दरम्यान, भारतातील भात उत्पादन वाढणार असल्याचे संकेत ‘यूएसडीए’ने दिले अाहेत. गेल्या वर्षी (२०१६-१७) थायलंड सरकारने तांदूळसाठ्यात कपात केली. यामुळे या देशातून होणाऱ्या तांदूळ निर्यातीत घट होणार अाहे.
या देशातून गेल्या वर्षी ११ दशलक्ष टन तांदूळ निर्यात झाली होती. यंदा येथील उत्पादन स्थिर अाहे. यंदा येथील भात उत्पादन २०.४ दशलक्ष टनांवर पोचेल. हे उत्पादन सहा टक्क्यांनी अधिक असेल, असे ‘यूएसडीए’ने नमूद केले अाहे.
सप्टेंबर महिन्यात येथे पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पुराचे पाणी तत्काळ ओसरल्याने भातपिकावर त्याचा परिणाम झालेला नाही. देशातील हवामान यंदा भातपिकासाठी पोषक राहिले अाहे. यामुळे उत्पादन वाढणार असल्याचे चित्र दिसत अाहे.
भारतातील उत्पादन ११० दशलक्ष टनांवर
भारतातील भात उत्पादन यंदा ११० दशलक्ष टनांवर पोचेल, असा अंदाज ‘यूएसडीए’ने व्यक्त केला अाहे. उत्तर भारतात भातपिकासाठी पोषक हवामान राहिले अाहे. यामुळे उत्पादन वाढण्याची शक्यता अाहे.
दरम्यान, भारतातील कृषी अाणि अन्नप्रक्रिया उत्पादने निर्यात प्राधिकरणाच्या अाकडेवारीनुसार, भारताने गेल्या वर्षी ६.८२ दशलक्ष टन बासमती तांदळाची निर्यात केली अाहे.