Traditional Farming: ग्रामीण भागातून लाकडी नांगर कालबाह्य

Lakadi Nangar: शेतीची नागंरणी, मशागतीसाठी अनेक वर्षे लाकडी नांगराचा वापर केला जात होता, परंतु आजच्या आधुनिक युगात वेळेची बचत करण्यासाठी यांत्रिकी पद्धतीचा वापर होत असल्याने ग्रामीण भागातून लाकडी नांगर कालबाह्य झाला आहे.
Traditional Farming
Traditional FarmingAgrowon
Published on
Updated on

Tokavade News: शेतीची नागंरणी, मशागतीसाठी अनेक वर्षे लाकडी नांगराचा वापर केला जात होता, परंतु आजच्या आधुनिक युगात वेळेची बचत करण्यासाठी यांत्रिकी पद्धतीचा वापर होत असल्याने ग्रामीण भागातून लाकडी नांगर कालबाह्य झाला आहे.

शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवनवीन बी-बियाणांचा वापर केला जातो. एसआरटीसारख्या आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. यामुळे शेतीचे उत्पन्न वाढत असले तरी ग्रामीण भागात परंपरागत वापरत असलेला लाकडी नांगर, लोखंडी फाळाऐवजी ट्रॅक्ट्रर, पॉवर टेलरसारख्या आधुनिक प्रकारच्या यंत्राने घेतला आहे.

Traditional Farming
Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

तसेच लाकडी नांगर बनविण्यासाठी सागाचे लाकूड मिळत नसल्याने नांगर बनविणे कठीण होत आहे. शिवाय बैलाच्या मदतीने शेतीची मशागतीऐवजी मजुरीमुळे ट्रॅक्टरचा आधार घेतो. त्यामुळे यांत्रिक पद्धतीने जनावरांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे कारागिरांना आता काम मिळत नसल्याने वििवध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बाजार समितीच्या उत्पन्नात घट

खरीप हंगामात शेतकरी कर्ज काढून नांगराला लागणारे बैल, दुग्ध व्यवसायासाठी गाय, म्हैस विकत घेत होता, परंतु सध्या शेतीची मशागत आधुनिक पद्धतीने होत असल्याने नांगराची जागा ट्रॅक्टर, पॉवर टेलरने घेतली आहे. तसेच जनावरांची खरेदी-विक्री कमी झाल्यामुळे बाजार समितीचे उत्पन्नही घटले असल्याचे दिसत आहे.

Traditional Farming
Traditional Farming : पारंपरिक पीकपद्धती बदल करून नगदी पिकांकडे वळण्याची गरज

कारागिरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न

पूर्वी प्रत्येक गावात एकतरी लाकूड काम करणारा कारागीर असायचा. पावसाळा सुरू झाला की ग्रामीण भागात लाकडी नांगराला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने दोन महिने तरी चांगली कमाई मिळत असे.

मात्र आता आधुनिकतेच्या काळात ग्रामीण भागातील लाकडी नांगराचा वापर कमी झाला आहे. त्यामुळे नांगराची मागणी घटल्यामुळे ग्रामीण भागातील कारागिरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सध्याच्या काळात बैलजोडी सांभाळणे कठीण झाले आहे. त्यामुळे वेळेची बचत होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आज शेतकरी करत आहेत.
- वामन खाकर, वाल्हीवरे, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com