

Nagpur News : बाळासाहेब ठाकरे कृषी व ग्रामीण विकास योजनेतून या पुढील टप्प्यात शेतातील बायोमासवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या सयंत्रांसाठीचे किंमत आकारणीचे नियम (कॉस्ट नॉर्म) केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेकडून (सिरकॉट) निश्चित करून देण्यात आले आहेत. याव्दारे बायोमासपासून पॅलेट, ब्रिकेट, ऑईलमिल अशा उद्योगाची उभारणी प्रस्तावित करण्यात आली आहे.
जागतिक बॅंकेच्या निधीतून अंमलबजावणी होणाऱ्या स्मार्ट प्रकल्पातून कापसाच्या (Cotton) मूल्यवर्धनसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात शेतकरी कंपन्यांद्वारे जिनिंग उद्योगांना प्रोत्साहन देण्यात आले. राज्यात सुमारे सहा जिनिंग उद्योग उभारणीचे काम सुरू आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात शेतीतील कपाशी, तूर व इतर पिकांच्या वेस्टपासून गट्टू (पॅलेट) तयार करण्याचे उद्योग उभारले जाणार आहेत.
याव्दारे शेतातील वेस्ट जाळण्यामुळे होणारे प्रदूषण कमी करता येईल. त्यासह अशा वेस्टला बाजारपेठही उपलब्ध होईल. उद्योगांना ऊर्जा निर्मितीसाठी इतर घटकांच्या जोडीला दहा टक्के बायोमास वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यानुसार उद्योग क्षेत्रात बायोमापासून तयार पॅलेट वापरावर भर दिला जात असल्याने याला मागणी वाढली आहे.
नागपुरात सध्या बायोमासपासून पॅलेटचे केवळ २.५० टन प्रती दिवस उत्पादन आहे. त्या तुलनेत मागणी ११०० टन आहे. त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या संधी असल्याचे ‘सिरकॉट’चे संचालक डॉ. एस. के. शुक्ला यांनी सांगितले. केंद्र सरकार यापूर्वीपासूनच याकरिता अनुदान देत आहे. आता लवकरच अशा उद्योगांना राज्य सरकारकडून अनुदान मिळणार असल्याने शेतकरी कंपन्यांसाठी चांगला पर्याय ठरेल, असेही डॉ. शुक्ला म्हणाले.
सिरकॉटला साडेपाच कोटी
सिरकॉटकडून बायोमास प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी अपेक्षित खर्चाचा आराखडा तयार करून देण्यात आला आहे. त्याकरिता स्मार्ट प्रकल्पातून तब्बल साडेपाच कोटी रुपये केंद्र सरकारच्या संस्थेला शुल्कापोटी अदा करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान आराखड्यात काही सुधारणा सुचविण्यात आल्याने याची अंमलबजावणी रखडली आहे.
उद्योगासाठी प्रस्तावित अनुदान (कोटी रुपयात)
जिनिंग : तीन
पॅलेटिंग : तीन
ब्रिकेट : १.५
ऑईलमिल १.८
गोळा करणे : ७५ लाख (कॉटन स्टॉक सप्लाय चेन)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.