Voter Registration : तरुण मतदार नोंदणीसाठी प्रयत्न करावेत

Voter Registration Update : सोलापूर जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील तरुणांची मतदार म्हणून नोंदणी कमी दिसत आहे. या वयोगटातील तरुणांची मतदार म्हणून नोंदणी वाढविण्यासाठी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी प्रयत्न करावेत.
Voter
VoterAgrowon
Published on
Updated on

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील तरुणांची मतदार म्हणून नोंदणी कमी दिसत आहे. या वयोगटातील तरुणांची मतदार म्हणून नोंदणी वाढविण्यासाठी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी निरीक्षक सौरभ राव यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत आढावा बैठकीत विभागीय आयुक्त श्री. राव मार्गदर्शन करत होते. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव, सदाशिव पडदुणे, अमित माळी, विठ्ठल उदमले, नामदेव टिळेकर, प्रियंका आंबेकर यांच्यासह सर्व तहसीलदार उपस्थित होते.

Voter
Crop Damage : ‘मॉन्सूनोत्तर’चा १८८ हेक्टरवरील पिकांना बाधा

विभागीय आयुक्त श्री. राव म्हणाले, की निवडणूक आयोगाने मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. सोलापूर जिल्ह्यात ३६ लाख पेक्षा अधिक मतदार आहेत. यामध्ये १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या कमी दिसत असल्याने प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय व स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन या वयोगटातील तरुणांची मतदार म्हणून नोंदणी करावी.

Voter
Sugar Production : ‘बळीराजा’चे १ लाख ५३ हजार क्विंटल साखर उत्पादन

तरूणांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर या गटातील तरुण एमआयडीसी व अन्य उद्योगात तसेच आस्थापनामध्ये काम करत असण्याची शक्यता असल्याने त्या ठिकाणी विशेष शिबिरे घेऊन त्यांची नोंदणी मतदार म्हणून करावी. यामध्ये १८ ते १९ या वयोगटातील एकही तरुण मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यापासून वंचित राहणार नाही याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले.

प्रलंबित प्रकरणे २० डिसेंबरपर्यंत निकाली काढा

मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत फॉर्म नंबर ६ मतदार नाव नोंदणी फॉर्म, नंबर ७ मतदार यादीतून नाव वगळणे व फॉर्म नंबर ८ मतदार यादीतील नावात दुरुस्ती करणे या अनुषंगाने प्रलंबित असलेल्या ३८ हजार ३८३ प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन ही सर्व प्रकरणे २० डिसेंबर २०२३ पूर्वी निकाली काढावीत, असे निर्देशही विभागीय आयुक्त श्री. राव यांनी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com