Farmers Protest : दिल्ली शेतकरी आंदोलनाची ताकद वाढली!; कुस्तीपटू बजरंग पुनिया होणार सहभागी

Delhi Farmers protest : हमीभाव कायद्यासह विविध मागण्यांसाठी दिल्लीच्या सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. आता या आंदोलनाला आणखी बळ मिणार असून या आंदोलनात ऑलिम्पिक कुस्तीपटूंनी आपला पाठिंबा दिला आहे.
Farmers Protest
Farmers ProtestAgrowon

Pune News : पंजाब आणि हरियाणाच्या शंभू सीमेवर गेल्या ३६ दिवसापासून शेतकऱ्यांचे आदोलन सुरू आहे. मात्र यावरून कोणतीही चर्चा किंवा तोडगा काढायला केंद्रातील मोदी सरकार तयार नाही. तर आतापर्यंत या आंदोलनात १० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच शेतकरी आंदोलनावरून आरएसएसने देखील टीका करत आरोप केल्याने शेतकरी आंदोलक आणि शेतकरी नेते संतापले आहेत. तर जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरूच राहिल असा निर्धार शेतकरी नेत्यांनी केला आहे. यादरम्यान या आंदोलनाला ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटूंनी आपला पाठिंबा दिला आहे. कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तर कुस्तीपटू पुनिया हरियाणा-पंजाब सीमेवर २३ मार्चला होणाऱ्या जाहीर सभेत सामील होणार आहे.

यावरून पंजाब मजदूर संघर्ष समितीचे सरचिटणीस श्रवणसिंह पंढेर म्हणाले की, 'शेतकऱ्यांच्या मागण्या आणि त्यांच्या आंदोलनाला देशातील प्रसिद्ध कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी पाठिंबा दिला आहे. २३ मार्च रोजी होणाऱ्या शेतकरी सभेला बजरंग पुनिया उपस्थित राहणार आहे. तर गेल्या आठवड्यात साक्षी मलिकने शेतकऱ्यांची भेट घेऊन शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता'

Farmers Protest
Farmers Protest : आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये होणार बैठका आणि पंचायत सभा

बैठका आणि पंचायत सभांचे आयोजन

दरम्यान २२ ते ३१ मार्च या कालावधीत हरियाणातील हिस्सार आणि अंबाला जिल्ह्यात सभांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यूपीमधील संभल, अलिगड आणि सहारनपूरमध्ये किसान पंचायती भरवल्या जाणार असून अशीच तयारी राजस्थानमध्ये करण्यात येत असल्याची माहिती पंढेर यांनी दिली आहे.

Farmers Protest
Farmers protest : पंढेर यांचा 'मोफत रेशन योजना' आणि 'शेतकऱ्यांच्या आत्महत्यां'वरून पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाना

आरएसएसचा आंदोलनावर हल्ला

दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी, शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून निवडणूकांच्या कालावधीत पुन्हा अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय. पंजाबमध्ये फुटीरतावादी दहशतवादाला प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप केला होता. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक येथील सभेत सरकारी योजना, मोफत रेशन आणि गरिबी रेषेवरून वक्तव्य केलं होतं. यावरून पंढेर यांनी आरएसएससह पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्ला केला होता.

पंढेर यांचा पलटवार

पंढेर यांनी, आरएसएसच्या वक्तव्याचा निषेध करताना, आरएसएस देशातील ८० कोटी शेतकऱ्यांचा अपमान करत आहे असे म्हटले होते. तर पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना, पंतप्रधान मोदी सगळे श्रेय आपल्या सरकारला देतात ही चांगली गोष्ट आहे. मात्र त्यांनी देशात होणाऱ्या शेतकरी आणि शेतमजूर यांच्या आत्महत्येची थोडी तरी जबाबदारी घ्यावी असे म्हटले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com