
Pune News: नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत (नॅशनल एज्युकेशन पॉलिसी-एनईपी) कृषी महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकांसाठी ‘सकाळ ॲग्रोवन’ संलग्न कौशल्य प्रशिक्षण संस्था ‘एसआयआयएलसी’तर्फे फॅकल्टी डेव्हलपमेंटविषयी एक दिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन शुक्रवारी (ता. १८) करण्यात आले आहे. यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि प्रभावी अध्यापन या मुख्य विषयांवर तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे.
देशभरात ‘एआय’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाविषयी बोलले जाते. परंतु या तंत्रज्ञानाचा महाविद्यालयीन शिक्षणात प्रभावी वापर कसा करावा, शिकविण्याच्या पद्धतीत सुधारणा करून वर्गातील विद्यार्थ्यांचा सहभाग, त्यांच्यात विचारांची आणि शिकण्याची प्रेरणा कशी वाढवावी, शिकण्याच्या पद्धतीत सुधारणा करून विद्यार्थ्यांना त्याच्याशी एकरूप कसे करावे,
आपले शिकविणे अधिक डायनॅमिक आणि आकर्षक कसे बनवावे, कंटेंट तयार करण्याची पद्धत सोपी आणि आकर्षक कशी बनवावी, त्यासाठी अत्याधुनिक कोणत्या साधनांचा वापर करावा, डेटा विश्लेषण क्षमता वाढीसाठी एआयचा वापर कसा करावा इ.विषय हँड्स ऑन एक्सपिरीअन्सद्वारे शिकविण्यात येणार आहेत.
कार्यशाळा कोणासाठी
अभियांत्रिकी, कृषी, कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन महाविद्यालयांतील प्राध्यापक, प्राचार्य, सहायक प्राध्यापक आदींसाठी ही कार्यशाळा उपयुक्त असून ते यात सहभागी होऊ शकतात.
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : ८९५६३४४४७२, ९१४६०३८०३१ किंवा समवेत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करावा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.