Bhogavati Sugar Factory : भोगावती साखर कारखान्याचा प्रचार थांबला, गुप्त हालचालींना वेग, उद्या मतदान

Bhogavati Sugar : भोगावती कारखान्यासाठी उद्या रविवारी (ता. १९) मतदान तर सोमवारी मतमोजणी होणार आहे.
Bhogavati Sugar Factory
Bhogavati Sugar Factoryagrowon
Published on
Updated on

Bhogavati sugar factory election : कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील महत्वाच्या असलेल्या जवळपास २५ हजारांहून अधिक सभासद असलेल्या भोगावती कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. ऐन दिवाळीत भोगावती कारखान्याचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी आरोप प्रत्यारोपांचे फटाके फोडले. दरम्यान प्रचार थांबल्याने आता अंतर्गत जोडण्यांना मोठा वेग आला आहे. कोण कुठल्या गटात, 'कोण नाराज त्यांना शांत करण्यासाठी आणि आपल्याकडे ओढण्यासाठी गुप्त हालचाली सुरू राहणार आहेत.

भोगावती कारखान्यासाठी उद्या रविवारी (ता. १९) मतदान तर सोमवारी मतमोजणी होणार आहे. भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बिनविरोधची चर्चा सुरू असताना अंतिम क्षणी तीन आघाड्या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.

सत्ताधारी आमदार पी. एन पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी असून, यांचे नेतृत्व संपतराव पवार-पाटील, ए. वाय. पाटील, अरुण डोंगळे, अन्य नेते करत आहेत. त्यांच्याविरोधात शिवशाहू परिवर्तन विकास आघाडी असून याचे नेतृत्व कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, माजी उपाध्यक्ष हंबीरराव पाटील, नामदेवराव पाटील, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील हे करीत आहेत. तिसरी आघाडी दादासाहेब पाटील-कौलवकर आघाडी असून याचे नेतृत्व कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील हे करीत आहेत.

गेल्या आठ दिवसांत दिवाळीत आरोप-प्रत्यारोपांचे फटाके फुटले. सोशल मीडियावर, तर कहर झाला. अत्यंत खालच्या पातळीला जाऊन प्रचार सुरू होता. एकमेकांवर आग पाखड, कोणी किती भ्रष्टाचार केला, कोणी साखर चोरली, कोणी नोकर भरतीत पैसे खाल्ले, साधू कोण, संत कोण इथपर्यंत प्रचाराने पातळी गाठली होती.

Bhogavati Sugar Factory
Bidri Sugar Factory : बिद्री कारखान्याच्या घडामोडीमुळे निवडणुकीत रंगत, मेहुणे पाहुण्यांची युती तुटली

काल (ता.१८) शुक्रवारी रात्री या तोफा थंडावल्या. आज मध्यरात्रीपासून रविवारी पहाटेपर्यंत अंतर्गत खलबते सुरू होतील. कुणाला कुठे मते कमी पडणार. कोण कोणावर नाराज आहे. याची कारणे शोधून ते वादळ शमवण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील.

निवडणूक यंत्रणा सज्ज

रविवार होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक विभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे. ८२ मतदान केंद्रे आहेत. ७२० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राधानगरी आणि करवीर तालुक्यातील ५८ गावांमध्ये २७,१६५ उत्पादक तर ४९५ संस्थागत मतदार आहेत. यासाठी राधानगरी तालुक्यामध्ये ४२ तर करवीर तालुक्यामध्ये ४० मतदानकेंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com