Sugar Production : जगाचे साखर उत्पादन पोहोचले १८३० लाख टनांवर

World Sugar Production : आगामी वर्षात मुबलक साखरेचा ‘यूएसडीए’चा अंदाज
Sugar Production
Sugar Productionagrowon
Published on
Updated on

राजकुमार चौगुलेः ॲग्रोवन वृत्तसेवा
Sugar Market : कोल्हापूर ः साखरेच्या आंतरराष्ट्रीय व्यापारी वर्षामध्‍ये (मे २०२३ ते एप्रिल २०२४) जगाचे साखर उत्पादन १८३० लाख टन झाले आहे. ब्राझीलने ४५० लाख टन साखर उत्पादनासह जगात अग्रक्रम पटकावला आहे. भारत दुसऱ्या क्रमांकावर असून देशात ३४० लाख टन साखर उत्पादन झाले. युरोपियन देशांनी मिळून १५० लाख टन साखर तयार केली. अमेरिकेनेही ८० लाख टन उत्‍पादन केले असल्याची माहिती ‘यूएसडीए’ या संस्थेने ताजा अहवालात दिली आहे.
साखर वर्षात ब्राझीलने एकूण उत्‍पादनाच्या ३३ टक्‍के साखर उत्पादित केली.

गेल्या वर्षात ब्राझीलचे साखर उत्पादन व जगातील साखर उत्पादनाची स्‍थिती एकमेकाला पूरक ठरली. जगात बहुतांश ठिकाणी साखरेचे उत्पादन कमी होण्‍याचा अंदाज होता. यामुळे भारतासह अन्य देशांनी स्वतःची साखरेची गरज भागविण्याकडे लक्ष दिले. वर्षाच्या सुरुवातीलाच जगातील बहुतांश देशात साखर उत्‍पादन कमी होईल, असे वातावरण तयार झाले. आंतराष्ट्रीय बाजारात साखरेचे भाव वर्षभर चांगले राहिले, परिणामी ब्राझीलच्या साखरेला वर्षभर मागणी राहिली. साखरेला मागणी आणि दर चांगला असल्याचे लक्षात येताच कारखान्यांनीही साखर उत्पादनावर भर दिला. जगभरातून मागणी वाढल्‍याने ब्राझीलमधील बंदराबर जहाजेही मिळणे मुश्‍कील झाले होते. लाखो टन साखर ब्राझीलच्या बंदरात जहाजांच्या प्रतीक्षेत पडून होती. या उलट भारतासारख्या देशातून मात्र साखर जागतिक बाजारात गेली नाही. परिणामी भारताकडून साखर खरेदी करणाऱ्या देशांनाही ब्राझीलचा आधार घ्‍यावा लागला. ब्राझीलने ४०० लाख टनांहून अधिक साखर विविध देशांना निर्यात केली. दर चांगला असल्याने याचा फायदाही कारखान्यांना झाला.

Sugar Production
Sugar Market : देशातील साखर उत्पादन ३२१ लाख टनांवर

जागतिक बाजारात साखर उत्पादन वाढीचा अंदाज
एपिलपासून ब्राझीलचा हंगाम सुरू झाला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात प्रतिकूल परिस्थितीमुळे गाळप हंगाम धीमा आहे. साखर उत्पादनातही काहीशी घट आहे. घट असली तरी ती दहा लाख टनांपर्यंतच असेल यामुळे फार मोठा फरक पडणार नसल्याचे ‘यूएसडीए’ने म्हटले आहे. ब्राझीलची घट अपेक्षित असली तरी थायलंडमध्ये मात्र १६ टक्के वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे. भारत आणि चीनमध्येही काही अंशी वाढ ‘यूएसडीए’ने गृहीत धरली आहे.

सरकारच्या निर्यातीच्या भूमिकेबाबत साशंकता
भारत सरकारच्‍या निर्यातीच्या भूमिकेबाबत अद्याप साशंकता आहे. भारताने अजूनही निर्यातीबाबत काय धोरण असेल याचा अंदाज दिलेला नाही. पुढील हंगाम सुरू झाल्यानंतर निर्यातीला परवानगी द्यायची की नाही याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्याचे भारताचे धोरण पाहता जरी निर्यातीला परवानगी मिळाली तरी हे प्रमाण कमी असेल, असा अंदाज साखर उद्योगातील सूत्रांचा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com