Loksabha Election : सांगली, हातकणंगले लोकसभेसाठी यंत्रणा सज्ज

Sangli Loksabha Update : सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघांसाठी ७ मे रोजी मतदान होणार असून त्यासाठीची अधिसूचना १२ एप्रिलला प्रसिद्ध होणार आहे.
Loksabha Election
Loksabha ElectionAgrowon

Sangli News : सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघांसाठी ७ मे रोजी मतदान होणार असून त्यासाठीची अधिसूचना १२ एप्रिलला प्रसिद्ध होणार आहे.

जिल्ह्यात २४ लाख २२ हजार २०० मतदार आहेत. मतदारांची संख्या वाढावी, यासाठी ९ एप्रिलपर्यंत नावनोंदणी करता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.

सांगली लोकसभा मतदार संघात मिरज, सांगली, पलूस-कडेगाव, खानापूर, तासगाव-कवठेमहांकाळ, जत हे विधानसभा मतदार संघ आहेत. सांगली लोकसभा मतदार संघात जिल्ह्यातील १८ लाख ५३ हजार ७२९ मतदार असून यात पुरुष ९ लाख ४६ हजार तर,

स्त्री मतदार ९ लाख ६ हजार आहेत. हातकणंगले लोकसभा मतदार संघात शिराळा आणि इस्‍लामपूर विधानसभा मतदार संघ असून ५ लाख ६६ हजार ३१५ मतदार त्या ठिकाणी मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत.

Loksabha Election
Loksabha Election : लोकसभेसाठी सतर्क राहावे

सद्यःस्थितीत जिल्ह्यात २४२१ मतदान केंद्रे आहेत. तर २७ सहायकारी मतदान केंद्रे प्रस्तावित आहेत. शिराळा तालुक्यात ३ शॅडो मतदान केंद्रे आहेत. या ठिकाणी संपर्कासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदान यंत्राची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.

जिल्ह्यात २० नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत मतदारांना १९५० हा टोल फ्री क्रमांकावर तसेच सिव्हिजिल ॲपवरून आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करता येणार आहे. त्यावर १०० मिनिटांच्या आत निराकरण होणार आहे.

Loksabha Election
Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत उमेदवार करू शकणार ९५ लाख खर्च

वीजसमस्येबाबत विशेष काळजी

सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी मतदान आणि मतमोजणी अनुक्रमे ७ मे आणि ४ जून रोजी होत असून त्यादिवशी मंगळवार येतो. मंगळवारी महावितरणचा भारनियमचा दिवस असतो, त्यामुळे मतदान केंद्रांवर किंवा मतमोजणी केंद्रांवर विजेची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी स्पष्ट केले.

आचारसंहितेसाठी पथके

स्टॅटिक सर्व्हलन्स टीम ६७ पथके

भरारी पथक ५९ पथके

व्हिडिओ व्हिविंग टीम १९ पथके

व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम ४० पथके

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com