हवीत.
नीलेश लंके, खासदार, अहिल्यानगर (दक्षिण)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com