Jalyukt Shiwar : नांदेडला २५३ गावात होणार जलयुक्तीची कामे

Water Conservation Scheme : जलयुक्त शिवार योजना महाराष्ट्र जलयुक्त शिवार २.० म्हणून ओळखली जात आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागामार्फत २०२३-२४ या वर्षात तीन हजार ८८६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
Jalyukt Shiwar Scheme
Jalyukt Shiwar Scheme Agrowon

Nanded News : जिल्ह्यातील २५३ गावात जलयुक्त शिवार योजना २.० राबविण्यात येणार आहे. यासाठी जलयुक्तमध्ये इतर अभिसरणाकडून एकूण ५३५१ कामे होणार आहेत. यासाठी १३४ कोटी ४६ लाख रुपयांचा निधी अपेक्षीत असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.

जलयुक्त शिवार योजना महाराष्ट्र जलयुक्त शिवार २.० म्हणून ओळखली जात आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागामार्फत २०२३-२४ या वर्षात तीन हजार ८८६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

Jalyukt Shiwar Scheme
Jalyukt Shiwar : ‘जलयुक्त’चे दफ्तर ‘जलसंधारण’मध्ये पडून

जलयुक्तचा पहिला टप्पा, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व आदर्श गावसह इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रममधील पूर्ण झालेली आणि कार्यान्वित गावे वगळून उर्वरित गावांपैकी पाणलोट कार्यक्रम अंमलबजावणीसाठी पाच मुद्यांच्या आधारे गावांची निवड करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातही या योजनेच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणा कामाला लागली आहे.

Jalyukt Shiwar Scheme
Jalyukt Shiwar : ‘जलयुक्त शिवार’ च्या ७०७ कामांची तांत्रिक, प्रशासकीय मान्यता रखडली

जिल्ह्यात २५३ गावात ही योजना राबविण्यात येणार आहे. यात एकूण ५३५१ कामे होणार आहेत. यावर १३४ कोटी ४६ लाख रुपयांचा निधी खर्च होणार आहे. जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालयाकडून सर्व यंत्रणांकडून कृती आराखडा तयार करुन घेतला आहे.

या आराखड्याला जिल्हास्तरीय समितीकडून मान्यता घेण्याचे काम सुरु आहे. या समितीकडून मान्यता मिळाल्यानंतर कामांना कार्यारंभ आदेश देण्यात येणार असल्याची माहिती जलसंधारण विभागाकडून देण्यात आली.

विविध स्त्रोतांमधून निधीची उपलब्धता

केंद्र व राज्य पुरस्कृत मृद आणि जलसंधारण-कृषी विभागाच्या योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना, जिल्हा नियोजन व विकास समिती निधी, जिल्हा परिषद, सीएसआर निधी, सार्वजनिक खासगी भागीदारी, लोकसहभाग आदी स्त्रोतांमधून निधीची उपलब्धता केली जाणार आहे. अभिसरणातून निधी उपलब्ध न झाल्यास जलयुक्तच्या लेखाशीर्षातून निधीची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com