Yashwant Sugar Mill : ‘यशवंत’च्या जमीन खरेदीचा घाट बारगळणार?

Pune APMC Land Purchase : कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आणि काही वर्षांपासून बंद असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याची जमीन खरेदी करण्याचा पुणे बाजार समितीने घातलेला घाट बारगळण्याची शक्यता आहे.
Sugar Factory Election
Sugar Factory ElectionAgrowon
Published on
Updated on

Pune News : कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आणि काही वर्षांपासून बंद असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याची जमीन खरेदी करण्याचा पुणे बाजार समितीने घातलेला घाट बारगळण्याची शक्यता आहे.

पणन संचालकांनी जमीन खरेदीचा बाजार समितीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला होता. परंतु पणन विभागाच्या अवर सचिवांनी जमीन खरेदीबाबत पणन संचालक सक्षम प्राधिकारी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे जमीन खरेदीचा चेंडू पुन्हा पणन संचालकांच्या कोर्टात आला आहे.

दरम्यान, एकीकडे पुणे बाजार समिती राष्ट्रीय करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळ औट घटकेचे ठरणार आहे. संचालक मंडळ बरखास्त झाल्यानंतर बाजार समितीच्या मुदत ठेवी मोडता येणार नाहीत. त्यामुळे ‘यशवंत’ची जागा खरेदी करण्यासाठी बाजार समितीकडून घाई केली जात असल्याची चर्चा आहे.

Sugar Factory Election
Yashwant Sugar Factory Notice: ‘यशवंत’च्या ३०० कोटींच्या जमीन विक्रीप्रकरणी नोटीस

‘यशवंत’ची जागा कवडीमोलाने खरेदी करण्याचे षड्‍यंत्र रचल्याचा आरोप केला जात आहे. जमीन खरेदीचा व्यवहार ३०० कोटी रुपयांत केला जाण्याची चर्चा सुरू आहे. ‘यशवंत’वर विविध वित्तीय संस्थांचे कर्ज असून ही रक्क मिळाल्यास वित्तीय संस्था आपला पाय मोकळा करून घेतील. मात्र तरीही यशवंत सुरू होण्याबाबत सहकार आणि साखर आयुक्तालयातील अधिकारी साशंक आहेत. त्यामुळे साखर आयुक्तालयाने अद्याप जमीन विक्रीला परवानगी दिलेली नाही.

दरम्यान, एक बंद पडलेली संस्था जिवंत करण्यासाठी बाजार समितीचा बळी दिला जात असल्याचा आरोप काही ज्येष्ठ अडते आणि कामगार संघटनांनी केला आहे. बाजार समित्यांच्या ठेवी मोडून जमीन खरेदी झाल्यास नजीकच्या भविष्यकाळात कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीही पैसे राहणार नाहीत, अशी भीती कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. पणन विभाग व साखर आयुक्तालयाने घेतलेली भूमिका आणि बाजार समितीच्या वर्तुळातून होत असलेला विरोध यामुळे ‘यशवंत’च्या जमीन खरेदीचा प्रस्ताव गुंडाळला जाण्याची शक्यता आहे.

Sugar Factory Election
Vasaka Sugar Mill : ‘वसाका’ कारखान्याच्या विक्रीचा घाट

पणन संचालकांची पंचाईत

कोणत्याही बाजार समित्‍यांची विकास कामे, जमीन खरेदी याबाबतच्या पणन कायद्यातील १२ (१) च्या कलमानुसार पणन संचालकांना मंजुरीचे अधिकार आहेत. मात्र पणन संचालकांनी आपल्या अधिकाराचा वापर न करता जमीन खरेदीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला. हे प्रकरण आपल्या अंगाला लावून न घेण्याचा हा प्रयत्न होता. परंतु शासनाने हा प्रस्ताव पुन्हा पणन संचालकांकडे पाठविल्याने पणन संचालकांची पंचाईत झाली आहे.

‘यशवंत’ची जमीन बाजार समितीने खरेदी करणे अव्यावहारिक आणि बेकायदेशीर आहे. याबाबत शेतकरी कृती समितीतर्फे उच्च न्यायालयात रीट पिटिशन दाखल आहे. जमीन खरेदी-विक्रीबाबत दोन्ही संस्थांच्या संचालक मंडळाने काही व्यवहार केल्यास तो न्यायालयाचा अवमान ठरेल. पणन संचालक याची दखल घेऊन जमीन खरेदी करण्यास बाजार समितीला मान्यता देणार नाहीत, असे वाटते.
- विकास लवांडे, प्रदेश प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com