Vasaka Sugar Mill : ‘वसाका’ कारखान्याच्या विक्रीचा घाट

Sugar Factory Auction : कर्जापोटी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ (एनसीडीसी) यांच्या नियंत्रणातील डीआरटी कोर्टाच्या आदेशानुसार येत्या २० ऑगस्ट २०२५ रोजी कारखान्याची ऑनलाइन लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.
Ajinkyatara Sugar Mill
Ajinkyatara Sugar MillAgrowon
Published on
Updated on

Nashik News : पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या विठेवाडी (ता.देवळा) येथील वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीची (वसाका) प्रक्रिया अखेर अंतिम टप्प्यात आली आहे. कर्जापोटी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ (एनसीडीसी) यांच्या नियंत्रणातील डीआरटी कोर्टाच्या आदेशानुसार येत्या २० ऑगस्ट २०२५ रोजी कारखान्याची ऑनलाइन लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.

या संदर्भातील अधिकृत नोटीस वसाका कारखान्याच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आली आहे. या निर्णयास प्रचंड विरोध असूनही विक्री प्रक्रिया पुढे नेण्यात येत असल्याने कामगार आणि सभासदांमध्ये संतापाची भावना आहे.

एकीकडे सहकाराला आलेली मरगळ दूर करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे असे म्हणायचे, आणि दुसरीकडे शेकडो एकर जमीन व मालमत्तेवर डोळा ठेवून ती मालमत्ता हळूहळू घशात घालण्याचा कुटील डाव केंद्रीय सहकार विभागाकडून आखला जातो आहे,अशी संतप्त भावना कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचाऱ्यांची आहे.

Ajinkyatara Sugar Mill
Nashik Sugar Factory : ऊस उत्पादकांच्या हितासाठी ‘वसाका’ भाडेतत्त्वावरच

एनसीडीसीच्या थकबाकीच्या आधारे विक्रीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात कारखान्यावर सर्वाधिक कर्ज हे इतर राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांचे आहे. यामध्ये शिखर बँकेचे सुमारे १२४ कोटी, कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, प्रॉव्हिडंट फंड व इतर मिळकती मिळून ४१ कोटी, एचडीएफसी बँकेचे ३४ कोटी तसेच इतर बँकांचेही कोट्यवधी रुपयांचे कर्ज प्रलंबित आहे.

Ajinkyatara Sugar Mill
Sugar Factory : ‘वसाका’ वार्षिक भाडेकराराने चालवणार

अशा स्थितीत केवळ एनसीडीसीच्या थकबाकीच्या आधारे लिलावाची प्रक्रिया राबवली जात असल्याने इतर वित्तीय संस्थांनी आक्षेप नोंदवला आहे का, हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्यामुळे कारखान्याचा खरेदीदार मिळाला तरी प्रत्यक्ष विक्री होऊ शकेल का, याबाबतही शंका निर्माण झाली आहे.

कारखान्याची एकूण अंदाजे मालमत्ता ४०० कोटी रुपयांच्या पुढे असून, एकूण थकीत देणी ३०० कोटींच्या वर आहे. त्यामुळे विक्री झाली तरी त्या रकमेत सर्व थकबाकी फिटेल का आणि कर्मचाऱ्यांचे हक्क शिल्लक राहतील का, यावर प्रश्नचिन्ह आहे.

वसाका पुन्हा सुरू झाला पाहिजे यासाठी एकजुटीने संघर्षाची गरज असून,२८ हजार सभासद आणि ७०० कामगारांची रोजी रोटी वाचवण्यासाठी आता कोणी पुढे येईल का, हे पाहावे लागेल. ही विक्री प्रक्रिया केवळ आर्थिक व्यवहार न राहता, हजारो कुटुंबांच्या भवितव्याचा निर्णायक टप्पा बनली आहे.
– कुबेर जाधव, कार्याध्यक्ष, वसाका मजदूर यूनियन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com