
Parbhani News : उर्ध्व भागातील खडकपूर्णा (जि. बुलढाणा) धरणातून नदीपात्रात विसर्ग सुरु असल्यामुळे येलदरी धरणातील पाण्याचा येवा वाढला आहे.मागील २४ तासांत १३.२५७ दलघमी येवा झाला आहे.
त्यामुळे सोमवारी (ता. ११) सकाळी ८ वाजता येलदरी धरणामध्ये ७२६.६७५ दलघमीनुसार ८९.७४ टक्के पाणीसाठा जमा झाला होता. तर सिद्धेश्वर धरणामध्ये ६३.५३५ दलमघीनुसार ७८.४८ टक्के पाणीसाठा होता.
परभणी-हिंगोली जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणाऱ्या पूर्णा नदीवरील येलदरी धरणाचा प्रकल्पीय पाणीसाठा ९३४.४४० दलघमी आहे. त्यात जिवंत पाणीसाठा ८०९.७७० दलघमी तर मृत पाणीसाठा क्षमता १२४.६७० दलमघी आहे. यंदा १ जुलै रोजी येलदरी धरणात ५०.७५ टक्के तर सिद्धेश्वर धरणात २१.५६ टक्के पाणीसाठा होता.
१ ऑगस्ट रोजी येलदरी धरणात ७८.७१ टक्के तर सिद्धेश्वर धरणात ६२.६४ टक्के पाणीसाठा होता. यंदाच्या पावसाळ्यात १ जून पासून आजवर धरणक्षेत्रात एकूण ४५१ मिलिमीटर पाऊस झाला. पाणलोटात झालेला जोरदार पाऊस तसेच खडकपूर्णा धरणातून नदीपात्रातविसर्ग सुरु करण्यात आल्यामुळे येलदरी धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
धरणाच्या जलाशयात मागील २४ तासांत १३.२५७ दलघमी तर यंदा १ जून पासून आजवर एकूण ३३५.६२० दलघमी येवा झाला आहे. सोमवारी (ता. ११) सकाळी ८ वाजता ७२६.६७५ दलघमीनुसार ८९.७४ टक्के पाणीसाठा होता.
२०२४ च्या ११ ऑगस्ट रोजी पर्यंत धरण क्षेत्रात ६७७ मिलिमीटर पाऊस झाला. त्यावेळी २७२.१६९ दलमघीनुसार ३३.६१ टक्के पाणीसाठा होता. येलदरी धरणाच्या खालच्या भागातील सिद्धेश्वर धरणाच्या क्षेत्रात यंदा १ जून पासून आजवर एकूण ४९१ मिमी पाऊस तर एकूण ५७.३४० दलघमी येवा झाला आहे.
नदीकाठच्या नागरिकांना आवाहन...
खडकपूर्णा धरणाच्या दोन दरवाजाद्वारे पूर्णा नदीपात्रात विसर्ग चालू केला आहे. त्यामुळे येलदरी धरणातील पाणीसाठ्यात ८९.७४ टक्के पर्यंत वाढ झाली आहे.त्यानुषंगाने येथून पुढे केव्हांही टरबाई्न्स, धरणाचे दरवाजे चालू करून पूर्णा नदीपात्रात विसर्ग करण्यात येईल.
त्यामुळे नदीवरील सर्व कृषीपंप धारकांनी, लाभधारकांनी नदीपात्रात लगत असलेले शेती सहायक साहित्य, विद्युतपंप, बैलगाडी, नांगर आदी नदी पात्राबाहेर काढून ठेवावे, असे आवाहन येलदरी धरण पूरनियंत्रण कक्षातर्फे करण्यात आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.