Cooperative Society Recruitment : सेवा सहकारी संस्थांच्या सचिव पदभरतीस मनाई

Cooperative Sector : सहकार क्षेत्रात महत्त्वाची भूमिका असलेल्या सेवा सहकारी संस्थांमध्ये रिक्त असलेल्या सचिवांची पदे भरण्यास मनाई आदेश बजावण्यात आला आहे.
Cooperative Society
Cooperative SocietyAgrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा

Amravati News : अमरावती ः सहकार क्षेत्रात महत्त्वाची भूमिका असलेल्या सेवा सहकारी संस्थांमध्ये रिक्त असलेल्या सचिवांची पदे भरण्यास मनाई आदेश बजावण्यात आला आहे. त्यामुळे रिक्त असलेल्या संस्थांच्या सचिवपदाचा भार विद्यमान स्थितीत कार्यरत असलेल्या सचिवांवर आला असून एका सचिवाकडे दहापेक्षा अधिक संस्थांच्या कारभाराचा भार आला आहे. सद्यःस्थितीत सहकार विभागाकडून नियुक्त २२ केडर सचिव व संस्थांनी नियुक्त केलेले १३० सचिव कार्यरत आहेत.

अमरावती जिल्ह्यात ६०१ सहकारी सेवा संस्था कार्यरत आहेत. यातील काही संस्थांची उलाढाल पाच लाखापर्यंत असून सचिवाचे वेतन देण्याचीही त्यांची ऐपत नाही. यातील बहुतांश संस्था अवसायनात जाण्याच्या स्थितीतील असल्या तरी त्या राजकीय दबावापोटी जाऊ दिल्या जात नसल्याचे वास्तव आहे. सहकार क्षेत्रात कृषी क्षेत्राशी संबंधित योजनांची अंमलबजावणी सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून केल्या जाते. अनुदानावरील बियाणे व खतांच्या वाटपासह कर्जवितरणात या संस्थांची मुख्य भूमिका आहे. बॅंक ते शेतकरी हा प्रवास सेवा सहकारी संस्थांमुळे सुकर होतो. त्यासाठी संस्थांकडे सचिव हे महत्त्वाचे पद आहे.

Cooperative Society
Cooperative Societies Election : सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश; गावपातळीवरील राजकारण तापणार

सेवा सहकारी संस्थांचा कारभार करण्यासाठी सहकार विभागाकडून केडर सचिव व संस्थांकडून स्वतःचा स्वतंत्र सचिव नियुक्त करण्यात येतात. जिल्ह्यातील ६०१ संस्थांपैकी विद्यमान स्थितीत सहकार विभागाचे २२ सचिव व संस्थांचे स्वतंत्र १३० सचिव कार्यरत आहेत. सहकार खात्याने नियुक्त केलेल्या सचिवांना बॅंक व संस्था यातील कर्ज वितरणातील दुराव्यापोटी मिळणाऱ्या दोन टक्के रकमेतून वेतन दिल्या जाते तर, संस्थांच्या सचिवांना संस्था स्वनिधीतून वेतन देते.

या सचिवांना एक संस्था फारतर तीन ते चार हजार रूपये महिना वेतन देते. दरम्यान, वयोमानाने सेवानिवृत्त झालेल्या सचिवांची संख्या वाढली असून संस्थानियुक्त १३० सचिव व सहकाराचे २२ सचिव उरले आहेत.

जिल्हा उपनिबंधक कार्यालयास सचिव नियुक्त न करण्याचे पत्र सहकार विभागाकडून नुकतेच आले आहे. २२ केडर सचिवांना आता ४७१ संस्थांचा कारभार बघावा लागत आहे. म्हणजेच एका सचिवाकडे २१ संस्थांचा भार सोसण्याची वेळ आली आहे.

जिल्ह्यातील एकूण सेवा

सहकारी संस्था

६०१

कार्यरत केडर सचिव

२२

संस्था नियुक्त सचिव

१३०

एका सचिवाकडे असलेल्या

संस्थांचा भार

२१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com