Crop Damage : ‘मॉन्सूनोत्तर’चा १८८ हेक्टरवरील पिकांना बाधा

Post Monsoon Rain : २८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान मॉन्सूनोत्तर पावसाने थैमान घातले होते. या पावसाचा फटका जिल्ह्यातील ६५५ गावांतील १८८ हेक्टवरील पिकांना बसला आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Latur News : जिल्ह्यात २८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान मॉन्सूनोत्तर पावसाने थैमान घातले होते. या पावसाचा फटका जिल्ह्यातील ६५५ गावांतील १८८ हेक्टवरील पिकांना बसला आहे. राज्यातही याच काळात मॉन्सूनोत्तर पाऊस झाला. यामुळे सरकारने मॉन्सूनोत्तरने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर पंचनामे पूर्ण केले असून त्यानुसार जिल्ह्यातील चार तालुक्यांतील पिकांना मॉन्सूनोत्तरची बाधा पोहचली असून ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीची भरपाई देण्यासाठी प्रशासनाने सरकारकडे १६ लाख १६ हजार रूपये निधीची मागणी केली आहे.

जिल्ह्यात दरवर्षी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात परतीचा पाऊस पडतो. पावसाळ्यात नियमित पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत परतीच्या पावसाचे प्रमाण मोठे असते. यामुळे प्रकल्प व तलावांत पाणीसाठा येतो. यासोबत उभ्या पिकांचेही नुकसान होते.

दरवर्षी सोयाबीनसह खरीपाची काढणीला आलेली पिके परतीच्या पावसाच्या तावडीत सापडतात. यंदा मात्र, परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पिकांचे तेवढे नुकसान झाले नाही. परतीचा पाऊस न आल्यामुळे प्रकल्प व तलावामध्ये पुरेसा पाणीसाठा आला नाही.

Crop Damage
Crop Damage : मॉन्सूनोत्तर पावसामुळे १ लाख २१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

टंचाईचे संकट येण्याची शक्यता असतानाच जिल्ह्यात २८ ते ३० दरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागात हा पाऊस जोरदार होता. यामुळे पिकांचे नुकसान झाले. यात १८८ पैकी १८७ हेक्टवरील जिरायती तर एक हेक्टरवरील बागायती पिकाचे मोठे नुकसान झाले. राज्यभरातही याच पद्धतीने पिकांचे नुकसान झाल्याने सरकारने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.

Crop Damage
Kharip Crop Damage : खरिपाबरोबरच अवकाळीचा फटका समितीने विचारात घ्यावा

त्यानुसार जिल्हा प्रशासनाने तातडीने कार्यवाही ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करत सरकारला नुकसानीचा अहवाल सादर केला आहे. यात जिरायती पिकांसाठी हेक्टरी साडेआठ हजार रूपये तर बागायती पिकांसाठी हेक्टरी १७ हजार रुपयाप्रमाणे भरपाई देण्यासाठी १६ लाख १६ हजार रूपये निधीची मागणी करण्यात आली आहे.

अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान अहमदपूर तालुक्यात झाले असून तालुक्यातील ५८४ गावांतील १५२ हेक्टरवरील पिकांना अवकाळीची बाधा झाली आहे. त्यानंतर औसा तालुक्यातील ३८ गावांतील वीस हेक्टर, लातूर तालुक्यातील १४ गावांतील सात हेक्टर तर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील १९ गावांतील नऊ हेक्टवरील पिके अवकाळी पावसाने बाधित झाल्याचे पुढे आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com