
Sugar Rate : देशात यंदा साखर उत्पादनात मोठी घट झाली. तर देशातील ५०० साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. तसेच साखर उत्पादन ३२१ लाख टनांवर स्थिरावले आहे, असे साखर कारखान्यांनी स्पष्ट केले.
देशातील साखर उत्पादनात यंदा मोठी घट झाली आहे. देशातील साखर उत्पादन ८ टक्क्यांनी कमी झाले आहे. १५ मे पर्यंत देशातील साखर उत्पादन ३२१ लाख टनांपर्यंत पोचले आहे. मागील हंगामात याच काळातील साखर उत्पादन ३४९ लाख टनांवर पोचले होते, अशी माहिती उद्योगांच्या वतीने देण्यात आली.
देशातील जवळपास ५०० साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. तर ३७ साखर कारखान्यांचे गाळप सुरुच होते. यापैकी तमिळनाडूत सर्वाधिक १६ साखर कारखान्यांचा समावेश होता. तर उत्तर प्रदेशातील १५ साखर कारखाने सुरु होते.
१५ मे नंतर यंदा देशात केवळ ३७ कारखाने सुरु होते तर मागील हंगामात याच काळात ११६ कारखान्याचे गाळप सुरु होते. यावरूनच यंदा देशातील ऊस उत्पादन आणि साखर उत्पादनात घट झाल्याचे स्पष्ट होते.
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक हे साखर उत्पादनात महत्वाची राज्ये आहेत. चालू हंगामात उत्तर प्रदेशात सर्वाधिक १०४ लाख २० हजार टन साखर उत्पादन झाले. उत्तर प्रेदशात मागील हंगामात १०१ लाख टन ५० हजार टन उत्पादन झाले होते.
तर महाराष्ट्रातील उत्पादनात यंदा मोठी घट झाली. गेल्या हंगामात १३५ लाख ४० हजार टनांपर्यंत उत्पादन झाले होते. तर यंदाचे साखर उत्पादन १०५ लाख ३० हजार टनांवरच स्थिरावले. कर्नाटकातही यंदा साखर उत्पादनात घट झाली.
कर्नाटकात मागील हंगामात जवळपास ६ लाख टन साखर उत्पादन मिळाले होते. ते यंदा साडेपाच लाख टनांवर स्थिरावण्याचा अंदाज आहे.
तमिळनाडूतील साखर उत्पादनात २९ टक्क्यांची वाढ झाली. तर बिहारमध्ये ३७ टक्क्यांनी उत्पादन वाढले. बिहारमधील ऊस गाळपाचा हंगाम संपला आहे. तसेच हरियाना, पंजाब, उत्तराखंड, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातही साखर उत्पादनात यंदा वाढ झाली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.