Fort Conservation : गड-किल्ले संवर्धनासाठी सरकार कटिबद्ध

Traditional Shiv Jayanti : १९ फेब्रुवारी या शिवजयंतीच्या तारखेने जगभर शिवजयंती सोहळा साजरा होत आहे. पण आता तिथीच्या शिवजयंतीसाठी देखील शासकीय निधी मिळावा यासाठी मंत्रिमंडळात पाठपुरावा करावा.
Shiv Jayanti
Shiv JayantiAgrowon
Published on
Updated on

Pune News : महाराष्ट्रासह अवघ्या देशातील हिंदूसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणास्रोत आहेत. किल्ल्यांभोवती होणारी अतिक्रमणे जमीनदोस्त करत, गड-किल्ले संवर्धनासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, यापुढील काळात तिथीनुसार शिवजयंती उत्सव सरकारकडून साजरा व्हावा, यासाठी मी कटिबद्ध राहून राज्य सरकारकडे पाठपुरावा करेल, अशी ग्वाही मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी दिली.

शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार सोमवारी (ता. १७) साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती सोहळ्यात मंत्री राणे बोलत होते. या वेळी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, डॉ. नंदकिशोर एकबोटे, शिवव्याख्याने सौरभ कर्डे, स्मारक समितीचे अध्यक्ष शाहीर हेमंत मावळे, कार्याध्यक्ष मधुकर काजळे, सचिव रमेश कर्पे आदी मान्यवर उपस्थित होते.

Shiv Jayanti
Salher Fort Development : ‘साल्हेर’ला पर्यटनस्थळ विकासासाठी प्रयत्न

या वेळी देहूच्या जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान तसेच शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अनिकेत महाराज मोरे यांच्याकडून बाल शिवाजी आणि मॉसाहेब जिजाऊ यांच्या पुतळ्याला महावस्त्र अर्पण करण्यात आले.

आमदार सोनवणे म्हणाले, ‘‘१९ फेब्रुवारी या शिवजयंतीच्या तारखेने जगभर शिवजयंती सोहळा साजरा होत आहे. पण आता तिथीच्या शिवजयंतीसाठी देखील शासकीय निधी मिळावा यासाठी मंत्रिमंडळात पाठपुरावा करावा.

शाहीर मावळे म्हणाले की, ‘‘रायगडला राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार साजरा होतो, त्याचप्रमाणे शिवजयंती सोहळा देखील शासनाकडून तिथीप्रमाणे साजरा व्हावा असे पत्र समितीने मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्यासाठी राणे यांनी पाठपुरावा करावा.’’

शिवाई देवीच्या अभिषेकानंतर श्री. राणे यांच्यासह शिवभक्तांच्या सहभागाने शिवाजी महाराज यांची प्रतिमा चांदीच्या पालखीत ठेवून शिवजन्मस्थळापर्यंत मार्गस्थ करण्यात आली. त्यावेळी शिवाजी महाराजांच्या जयघोषाने शिवनेरीचा परिसर दुमदुमून निघाला होता. शिवजन्मस्थळी पारंपरिक पाळणा गीताने शिवजन्मोत्सव साजरा झाल्यानंतर सुंठवड्याचे वाटप करण्यात आले.

Shiv Jayanti
Gopalgad Fort : अपरिचित, वैभवकालीन जलदुर्ग गोपालगड

या वेळी शिवनेरी माजी सैनिक संघटनेच्या वतीने मानवंदना देण्यात आली. जुन्नरच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात पालखीच्या पुढे अभंग सादर केले. जुन्नर येथील छत्रपती संघर्ष मैदानी खेळ आखाडा पथकाच्या वतीने दांडपट्ट्याची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तर भिवाडे खुर्द येथील वरसुबाई महिला लेझीम पथकाने लेझीमचा पारंपरिक खेळ करत शिवभक्तांना मंत्रमुग्ध केले.

मल्हार सर्टीफिकेशनबाबत निर्णय घेणार ः राणे

मटणाच्या दुकानासाठी मल्हार सर्टीफिकेशनच्या मुद्द्यावर जेजुरी देवस्थान तसेच राज्याच्या विविध भागांतून होत असलेल्या मल्हार नावाबाबतच्या विरोधावर मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी भाष्य केले. मल्हार हे नाव हटविण्याबाबत या विषयाला दोन बाजू आहेत, असे सांगून संबंधित कंपनीपर्यंत हे पोहोचविले आहे. त्यामुळे मल्हार नावाबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवू

शिवनेरीच्या भोवती काही अतिक्रमणे केलीय, ही बाब माझ्या कानावर आली आहे. असे होत असेल तर शिवभक्त म्हणून घेण्याच्या लायकीचे आपण आहोत का? असा प्रश्न उपस्थित करत, वरती मुख्यमंत्री बसलेत, थोडा बुलडोझर इथेही फिरवू असे वक्तव्य करून, कथित अतिक्रमण हटविण्याचे सूतोवाच या वेळी राणे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com