Vasantdada Sugar Factory : ‘वसाका’ कामगारांचा बिऱ्हाड आंदोलनाचा इशारा

Factory Workers Protest : मागील आठवड्यातही काही मोजक्या कामगारांनी शिवस्मारकाजवळील पायऱ्यावर मुंडण करून धरणे आंदोलन केले होते.
Sugar Factory Worker Protest
Sugar Factory Worker ProtestAgrowon
Published on
Updated on

Nashik News : पंधरा दिवसांत राज्य शिखर बँकेने विठेवाडी (ता. देवळा) तालुक्यातील बंद पडलेला वसंत दादा सहकारी साखर कारखाना चालू करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा, अन्यथा बँकेच्या नाशिक कार्यालयासमोर बिन्हाड आंदोलन करण्याचा इशारा देत कामगारांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण बुधवारी (ता. २५) सायंकाळी मागे घेतले.

बुधवारी देवळा शिवस्मारकाजवळ कारखान्यातील आजी–माजी कामगार, महिला व सभासदांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. मागील आठवड्यातही काही मोजक्या कामगारांनी शिवस्मारकाजवळील पायऱ्यावर मुंडण करून धरणे आंदोलन केले होते. लोकप्रतिनिधींनी याकडे पाठ फिरवत दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत, कामगार, महिला, सभासदांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले.

Sugar Factory Worker Protest
Sugar Factory : ‘वसाका’ वार्षिक भाडेकराराने चालवणार

उपोषणस्थळी देवळा बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, संचालक भाऊसाहेब पगार, माजी सभापती विलास देवरे, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर, काँग्रेसचे कळवण तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटील, भाई दादाजी पाटील, शेतकरी संघटनेचे बागलाण तालुकाध्यक्ष किरण मोरे, केशव सूर्यवंशी, भास्कर बागुल, माणिक निकम, युनियनचे अध्यक्ष विलास सोनवणे, उपाध्यक्ष दीपक पवार, जगदीश पवार, भाऊसाहेब मोरे आदींनी पाठिंबा दर्शविला.

Sugar Factory Worker Protest
Nashik Sugar Factory : ऊस उत्पादकांच्या हितासाठी ‘वसाका’ भाडेतत्त्वावरच

‘वसाका’ची पाचशे कोटींची मालमत्ता धूळखात असून एकवीस महिन्यांपासून बंद असलेल्या कारखान्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कारखाना पुन्हा सुरळीत सुरू व्हावा व थकित वेतन मिळावे या मागणीसाठी शशीकांत पवार, कामगार संघटनेचे माजी कार्याध्यक्ष कुबेर जाधव, जमीनधारक शेतकरी नानाजी पवार, दोधा पवार, अण्णा गुंजाळ, मुन्ना शिंदे, सुनील आहीरे, संजय देशमुख, संजय जगताप, विनायक जाधव, गणू शिंदे, बापू देशमुख, सुभाष निकम आदी सभासद व कामगार तसेच महिला उपोषणास बसले होते.

या वेळी सभापती योगेश आहेर, ‘प्रहार’चे गणेश निंबाळकर यांनी आपले विचार मांडले. सायंकाळी पाच वाजता सर्व कामगारांनी एकजूट दाखवत शिखर बँकेने येत्या पंधरा दिवसांत कारखाना सुरू करण्यासंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा कामगार बँकेच्या कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढतील, असा पवित्रा घेत तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांना निवेदन देऊन उपोषण मागे घेतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com