Salher Fort Development : ‘साल्हेर’ला पर्यटनस्थळ विकासासाठी प्रयत्न

Tourism Spot Development : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या साल्हेर किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व इतिहासात अधोरेखित आहे.
Salher Fort
Shiv JayantiAgrowon
Published on
Updated on

Nashik News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या साल्हेर किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व इतिहासात अधोरेखित आहे. हा साल्हेर किल्ला पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्यासाठी शासन प्रयत्न करणार, असे प्रतिपादन कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले.

शिवजयंतीच्या निमित्ताने बुधवारी (ता. १९) साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कृषिमंत्री कोकाटे यांनी त्यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. या वेळी आमदार दिलीप बोरसे, तहसीलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी अतुल पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर शेरमाळे, उपविभागीय कृषी अधिकारी संदीप मेढे, तालुका कृषी अधिकारी शांताराम भोये यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Salher Fort
Agro Tourism Business : शेतीपासून पर्यटन व्यवसायापर्यंतचा यशस्वी प्रवास

मंत्री कोकाटे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार समाजासाठी आजही प्रेरक आहेत. त्यांची आदर्श विचारसरणी प्रत्येकाने आत्मसात करावी. साल्हेर किल्ला या ऐतिहासिक वास्तूचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होण्यासाठी रोप-वेचा प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावा.

Salher Fort
Agri Tourism: कृषी पर्यटन : सर्वांगीण विकासाचे मॉडेल

तसेच या ठिकाणी हरणबारी व केळझर या धरणांवर बोटिंग स्थळ विकसित करता येईल. गुजरात राज्यातून येणारे व मांगीतुंगी येथे येणारे पर्यटक येथे भेट देतील. त्यामुळे साल्हेरच्या पर्यटन विकासाला व रोजगाराच्या संधीला चालना मिळेल. येणाऱ्या काळात साल्हेर येथे कृषी पर्यटनासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत.’’

साल्हेरच्या विकासाच्या दृष्टीने आदिवासी संग्रहालय व शिवसृष्टीसाठी १५० कोटींचा आराखडा प्रस्तावित असून पहिल्या टप्प्यात ७५ कोटींची शासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. या कामासाठी महसूल विभागाची ५० एकर जमीन संपादनासाठी शासनास प्रस्तावित सादर करण्यात आला असल्याचे आमदार बोरसे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com